महाराष्ट्रात असा कोण भेटेल, की ज्याला
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नाव माहीत नसावे. महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल ज्याला
माहीत नाही, तोच कदाचित नकारात्मक मान डोलावू शकतो. महाराष्ट्राच्या
सत्यशोधकीय विचाराचा जागर जो म. फुल्यापासून सुरू होत शाहू राजेंच्या तालमीत जे सत्यशोधक
घडले त्यापैकीच एक कर्मवीर भाऊराव पाटील होत. त्यांच्या अंगी शाहूचे धाडस व
धोरणीपणा भिनला होता. शाहू राजेंनी जसे वेदोक्त प्रकरणाचे वर्तुळ पूर्ण करून सोडले.
त्याच धाडस व कौशल्याने त्यांनी आपली वाट वळविली होती. एकदा त्यांना विहीरीतून अस्पृश्यांना
पानी भरू दिल्या जात नाही असे दिसले. ते तेथे गेले, लोकांना समजावून सांगितले. लोक ऐकत नाही असे दिसताच विहीरीचा राहटाच तोडून
टाकला होता. इस्लामपूर येथे एका शाळेत अस्पृश्य विद्यार्थी वर्गाच्या बाहेर बसून शिकत
असल्याचे दिसले. त्यांना वेदना झाल्या, त्यांनी सरळ त्या मुलाला
उचलून घरी आणले. घरच्या विरोधाला त्यांनी जुमानले नाही. त्या मुलाला रयत शिक्षण संस्थेत
शिकविले. तोच पुढे महाराष्ट्राच्या विधान सभेचा पहिला मागास प्रतींनिधी होता. त्याचे
नाव होते ज्ञानदेव घोलप.