तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी
स्टॅलिन यांनी सनातन धर्मावर केलेली टिप्पणी प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय
बनली आहे. एवढेच नव्हे तर या टिप्पणीवर सनातन धर्मातील काही बिघडलेल्या साधुनी उदयनिधी
स्टॅलिनला मारण्यासाठी मोठे बक्षीस जाहीर केले. सामान्य हिंदू मात्र सनातन
धर्मावरील या चर्चेने फार गोंधळलेला दिसतोय, कारण त्याला
वाटते की, मी तर हिंदू आहे, मग हा सनातन व वैदिक धर्म आहे
तरी काय?. किंबहुना त्याला वाटायला लागल कि, मी नेमका कोणत्या
धर्माचा? सनातन कि हिंदू. म्हणूनच सनातन आणि हिंदू धर्म यांच्यातील खरा संबंध तपासणे आणि तो समजून घेणे
महत्त्वाचे ठरते. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला
सामाजिक विषमता, भेदभाव, उचनीच, जातिवाद आणि
स्त्रियांचे अवमूल्यन यांच्याशी जोडून डेंग्यू आणि मलेरियासारखे
रोग जसे दूर करतोय, त्याच प्रमाणे सनातन धर्मातील
असमानतावादी तत्त्वे नष्ट करण्याचे त्यांनी आवाहन केले होते. पण आरएसएस आणि त्यांच्याशी संलग्न संघटनांनी
उदयनिधी यांच्या वक्तव्याला “नरसंहाराची सुपारी” म्हणून प्रसारित केलंय.