समाजातील
प्रत्येक वर्ग वा देश आपापल्या इतिहासाचा गर्व करीत असतो. कोणाचा इतिहास हा कु
प्रथानी भरलेला असतो, तरीही तो त्या विक्षिप्त इतिहासाला गौरवान्वित मानीत असतो.
कोणाचा इतिहास हा कपट नीतीने भरलेला असतो. अशा इतिहासाला काही लोक आदर्श इतिहासाचे
लेबल लावीत असतात. समाजातील एक वर्ग अशा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे स्वप्न
बघत असतो. गत इतिहासात काही पुरुष निर्माण झालेत, की ज्यांच्या विचारामुळे सामाजिक
व्यवस्था व मानवी जीवन नरकयातनाचे केंद्र बनलेली होते. असे विनाश पुरुष सुध्दा आज
त्यांचे आदर्श बनलेले आहेत. आजच्या वर्तमान काळात जे लोक अशा इतिहासाला व विनाश
पुरुषांना आपला आदर्श व गर्व मानून
Wednesday, December 30, 2015
Monday, December 28, 2015
शनिशिंगणापूर महिलांच्या अपमानाचे केन्द्र
भारत हा महिला विकासाच्या संदर्भात
आघाडीवर दिसत असला तरी महिलांच्या धर्म व पूजा स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये मात्र मागासच
दिसतो. वेदकालीन कालखंड ते
आजतागायत दिसणारे दृश्य बघितले तर, धार्मिक बाबतीमध्ये तो महिलांच्या अपमानाचे केंद्र बनलेला आहे. कोणी एकाने म्हटले आहे, भारत हा
मुर्ख लोकांचा देश आहे. धर्माच्या आतंकात तो एवढा बुडाला आहे की, त्यात तो
स्वत:च्या बुद्धीलाच हरवून बसतोय. धर्म व देव ह्या गोष्टी आल्या की त्यांचे विज्ञान व तर्क गळून पडत असतात. धर्मव्यवस्थेचा
तो पार गुलाम झालाय.
कोणीही, मग ती महिला असो वा एखाद्या खालच्या जातीचा असो,
त्यांनी शनी शिंगणापूरचा शनी असो वा तो ब्रम्हचारी हनुमान असो वा दुसरा कोणताही
देव असो, यांच्या मुर्त्यांना स्पर्श केल्याने कोणाचेही काही बिघडत नाही हे शनीशिंगणापूरच्या
घटनेने पुरते सिद्ध झाले आहे. स्पर्श केल्याने संकटाचे पहाड कोसळते, या ना त्या
प्रकारचे प्रसंग ओढवतात हे सारे थोतांड असल्याचे साऱ्यांना कळून चुकले आहे. देवाची
भीती हा पोटभरण्याचा धंदा झाला आहे.
Thursday, December 24, 2015
इतिहास से गर्व क्या? नया इतिहास भी तो निर्माण करो!
समाज का हर वर्ग या देश अपने अपने इतिहास पर गर्व करते है। किसी का इतिहास कुप्रथाओसे भरा होता
है, फिर भी वे अपने
मैले इतिहास को गौरवान्वित मानते है। किसीका इतिहास छल कपट से भरा होता है, ऐसे इतिहास को भी
कुछ लोक अपना आदर्श घोषित कर वर्तमान मे उसका प्रयोग करना चाहते है। गत इतिहास में ऐसे पुरुष पैदा हुवे है,
जिनकी विचारधारासे सामाजिक व्यस्वस्था तस की नस हो गयी थी। ऐसे
विनाशपुरुष भी आज किसीके गौरव है।
वर्तमान स्थिति में जो लोग तथा समूह ऐसे इतिहास को और कपट नितिकारोको अपना आदर्श
घोषित कर उनके विचारों पर अंमल करना चाहते है, वे लोग लोकतंत्र को नकारते है,
समानता से उन्हें डर लगता है, की जिससे वे अपना वजूद खो न बैठे।
अहंकारिता की कायरता उनके दिल दिमाग में बैठी होती है। इस
विचारधारा के लोग कभी भी बहुसंख्यांक नहीं होते।
अल्पसंख्यांक होते हुवे भी वे
Sunday, December 13, 2015
...... हा तर मुलभूत हक्क विरोधी निर्णय
हरियाणा सरकारकडून
राज्याच्या पंचायत निवडनुकामध्ये उभे राहण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली.
