तामिळनाडू हे
ई.व्ही.रामासामी पेरियार यांच्या विचाराचा वारसा लाभलेले राज्य. त्यांनी तमिळ
जनतेला समतेची व धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिली. त्यांच्याच विचाराचा आदर्श घेणारे
डीएमके (द्रविड मुन्नेत्र कझडम) व एआयडीएमके (अण्णा द्रविड मुन्नेत्र कझडम) हे दोन्ही
पक्ष नेहमीच राज्यातील सत्तेमध्ये असतात. त्यामुळे समतेचे व जाती निर्मुलनाचे लोन
प्रत्येक तामिळी कुटुंबात पोहोचवयास हवे होते. परंतु तसे झालेले दिसत नसून हिंदू
धर्मातील निम्न जातीवरील अत्याचार रोज पुढे येत आहेत. अशा घटनात सतत होणारी वाढ हि
डीएमके पक्षप्रमुख एम के स्टालिन यांचे वक्तव्य व कृती यात तारतम्य जुळत नसल्याचे
दिसते. त्यामुळे केवळ पुरोगामीपणाचा आव आणून सामाजिक सुधारणा करता येत नाही तर
त्याला कृतीची जोड असणे आवश्यक असते.