भारतीय समाज व्यवस्थेचा इतिहास बघितल्यास विविध प्रकारच्या लादलेल्या कृत्रिम
परंपरामुळे समाजात असमानता, विषमता, गुलामी प्रवृत्ती व अस्पृश्यता उदयास आली. ह्या
व्यवस्थेमध्ये देशातील फार मोठा वर्ग बळी पडला होता. त्यांचे मौलिक हक्क पूर्णत:
हिरावल्या गेले होते. सामाजिक सन्मान, शिक्षणाचा गंध व आर्थिक समृध्दी ही
त्यांच्या पासून कोसो दूर होती. होती ती फक्त गुलामी. ब्रिटीश भारतात हे सारे
बदलण्याची सुरुवात झाली नसली तरी पाश्चात्य देशातील समतेच्या विचारानी भारताच्या
सीमा भेदल्या होत्या. नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक
असमानता दूर केल्याशिवाय भारतात समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण होणार नव्हती. त्यासाठी
भारतीय घटनेने हा हजारो वर्षाचा कलंक दूर करण्यासाठी मागासलेल्या समाजघटकांना
प्रगतीच्या संधी उपलब्ध्द व्हाव्या म्हणून राज्य घटनेने अनु.जाती व जमातींसाठी अनुच्छेद १४ ते १८, २९(२) आणि ४६ व्या कलमाद्वारे विशेष
Friday, September 25, 2015
Wednesday, September 23, 2015
Thursday, September 17, 2015
आदिवासीसाठी धोक्याची घंटा: एक दृष्टीक्षेप
आदिवासी समुदायाचा इतिहास हा त्यांच्या स्वतंत्र
धर्म, संस्कृती, समृध्दी व भाषेचा इतिहास आहे. त्यांच्या स्वतंत्र लोकशाही पध्दतीमध्ये समानता, बंधुता
आणि स्वातंत्र्य याचे आचरण आहे. सहचार, सहविश्वास व सहमदत हा त्यांच्या जीवनाचा
भाग. आपला स्वतंत्र धर्म व संस्कृती कोणावरही न लादता दुसऱ्याच्या धर्माचा भार
आपल्या अंगावर वाहून वा लादून घेणे हा आता त्यांच्या नैसर्गिक स्वभावातील कृत्रिम
शैली झालेली आहे. निसर्गावर त्यांची अतीव श्रद्धा असून दऱ्याखोरया, डोंगरे, जल,
जंगल व प्राणीमात्रासी त्यांचा सबंध ही त्यांची जीवनशैली. आदिवासी समाज हा जसा
जंगलात रमला तसा तो गावकुसाच्या आतमध्ये एका टोकाला वसला.
Subscribe to:
Posts (Atom)