या नियमानुसार पंचायती निवडणुकांमध्ये उभे राहण्यासाठी किमान दहावीपर्यंतचे शिक्षण
पूर्ण असण्याची अनिवार्यता, तसेच वीज बिल व बॅक हप्ते न
भरणारे व थकबाकी असणारे लोक निवडणुकांना उभे राहू शकणार नाहीत. ज्यांच्यावर गंभीर अपराधिक
आरोप आहेत असे व ज्यांच्या घरी कार्यान्वित शौचालय नसेल अशा लोकांनाही निवडणूक लढविण्यापासून
हरियाणा सरकारने वंचित केले आहे.
सरकारच्या या निर्णयाविरुध्द दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात
सर्वोच्च न्यायालयाने हरियाणा सरकारच्या नियमांना वैध ठरविले आहे. सुप्रीम
कोर्टाचा हा निकाल वरकरणी चांगला वाटत असला तरी तो धक्कादायक आहे. हा निर्णय जनतेच्या निवडणूक
लढविण्याच्या मुलभूत हक्कावर गदा
Saturday, December 5, 2015
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जातीनिर्मुलन व आजची वास्तव स्थिती
भारतात जातीव्यवस्थेची भीषणता मांडणारे व जातीची लक्तरे जगाच्या वेशीवर
टांगणारे बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्ती होत. जातीची मीमांसा करताना ते
कोणासही भीत नसत. म्हणूनच जाती व वर्णव्यवस्थेची जननी असणाऱ्या मनुस्मृतीला जाळून
टाकण्याचे धाडस त्यांनी केले. कोणत्याही देशात न आढळणारी जातीसंस्था हा भारतातील
एक “महारोग” असे ते म्हणतात. हिंदू लोक बुद्धिहीन व अमानुष आहेत म्हणून जातीभेद
पाळतात असे नव्हे, तर ते अधिक धर्मपरायण असल्यामुळे जातीभेद पाळतात. त्यासाठी
त्यांच्या मनात जातीय वृत्ती रुजविणारा धर्म हाच जबाबदार आहे. बाबासाहेब म्हणतात,
जातीव्यवस्थेचे खरे शत्रू जातीभेद पाळणारे लोक नसून त्यांना जातीभेद पाळावयास
शिकविणारी शास्त्रे आहेत. शास्त्रवचने पवित्र व अपरिवर्तनीय असून ती सदैव पाळली
पाहिजे. ही मानसिक श्रद्धा लोकांच्या मनात ठासून भरली आहे. म्हणून प्रथम
शास्त्रप्रामाण्यावरील श्रद्धा नष्ट करने हाच खरा उपाय आहे असे ते म्हणतात. वेद व
शास्त्रे ह्याचे
Tuesday, December 1, 2015
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले जातीमुल्यांकन
बाबासाहेब आंबेडकरांचा “अनिहीलेशन ऑफ कास्ट” हा ग्रंथ असंख्य भारतीयांना अपरीचयाचा आहे. एखाद्या पुस्तकावर बाबासाहेब
आंबेडकरांचा फोटो व नाव दिसले की ते पुस्तकच अस्पृश्य होत असते. त्या पुस्तकांना
चाळने तर सोडाच, त्यावर नजर पडली तरी ते न पाहिल्यासारखे केल्या जाते. हा भारतीय
जातीयवादाचा अस्सल नमुना आहे. ह्या जातीय मानसिकतेमुळे डाक्टर आंबेडकरांचे अनेक
गाजलेली व तर्काने तुडूंब भरलेली पुस्तके सामान्य हिंदुच्याच नव्हे तर उच्चवर्णीय
हिंदुच्या ग्रंथालयातील बुकसेल्फ मध्येही मिळणार नाहीत. बाबासाहेबांचे अॅनिहीलेशन ऑफ कास्ट, कास्ट इन इंडिया व
अनटचेबल हे समाजशास्त्रावरील प्रभावी ग्रंथ भारतातील विद्यापीठात अभ्यासक्रमात
अजूनही लावले नाही. हे पाहता देशातील विद्यापीठे देखील जातीय मनोवृत्तीपासून
अलिप्त नाहीत असे म्हणावे लागते. आंबेडकरांचे
विचार न वाचताच त्यांच्याविषयी द्वेषमुलक भावना ठेवणारी पिढीच या देशात निर्माण करण्यात
आली आहे. काही संघटना द्वेषाचा हावारसा आजही चालवीत आहेत. तसे नसते तर
आंबेडकरांच्या विचारांनी हा देश कधीचाच आर्थिक व सामाजिक दृष्ट्या जापान व नेदरलंड
या देशाच्या रांगेत जावून बसला असता.
