Wednesday, July 27, 2016

छोड़ दो ऐसे धर्म और काम को !

हाल ही में मा. नरेंद्र मोदीजी के हाय प्रोफाइल वाले गुजरात में दलितोको सरेआम मारनेका व्हीडियो सामने आया है। ग्यारह जुलाई को वेरावल के ऊना गांव में मरे हुए जानवर के चमड़ा उतारने के मामले में दलित युवकों की पिटाई की गयीदलित युवको को मारनेवाले गोरक्षा समितीके सदस्य थे घटना का वीडियो वायरल होने पर भी पुलिस हरकत में नहीं आई दलितोके विरोध करने के बाद गोरक्षा समितिके कुछ लोगोको गिरफ़्तार किया गया लेकिन मामला क़ानून की कड़ी धाराओं के तहत दर्ज नहीं किया गया
गाय है क्या? गाय एक जानवर है। जैसे बाकी जानवर होते है। हर जानवर की एक अपनी उपयुक्तता होती है, जैसी बकरी की होती है। लेकिन धर्म के ठेकेदारोने गाय का इतना महिमामंडन कर दिया की उसके शरीर के अंदर पुरे ३३ करोड देवी देवता को बसा दिया। आजतक लाखो गायों को काटा गया लेकिन किसी भी गाय के पेट से कोई भी देवी देवता बाहर नहीं निकली। गाय के पेट के अंदर से कोई भी देवता ने अपना चमत्कार दिखाकर गाय को मारनेवाले का पेट नहीं फाड़ा। ऐसी स्थिति में कहा रफूचक्कर होते है देवी और देवता? हाल ही में धर्म के ठेकेदारोने अफवाए फैला दी है की गाय के मूत्र में सोने का अंश है। बकवास की बाते करनेमें इन धर्म के ठेकेदारों का कोई हात नहीं पकड़ सकता। सामान्य लोगो को अंधविश्वास में डुबो देते है। वे अंधविश्वास के नाम से पैसा कमाते है। अभी तो गायों के रक्षा के नाम पर सरकार को लुटा जा रहा है।

Monday, July 18, 2016

मा.रत्नाकर गायकवाड यांना खुले पत्र

मा.गायकवाड साहेब, सविनय जयभीम
दै.लोकसत्ता मध्ये दिनांक १०.०७.२०१६ रोजी आपले मनोगत प्रकाशित झाले. काही न्यूज चनेल्स वर सुध्दा आपण आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपल्याकडून आंबेडकर भवन पाडण्यासंदर्भात आंबेडकरी समुहात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आपल्या लेखात ‘दलितांच्या सर्वांगीण विकासाठी एक मध्यवर्ती सामाजिक केंद्र निर्माण करण्यासाठी बाबासाहेबांनी इमारत फंड उभारण्यास सुरुवात केली होती आणि त्या उभारलेल्या पैशातूनच बाबासाहेबांनी १० आक्टोबर १९४४ साली गोकुळदास पास्ता यांच्याकडून २३३२ चौ.यार्डाचा भूखंड घेतला व २९ जुलै १९४४ साली शेड्युल्ड कास्ट इम्प्रूव्हमेंट ट्रस्टची स्थापना केली’ असे आपल्या लेखातून स्पष्ट होते.

Saturday, July 9, 2016

आंबेडकर भवन व इलाईट क्लास

सध्या मुंबई स्थित आंबेडकर भवन  च्या मुद्द्यावरून आंबेडकरी समाजातच दोन गट पडल्याचे जाणवते. एक आंबेडकर भवन पाडल्याचा निषेध करणारा तर दुसरा समर्थन करणारा. भावी काळात आंबेडकरी समाज आपापसातच भिडण्याची ही नांदी आहे. पहिल्यांदाच आंबेडकरी समाजातील व्हाईट कलर वर्गाने आंबेडकरांच्या प्रतीकाच्या विरोधी भूमिका घेतलेली दिसते. एव्हाना एखाद्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तोडल्यावर जे आक्रंदन राजकीय नेते, टय सुटवाला वर्ग व सामान्य जनता करायची ती तीव्रता कमी झालेली आढळते. म्हणजे एकूणच आंबेडकर या महामानवाप्रतीची आस्था  कमी झाली असेही म्हणता येते. तसे बघितल्यास महाराष्ट्र ही महामानवांची कर्म व जन्मभूमी राहिली असली तरी ती वैचारिक क्रांती करून बदल घडविणारी भूमी असा तिचा मुळीच लौकिक नाही. स्वार्थी व दलाल (चमचेगिरी) प्रवृत्तीचा एक खास वर्ग येथे तयार झाला आहे.

Tuesday, July 5, 2016

निवडणुकीच्या आखाड्यात उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य. दिल्लीच्या केंद्रीय सत्तेची चाबी मिळवायची असेल तर ती याच राज्यातून मिळते. हा एक अलिखित समज आहे. आणि तो खराही आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये  भाजपाला याच उत्तर प्रदेशने दिल्लीची सत्ता मिळवून दिली. ज्यांच्या हातून उत्तर प्रदेश निसटतो तो देशाच्या मध्यवर्ती सत्तेच्या बाहेर फेकल्या जातो. कांग्रेसला आजची अवकळा जी प्राप्त झाली ती याच उत्तर प्रदेशामुळे. बाबरी मस्जिद पाडली गेल्यामुळे मुस्लीम समाजाने तर कांशीराम यांनी बहुजन जनतेमध्ये स्वाभिमान जागविल्यामुळे बहुजन समाजाने कांग्रेस पासून फारकत घेतली. त्यामुळे अपरिहार्यपणे कांग्रेसला गठबंधनाच्या (युपीए) माध्यमातून सत्ता उपभोगावी लागली हा अलीकडचाच इतिहास आहे.
उत्तर प्रदेशातील वर्ष २०१७ च्या विधानसभा निवडणुका म्हणजे काहींचा नव्याने राजकीय उदय, काहीचे पुनरागमन तर काही जे सत्तेमध्ये बसले आहेत त्यांना अधिक बळ प्राप्त करून देण्याचे साधन झाले आहे. मोदीच्या लोकप्रियतेचा कस लावणारी ही विधानसभा निवडणूक असेल. त्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ व त्यांच्या अनेक संघटना कामी लागल्या आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शाह हे उत्तर प्रदेशात तळ ठोकून बसलेले आहेत. कोणत्या पक्षाला कशा प्रकारे खीळखिळे करायचे याची ते रणनीती आखीत आहेत.