
कांशीरामजी यांच्या राजकीय सत्ता हातात घेण्याच्या संकल्पनेला काही बुद्धिवादी विचारवंताना सोडले तर बहुंतांशी विचारवंतांनी फारसे उचलून धरले नव्हते. याचे कारण म्हणजे सत्ताधारी पक्ष व प्रस्थापित विचारांच्या मिडीयाच्या विरोधात गेलो तर आयुष्यात आपल्याला काहीही (पद व प्रतिष्ठा) साध्य करता येणार नाही’ या भीतीने काही तथाकथित आंबेडकरवादी कांशीरामजींच्या संघर्षापासून दूर राहिले. व्यक्तिगत लाभासाठी सत्ताधार्यांना चुचकारणे व त्यासाठी समाजाचा बळी देणे हे अशा लोकांचे ध्येय राहिले होते.दलितांच्या सामाजिक न्याय व आर्थिक उन्नतीच्या मुद्द्यांना बगल देण्याचे प्रयत्न जाणीव पूर्वक होत आहेत. अशा अवस्थेत बहुजनवादी कधीपर्यंत विघटीत राहणार आहेत? हा आजचा मोठा प्रश्न आहे. संपूर्ण समाजाचा विकास बघायचा कि केवळ एक दोन नेत्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा विकास हे आता लोकांनीच ठरवायला हवे. एक संघटना व एक पक्ष या भूमिकेकडे हा बहुजन समाज कधी बघणार आहे? सांस्कृतिक, सामाजिक व राजकीय लढे हे एकाच वेळेस व एकमेकाच्या साथीने लढल्यास ध्येय लवकर गाठता येईल हे आजच्या तथाकथित नेत्यांना का कळत नाही? समाजाच्या विकासासाठी नियोजन, साधनसामग्री, दबाव गट, एकीकृत वोट बँक, अवलोकन करण्याची क्षमता व सत्ताधार्यांना वाकविण्याची कुवत निर्माण झाली पाहिजे.
Kanshi Ram Ji redefined the rules of Indian politics. He developed the concept that the unstable government at centre is beneficial for Bhaujan Samaj, as you can derive maximum advantages to the deprived section. Therefore, he used to say frequently,“ I want Mazboor (weak) Government at the centre and not Majboot (strong) till we reach to the centre. Kanshi Ram Ji always acknowledged the contribution of Buddhists (Ex-Mahar) for supporting Dr. Babasaheb in his war against Manuvadi. He said,“ I have learnt two things from them, one how to run the movement, I learn from Dr. Babasaheb and second, how not to run the movement from his followers in Maharashtra.
अनेकजण सैरभर होवून आपापले पक्ष व संघटना काढून बहुजन समाजाला फसविण्याचे कार्य करीत आहेत. अशा विध्वंसक नेत्यांना वेळीच आवरले पाहिजे. कांशीरामजी नेहमी म्हणत “बहुजन समाजाच्या फायद्यासाठी मी कोणाचीही साथ घेवू शकतो. माझे उद्देश साध्य झाले कि मी युती तोडूही शकतो. त्यासाठी कोणी माझ्यावर सर्वात मोठा संधीसाधूपणाचा आरोप केला तरी तो मला मान्यच असेल.” कांशीरामाजींच्या अनेकानेक कृतीने बहुजन समाजात सत्तेत भागीदारी नव्हे तर सत्ता हातात घेण्याची महत्वाकांक्षा वाढू लागली होती. त्यासाठी त्यांनी बाबासाहेबांचा जातीविनाश हा कार्यक्रम बाजूला ठेवून जाती चेतना मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. यामागे त्यांचा तर्क होता कि, जसजशा जाती चेतना वाढतील तसतशा परंपरागत शासक जाती राजकीयदृष्ट्या दुर्बल होतील व त्यांची जागा खालच्या जाती घेतील.
आज कांशीरामजी सारखे कणखर व खंबीर मार्गदर्शक नाहीत. त्यामुळे आज बहुजन चळवळ दोलायमान स्थितीमध्ये गटांगळ्या खात आहे. बसपाध्यक्ष मायावतीनी मान्यवर कांशीरामजींच्या चळवळीचे मोठे वाटोळे केले आहे. हे सत्य बहुजन समाजाला आवर्जून सांगणे गरजेचे आहे. जगात बदल होत आहेत तसे बहुजनांना बदलावे लागेल. फुले आंबेडकरवाद्यांना दुसर्यांचे वाहक न बनता त्यांनाच आपले वाहक कसे बनविता येईल?. यावर रणनीती आखली गेली पाहिजे. आपली सीमित असलेली मतसंख्या (व्होटबँक) लक्षात घेता विचारवंतांनी राजकीयदृष्ट्या बहुजन समाजाला दिशा देण्याच्या कार्यास वाहून घेतले पाहिजे. एक देश एक पक्ष, एक देश एक मातृसंघटना व त्याच्या विविध शाखा अशा प्रकारचे संघटन निर्माण करण्यास प्राधान्य द्यावयास हवे. आज अनेक स्वार्थी लोकांनी आपआपले राजकीय पक्ष व संघटना निर्माण केल्या आहेत. अशा विविध संघटना व पक्षात विभाजित असणे हे यशाचे गमक नव्हे तर पराभूततेचे लक्षण आहे.अशा संघटना व नेत्यावर बहिष्कार टाकला पाहिजे. बहुजन समाजाने कोणतीही व्यक्तीसापेक्ष संघटना व पक्षांना आपले शत्रूच समजले पाहिजे. कारण व्यक्ती म्हणून नव्हे तर नितीनियमावलीच्या आधारे चालणारे संघटनच बहुजन समाजाला आर्थिक सक्षम व राजकीय प्रभुत्व मिळवून देवू शकते. असे संघटनच बुध्द, फुले, शाहू, आंबेडकर, पेरियार व कांशीराम यांच्या विचारावर कार्यान्वित होवून भारताला सामरिकदृष्ट्या अधिक मजबूत, समतातावादी, विज्ञानवादी व जगाचा वैश्विक गुरु बनवू शकते. भारत सम्राट अशोकाच्या काळात वैश्विक गुरु होता. अनेक देशातील संशोधक व प्रवासी भारतात येत. येथील ज्ञानसंपदा आत्मसात करून आपापल्या देशात त्याची प्रेरणी करीत असत. भारत तेव्हा वसुधैवकुटुंबम होता. आजही बुद्धाच्या तत्वावर मार्गक्रमण केल्यास पुरातन वैभव प्राप्त होवू शकते.
लेखक: बापू राऊत
No comments:
Post a Comment