Friday, November 6, 2015
असहिष्णुतेचे विषाणू
इतिहासकार इरफान हबीब यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ या भाजपाच्या मातृसंघटनेची तुलना इसीस/तालिबानी अशा आंतकवादी संघटनेसी केली असल्याची बातमी अनेक वर्तमानपत्रात झळकली. त्यावर भाजप व संघीय नेत्यांचे तोल सुटलेले वक्तव्य व आगपाखड झालेले त्यांचे चेहरेही जनतेसमोर आले. यामुळे निर्माण झालेल्या मूळ प्रश्नाला बगल देता येणार नाही. इसीस/तालिबानी व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांच्या कार्यपध्दतीची तुलना सुध्दा निरपेक्ष पध्दतीने होणे आवश्यक आहे. इसीस/तालिबानी व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांच्यात बरेच साम्य बघायला मिळते. ते दोघेही कट्टर धर्मवादी असून आपली विचारसरणी दुसऱ्यावर थोपविन्याच्या बाजूचे आहेत. इसीस/तालिबानी स्त्रियांवर बंधने आणू इच्छितात तर स्त्रियांवर बंधने घालणारा मनुस्मृती हा संघासाठी प्रिय ग्रंथ आहे. इसीस/तालिबानी आपल्या विचाराविरोधी कृत्यासाठी खुणसूत्र घडवून
Friday, October 23, 2015
वंचितावरील (दलित) अत्याचारात लक्षणीय वाढ
याअगोदर वंचित (दलित) समाजावर जातीय अत्याचार होत
नव्हते असे नाही. कांग्रेस सत्तेमध्ये असलेल्या महाराष्ट्रात अमानुष असे खैरलांजी हत्याकांड
झाले. सातारा जिल्ह्यातील मुळगाव (२०१२) येथे रेखा चव्हाण या महिलेस विवस्त्र करून
लाकडी दांडक्याने मारहाण करीत गावातील रस्त्यांवर फिरविण्यात आले होते. अहमदनगर
जिल्ह्यातील सोनई, खर्डा आणि पाथर्डी याठिकाणी वंचित समाजावरील अत्याचाराच्या
कौर्याने तर परिसीमा गाठली. सतरा वर्षीय नितीन आगे यास उच्चवर्णीय मुलीसोबत प्रेमसंबंध
असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली व त्याचे शरीर झाडाला अडकविण्यात आले होते.
सोनई गावात तीन तरुणांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती तर सातारा जिल्ह्यात शेतात
विहीर खोदली म्हणून मधुकर घाटगे यांची निर्घुण हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे
करण्यात आले होते. वसई येथे महापुरुषाबद्दल अपशब्द उच्चारल्याचा जाब विचारल्याने एक
पत्रकारासह दोन भावावर तरुणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला
Friday, October 9, 2015
असा भारत हवाय कुणाला?
भारतीय
घटनेने लोकशाही जीवन प्रणालीची सर्व समावेशक व्याख्या केली आहे. न्याय,
स्वातंत्र्य,समता आणि बंधुभाव ही मूल्ये लोकशाही जीवन प्रणालीचा गाभा आहे.
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे
स्वातंत्र्य व संधीची समानता याचे सोबतच व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्रीय एकता
निर्माण करणाऱ्या बंधुतेवर तिने भर दिला आहे. असे असले तरी वरील मुल्यांचा
वेगवेगळा व सुट्या पध्दतीने विचार करता येत नाही. प्रत्येक मूल्य एकमेकाशी अतूटपणे
जोडले गेले आहे. ह्याच एकत्रित जीवन प्रणालीला “लोकशाही जीवन” असे म्हटले जाते.
