Tuesday, June 9, 2026

डिजिटल युगातील अदृश्य पर्यावरणीय संकट

 


३ जून २०२६ ला युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी -इन्स्टिट्यूट फॉर वॉटर, एन्व्हायर्नमेंट अँड हेल्थने  (UNU-INWEH) एआय च्या (AI) ऊर्जा वापराची पर्यावरणीय किंमत: कार्बन, पाणी आणि जमिनीवरील पाऊलखुणा (फूटप्रिंट्स) हा एक शोध पत्र (Research Paper) प्रसिध्द केला. या शोध पत्राचे  क्झे, एम., चमनारा, एस., मतीन, एम., फारसी, ए., मारवाला, टी., मदनी, के. (२०२६) हे लेखक आहेत. या शोध पत्राच्या प्रसिद्धीनंतर जगात अस्तित्वात आलेल्या डिजिटल युगाचा पर्यावरण, जलस्त्रोत व मानवी जीवनावर कोणते परिणाम होवू शकतात यावर चर्चा होवू लागल्या आहेत. या शोध पत्रावरून भारताच्या इको सिस्टीमवर या डिजिटल युगाचे (डेटा सेंटरचे)  काय काय परिणाम होवू शकतात याचे विश्लेषणात्मक अंदाज घेता येतात