काल हरी नरकेंच्या निधनाची
बातमी समजली आणि मन हादरून गेले. त्यांच्या धक्कादायक निधनाने एक प्रश्न पडला होता, हरी नरके तर
गेले, मग आता प्रतिगाम्यांच्या एखाद्या प्रश्नावर, फुले शाहू आंबेडकर यांच्याविषयी
गरळ ओकणाऱ्या लेखावर ताबडतोब लेखाच्याच माध्यमातून प्रती उत्तर कोण देईल?. तेवढ्याच
त्यांच्यासारखा अभ्यास
करणारा, इतिहासात जाऊन शोधणारा, तेवढ्या तोलामोलाचा व ताकतीने समोरच्याला निरुत्तर करणाऱ्या
हरीची जागा कोण घेईल?. चेहरे शोधू लागलो, परंतु तसा चेहरा मिळेना! परत मन विषण्ण
झाले, वाटायला लागले कि, ते पुरोगामी, सत्यशोधक व फुले आंबेडकरी
विचारांचे शिलेदार होते, बौद्धिक ताकतीचा एखादा जुनियर शिलेदार बनून पुढील काळात समोर
येईलच.