प्रत्येक भारतीयाने ही “लोकशाही जीवनप्रणाली” जपने अपेक्षित आहे. ह्या “लोकशाही
जीवन” पध्दतीला तडे गेल्यास तिचे फार अनिष्ठ परिणाम होवू शकतात. याची अनेक उदाहरणे
आज बघायला मिळतात. अफगाणिस्थान मध्ये तालिबानने, सिरीया व इराक या देशात इसीसने तर आफ्रिकेमधील काही
देशात बोको हराम सारख्या संघटनांनी ‘एकात्म लोकशाही जीवनप्रणाली’ ला आवाहन देत ती
उधळून लावीत आहेत. मानवतेला मोठ्या हिंसक, विक्राळ व क्रूर पध्दतीने चीरडण्याचे
त्यांचे मनसुबे आहेत. धर्मांधतेवर आधारित संघटना कोणत्या थरावर जातात याचे हे
ज्वलंत व मूर्तिमंत उदाहरण आहे.
Friday, September 25, 2015
आरक्षणाची नाकेबंदी
भारतीय समाज व्यवस्थेचा इतिहास बघितल्यास विविध प्रकारच्या लादलेल्या कृत्रिम
परंपरामुळे समाजात असमानता, विषमता, गुलामी प्रवृत्ती व अस्पृश्यता उदयास आली. ह्या
व्यवस्थेमध्ये देशातील फार मोठा वर्ग बळी पडला होता. त्यांचे मौलिक हक्क पूर्णत:
हिरावल्या गेले होते. सामाजिक सन्मान, शिक्षणाचा गंध व आर्थिक समृध्दी ही
त्यांच्या पासून कोसो दूर होती. होती ती फक्त गुलामी. ब्रिटीश भारतात हे सारे
बदलण्याची सुरुवात झाली नसली तरी पाश्चात्य देशातील समतेच्या विचारानी भारताच्या
सीमा भेदल्या होत्या. नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक
असमानता दूर केल्याशिवाय भारतात समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण होणार नव्हती. त्यासाठी
भारतीय घटनेने हा हजारो वर्षाचा कलंक दूर करण्यासाठी मागासलेल्या समाजघटकांना
प्रगतीच्या संधी उपलब्ध्द व्हाव्या म्हणून राज्य घटनेने अनु.जाती व जमातींसाठी अनुच्छेद १४ ते १८, २९(२) आणि ४६ व्या कलमाद्वारे विशेष
Wednesday, September 23, 2015
Thursday, September 17, 2015
आदिवासीसाठी धोक्याची घंटा: एक दृष्टीक्षेप
आदिवासी समुदायाचा इतिहास हा त्यांच्या स्वतंत्र
धर्म, संस्कृती, समृध्दी व भाषेचा इतिहास आहे. त्यांच्या स्वतंत्र लोकशाही पध्दतीमध्ये समानता, बंधुता
आणि स्वातंत्र्य याचे आचरण आहे. सहचार, सहविश्वास व सहमदत हा त्यांच्या जीवनाचा
भाग. आपला स्वतंत्र धर्म व संस्कृती कोणावरही न लादता दुसऱ्याच्या धर्माचा भार
आपल्या अंगावर वाहून वा लादून घेणे हा आता त्यांच्या नैसर्गिक स्वभावातील कृत्रिम
शैली झालेली आहे. निसर्गावर त्यांची अतीव श्रद्धा असून दऱ्याखोरया, डोंगरे, जल,
जंगल व प्राणीमात्रासी त्यांचा सबंध ही त्यांची जीवनशैली. आदिवासी समाज हा जसा
जंगलात रमला तसा तो गावकुसाच्या आतमध्ये एका टोकाला वसला.
Tuesday, August 25, 2015
चळवळीत नवचैतन्य निर्माण करणाऱ्या तरुण नेत्याची गरज
आता देशात असंतोषातून आंदोलने पेटू लागलेली आहेत. गुजरात मध्ये आरक्षणाच्या
मागणीसाठी चाललेल्या आंदोलनामध्ये एक हितेश पटेल हा तरुण पटेल समुदायाचे नेतृत्व
करताना दिसतोय. त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास १० लाखाचा समुदाय आंदोलनात सहभागी होतो.
