Tuesday, April 9, 2013

संशयाच्या भोव-यात हरी नरके


लक्ष्मण माने यांनी आपणास काही लोकांनी कट करून फसविले असा आरोप करीत कटात सहभागी असलेल्या काही जणांची नावे त्यांनी घेतली. त्यात हरी नरके या नावाचा अंतर्भाव आहे. हरी नरके हे परिवर्तनवाद्याच्या विचारपीठावर नेहमी उच्चारले जाणारे नाव. याच परीवर्तनवाद्यांनी देशाच्या बाहेरही सन्मान दिला. फुले आंबेडकरांचा विचार सांगणारा एक विचारवंत. परंतु मागील दोन वर्षापासून हरी नरकेनी आपली छावणी बदलल्याचा आरोप होत असल्याचे ऐकायला
येत होते. ब्राम्हनवाद्याच्या छावणीत हरी नरके आश्रयाला गेले असे बोलले जात होते. मराठा सेवासंघाचे संस्थापक पुरषोत्तम खेडेकर यांनी ब्राम्हणाच्या विरोधात एक पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाच्या विरोधात कोणत्याही ब्राम्हणाने तक्रार केली वा विरोधाचा सूर लावला नाही परंतु हरी नरके यांनी सदर पुस्तक ब्राम्हण विरोधी आहे म्हणून पुरुषोत्तम खेडेकर विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. हरी नरकेनी एक प्रकारे भाटगिरी केल्याचे सकृतदर्शनी दिसत होते. ज्या परिवर्तनवाद्याच्या विचारापिठावरून ब्राम्हनवादविरोधात विखारी टीका होत होत्या त्याच विचारपिठावर हरी नरकेचेही भाषण व्हायचे तेव्हा नरकेनी “ हे ब्राम्हणाच्या अति विरोधी होतंय” असे म्हणत सभात्याग केल्याचे ऐकिवात नाही. लक्ष्मण माने च्या विरोधात काही महिलांनी लैगिक अत्याचाराची तक्रार केली तेव्हा सर्व परिवर्तनवादी हबकून केले. कोणीच काहीही प्रतिक्रिया देत नव्हते. सारेच  परिस्थितीचा आढावा घेत होते. कारण तो परिवर्तनवादी व स्त्रीवादी चळवळीसाठी मोठा धक्का होता. तेव्हा अत्याचाराच्या बातम्यापाठोपाठ लोकसत्ताच्या संपादकीयात “साडेतीन टक्क्याच पदमश्री उपरा” असे जातीद्वेषाचे फुत्कारे सोडण्यात आले. त्यापाठोपाठ लोकमत मध्ये हरी नरके यांचा लेख प्रसिध्द झाला. हरी नरकेचा हा लेख बरेच काही सांगून गेला. लेख लिहिण्याची जबरदस्त घाई केल्याचे जाणवले.  त्या लेखातून परत हरी नरकेनी आपली छावणी बदलली असल्याचे धुके गडद झाले.
भटक्यांच्या बौध्द धम्माच्या धर्मांतराला विरोध म्हणून काहींनी कटकारस्थान रचले असे माने म्हणतात. अलीकडेच संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी हिंदूधर्मीय लोकांच्या धर्मांतराला विरोध केला जाईल व असे धर्मांतर खपवून घेतले जाणार नाही असे म्हटले आहे. माने हे विमुक्त भटक्या जमातीचे बौध्द धम्मात धर्मांतर करण्यासाठी विमुक्त भटक्याचे मेळावे घेण्याचा सपाटा चालू केला होता. याला भटक्या जमातीतील काहींचा विरोध होता असे वर्तमान पत्रातील बातम्यांवरून कळते. एखाद्या आरोपाने माणूस प्रथम बदनाम होत असतो. काही काळानंतर न्यायालयात या आरोपात तथ्य नसल्याचे जाहीर होते परंतु तोपर्यंत बदनाम झालेला माणूस सार्वजनिक जीवनात पूर्णता: बाहेर फेकल्या जातो. त्याच्यावरचा लोकांचा विश्वास नष्ट होतो. मग अशावेळेस त्याने सुरु केलेली परिवर्तनाची चळवळ पूर्णत: नष्ट होऊन जाते. जातीयावाद्याचा विजय होतो. ते आपला विजयोत्सव साजरा करतात. भारताच्या इतिहासात हेच घडत गेले  . लक्ष्मण मानेच्या या प्रकरणातून इतिहासाची परत पुनरावृत्ती होते की काय असे वाटायला लागते.
दु:ख याचेच वाटते की बहुजनांच्या हातूनच बहुजनांच्या चळवळीचा –हास केल्या जातो.

बापू राऊत

2 comments:

  1. lakshat thewa brahman dweshache maharashtratil

    walwalanare sheput amhi thechun taku.amhich obc

    voruddh maratha ya zunji lawu.amhi kuthe hi swta

    prakashat n yeta kam karat asato.amchya kade swatache jiwan brahmantwala wahilele lok ahet

    amchya chalawali khup dirgha kal chaltat.aj anek brahman swatache sansar sukh sodun Brahmanatwahe rashan karat ahet.

    AJ PARAYNT MAHARASHTRAT MARATHA ARASHANALA WIRODH KARAYACHI KUNACHI CHATI HOTI KA?PUN OBC
    CHYA MADATINE AMHI TE KARUN DAKHAWALE AHE.PUDHIL
    25 WARSHAT MARATHA SAMAJ AMHI KAMKUWAT KARU TAKU.
    OBC N CHYA HATAT RAJYA DEWU.FUKT BAGHAT RAHA.

    AJ MEDIA HE AMCHE DUSARE HATTYAR AHE.KAY DAKHWAYCE/WA KAY NAHI HE AMHI THARAWATO.

    TUMACHE DADA /BABA PAR BAWACHALUN JATAT.

    ReplyDelete
  2. Bramhan he ya deshaache shatru aahet ase bahujan samaajaala kadhi kalel?

    ReplyDelete