हितेश पटेल या तरुणाच्या संघटन कौशल्याला दाद द्यावी लागेल. दुसरा अल्पेश ठाकूर हा
तरुण ओबीसी जातीचे नेतृत्व करून पटेल समुदायाला मागणीला आव्हान देतो. एकूणच गुजरातचे
२२ ते २५ वयोगटातील तरुण त्या त्या समुहाचे नेतृत्व करताना दिसतात.
महाराष्ट्राचे तरुण याबाबतीमध्ये मागेच दिसतात. मागच्या सहा दशकापासून
आंबेडकरी राजकीय व सामाजिक चळवळ ही गंजलेल्या, विकावू, स्वार्थी व दलालांच्या
हातामध्ये आहे. याकडे आंबेडकरी तरुण केवळ ओशाळल्यागत नजरेने पहात आहे. परंतु
गटातटाच्या या मस्तवाल बैलांना कोणीही प्रश्न विचारन्याची हिंमत करीत नाही. आताच्या
या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील बैलांना समाजाचे कोणतेही प्रश्न दिसत नाहीत.
बेरोजगारी, शिक्षणाचा प्रश्न, दलितांवरील सामाजिक बहिष्काराचा प्रश्न, नोकऱ्यांचा
प्रश्न, खाजगी संस्थामध्ये आरक्षणाचा प्रश्न, आरक्षनाच्या अंमलबजावणीचा प्रश्न,
महिलावरील अत्याचाराचा प्रश्न व राजकीय सत्तेमध्ये स्वत:च्या ताकदीवर उभा
राहण्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. पण समाज भरडत असलेल्या विविध प्रश्नावर ह्या
बैलांनी तोंडाला कुलूप लागल्यागत केले आहे. ह्या अज्ञानी, प्रश्नाची समज व त्याची
खोली माहीत नसलेले व बोलण्याचा ढब नसलेल्या नेत्यांचा भार आता का सहन करायचा? सिंग
नसलेल्या ह्या बैलांना चळवळीच्या मार्गातून बाहेर फेकण्याची वेळ आली आहे.
वेगवेगळया पागाच्या (गटांच्या) या बैलांची वेसन धरून त्यांना गोठ्यात जेरबंद केले
पाहिजे.
नवचैतन्य निर्माण करणारे तरुण आता समाजाचे नेते झाले पाहिजेत. त्यासाठी
तरुणांनी सामाजिक, राजकीय व आर्थिक अशा विविध विषयाचे ज्ञानकौशल्य प्राप्त करून
समाज मनाला सरळ हात घालेल असे संभाषण कौशल्य साधले पाहिजेत. संघटन शक्ती व जनतेचे
मुद्दे घेवून जो तरुण समाजात जाईल त्याला आपोआपच नेतृत्व मिळेल. गंज लागलेल्या बैलांना
बाजूला सारून तरुणांनी समाजाचे नेतृत्व केले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना तरुणाकडून
भरपूर आशा होत्या.
बापू राऊत
Saturday, August 22, 2015
शिवाजी महाराज, शिवसेना व पुरंदरे
Sunday, August 9, 2015
Thursday, July 23, 2015
सामाजिक, आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षण – २०११: एक दृष्टीक्षेप
सामाजिक, आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षण - २०११ चे आकडे भारत सरकारने नुकतेच
प्रकाशित केले. शीर्षकात “जातनिहाय सर्वेक्षण” असे नाव असले तरी सरकारने
कोणत्याही जातीचे नाव न घेताच जातीविहीन
आकडे प्रकाशित केले आहेत. यातून जातीची लपवाछपवी चालू असल्याचे दिसते. जनगणनेच्या
प्रसिध्द झालेल्या आकडेवारीवर अनेक अर्थातज्ञानी आक्षेप घेतलेले आहेत. संपूर्ण
जनगणना झाली असतानाही शहरी आकडेवारीला बगल देत केवळ ग्रामीण भारताची आकडेवारी
जाहीर करण्यात आली. सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून
देशात गरिबांची संख्या वाढलेली असतानाच अनुसूचित जाती व जमातीचे आर्थिक चित्र भयावह
असेच आहे. देशातील तीन कुटुंबापैकी एक कुटुंब हे भूमिहीन आहे. देशात अनुसूचित जाती
व जमातीच्या भूमिहीनांचे प्रमाण अधिक वाढलेले
Friday, June 26, 2015
शाहू महाराज व बहुजनवादी चळवळ
आज देशात बहुजनवादी राजकारण व समाजकारणाची धार अधिक तीव्र झालेली दिसते. आपल्या
हक्कासाठी बहुसंख्य असलेल्या मध्यम व मागास जातींनी एकत्र येवून अल्पसंख्य परंतु
पुढारलेल्या व शोषक धर्मसत्ताक जातीविरुध्द केलेली चळवळ म्हणजे “बहुजनवादी चळवळ”
असी प्रचलित व्याख्या आहे. या बहुजनवादी चळवळीची नाळ ही २५०० वर्षापूर्वीच्या
तथागत गौतम बुद्धाच्या काळापर्यंत जाते. गौतम बुद्धांच्या “बहुजन हिताय बहुजन
सुखाय” या शब्द रचनेची फोड केल्यास पुढारलेल्या व धर्मसत्ता हाती असणाऱ्या
अल्पसंख्यांक जाती ह्या अशिक्षित शेतकरी,
अलुतेदार, बलुतेदार, व्यापारी ह्या बहुसंख्यांक जातीचे आर्थिक, सामाजिक व धार्मिक शोषण
करून स्वत: मजेत जीवन जगत असत. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तथागत
बुद्धाने “बहुजन हिताय बहुजन सुखाय” ची हाक
बहुजनांना दिली होती.
Sunday, June 14, 2015
उजवीकडे झुकलेल्या नेते व विचारवंताचा चळवळीवरील प्रादुर्भाव
पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील श्री रावसाहेब कसबे यांनी
पुरोगामी चळवळीच्या ऱ्हासाचे कारण दलितांचा ब्राम्हणद्वेष असल्याचे सांगितले.
रावसाहेब कसबे यांच्या या वाक्याला प्रसिध्दी माध्यमांनी लागोलाग प्रसिध्दी दिली. झी
टीव्ही वर रावसाहेब कसबे, शेषराव मोरे व हरी नरके या तथाकथित विचारवंतांना चर्चा
करण्यासाठी बोलाविन्यात आले. टीव्ही स्वर उद्घोषक जसे नेहमी नेहमी हिंदुस्थान
हिंदुस्थान म्हणून बळरत असतात. तसेच काहीसे उदय निरगुडकर नावाचे झी चे उद्घोषक
समरसता समरसता नावाचा सतत होषा करीत होते. समता या शब्दावर समरसतेचे आक्रमण होते
असे निरगुडकराना ठणकावून सांगण्याची हिंमत रावसाहेब कसबे, शेषराव मोरे व हरी नरके
यांना झाली नाही. हे दुर्दैवच आहे. चर्चेमध्ये या तिघाही तथाकथित
Monday, May 11, 2015
“पत” हरविलेली आंबेडकरी राजकीय चळवळ
लोकसभा, विधानसभा व नुकत्याच झालेल्या औरंगाबाद, नवी मुंबई महानगरपालिका
तसेच काही नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल बघा. रिपब्लिकन पक्ष व बहुजन समाज
पक्ष या पक्षांच्या राजकीय ताकदीचा अंदाज झालेल्या या निवडणूक निकालावरून दिसतो.
रिपब्लिकन नेत्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिलेली आहे. बहूजन समाजाचे
मताचे राजकारण करून आपली स्वत:ची झोळी भरणारे आठवले, गवई, कवाडे, मायावती व आंबेडकर
या सर्वांना बहुजन जनतेने चांगलाच धडा शिकविलेला दिसतो. त्यामुळे एकूणच
आंबेडकरवादी राजकीय पक्षाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. आंबेडकरी जनतेने वर्षानुवर्षे जे स्वप्न बघितले होते ते एम.आय.एम
सारख्या नवीन पक्षाने मुस्लीम समाजामध्ये स्वाभिमान व आत्मभान जागृत करून पहिल्या
निवडणुकामध्येच विधानसभा व महानगरपालीकामध्ये प्रवेश करून दाखवून दिले.
Subscribe to:
Posts (Atom)





