Saturday, August 15, 2020

बाळ गंगाधर टिळक हे लोकमान्य कसे ? भाग २ (उत्तरार्ध)

टिळक, मी सुधारणांना पाठींबा दिल्यास माझ्या सार्वजनिक कार्यास बाधा येईल असे म्हणत. कधी सुधारणेस संख्येची अट घालत व नंतर त्यास नकार देत.  परधर्मीय व विदेशी मॅक्सम्युलरने वेद वाचले ते टिळकांना व त्यांच्या कर्मठ धर्मांधाना कसे चालले? पण तेच वेद आपल्याच ब्राह्मणेत्तर हिंदूनी वाचू नये आणि वेदांद्वारे संस्कार करण्याचा हक्क त्यांनी मागू नये असे म्हणणार्‍या टिळकांची नीती दोगलेपणाची असून ती आपल्याच हिंदू लोकाविरोधी होती. 

कायदेमंडळात जावून कुणब्याने नांगर हाकावयाचे नाहीत किंवा वाण्यांनी तागड्या धरावयाच्या नाहीत असे म्हणनार्‍या टिळकांनी सदैव तेल्यातांबोळ्याचे व शेतकर्‍यांचे नुकसान केले. त्यांना अशिक्षित व अज्ञानात ठेवून केवळ आपले पाठीराखे बनविले. पण याच तेलीतांबोळी व शेतकर्‍यांनी टिळकांच्या अथनीच्या सभेतील असभ्य वक्तव्यानंतर त्यांच्या पुढील सभा उधळून लावल्या होत्या. अहोरात्र कष्ट करून व अज्ञानी राहून अन्नधान्य पिकविणार्‍या शेतकर्‍यास शूद्र व कुणबट असे कुत्सितपणे संबोधणारे टिळक, गरिबी व शोषणामुळे सावकारांचे कर्ज फेडू न शकणार्‍या आपल्याच शेतकरी बांधवांना कारावासात पाठवा असे ब्रिटीशास सांगणारी व्यक्ति देशभक्त तरी कशी ठरू शकते? या विवेचनानुसार टिळकांचे स्थान कोठे असावे हे ज्यांनी त्यांनी आपल्या वैचारिक कुवतीनुसारच ठरविलेले बरे.

ज्या दिन, हीन, दुबळ्या व असहाय अस्पृश्याविषयी प्रत्येक जाणत्या माणसांचे अंत:करण पिळवटत असे, अशांची प्रतारणा करण्यासही टिळकांनी कमी केले नाही. जातवार निवडनुकींचा प्रश्न पुढे येत नव्हता तोपर्यंत जातीभेदांचे समर्थन परंतु हेच वर्ग जेव्हा स्वतंत्र प्रतिनिधित्व मागू लागताच अशाने जातीजातीत वैमनस्ये माजुन जातिभेद नष्ट होणे लांबणीवर पडेल, असे म्हणून ब्राह्मणेत्तरांचे व अस्पृशांचे नुकसान करण्यास त्यांनी कंबर कसली होती. टिळकांचा हिंदू धर्म ब्राह्मणाशिवाय इतर दुसर्‍या कोणाच्याही हक्काचा नव्हता. ब्राह्मणेत्तरांना हिंदू धर्माच्या चालीरीती व धर्मशास्त्रातील वचनांना हात लावण्याचा कोणताही अधिकार नव्हता. ब्राह्मणाशिवाय कोणत्याही धर्मसुधारणा होवू शकत नव्हत्या. ब्राह्मणांची संमती असल्यासच असे होवू शकते. ही टिळकांची एक श्रध्दा होती. अशा संकुचित विचारांचे टिळक लोकमान्य कसे?

बहुजनांच्या मुलामुलींच्या शिक्षणास विरोध करून स्त्रियांच्या शिक्षणाने नुकसान पदरी पडते असे सांगून आपल्या हयातीच्या अंतापर्यंत मुलींच्या सक्तीच्या शिक्षणास त्यांनी विरोध केला होता. स्त्रिया शिकल्यास त्या  पुरुषाप्रमाणे संशयित बनून गृहसौख्याचा नाश होईल असे म्हणणारे टिळक पंडिता रमाबाईच्या शारदासदनास पुण्यातून हाकलून लावतात. बालिका विवाहास पाठींबा देवून विधवांच्या पुनर्विवाहास विरोध करणारे टिळक, बालपणात लग्न झालेल्या रखमाबाईस आपल्या वयस्क व बिमार नवर्‍यासोबत राहण्यास भाग पाडण्यासाठी आपली लेखनी झिजविणारे टिळक किती महिला विरोधक होते याची एक मोठीच यादी होईल. ब्राह्मणांच्या वर्चस्वासाठी वेदोक्त प्रकरणात तुमचे राज्य खालसा करण्यास सरकारास सांगू अशी शाहू राजेना धमकी देणारे टिळक लोकमान्य कसे ठरू शकतात?

डॉ.आंबेडकर म्हणतात, कोणी काहीही म्हणो, श्रीधरपंताच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ होती. तेलीतांबोळी म्हणून बहुजन समाजाचा उपहास करणार्‍या व्यक्तिला “लोकमान्य” म्हणणे म्हणजे लोकमान्य या शब्दाचा विपर्यास करणे होय. लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकास सजली असती तर ती श्रीधरपंतासच होय. श्रीधरपंत हे टिळकांचे सुपुत्र होत. टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही. खरा लोकसंग्रह श्रिधरपंतच करू शकले असते. तो करण्यास ते उरले नाहीत, ही महाराष्ट्रावरील मोठीच आपत्ति होय.

काही लोकासाठी टिळक लोकमान्य असतील परंतु ते देशाचे लोकमान्य नेते ठरू शकत नाही. हे लक्षात घ्यावे लागते. ज्या देशातील लोकांना आपल्या जातीचा अभिमान आहे व जी व्यक्ती तो जातीभिमान कायम ठेवण्यासाठी सतत व्यवस्थेसी टीकेची तमा न बाळगता इतरांना अंधाराच्या कोठडीत कायम ढकलतो असा व्यक्ती त्या जातीसाठी “लोकमान्यच काय देव” ही ठरू शकतो. हे जरी खरे असले तरी अशी व्यक्ती उन्नती व विवेकाच्या वाढीसाठी  मारक व घातकच ठरत असते.



10 comments:

  1. अत्यंत निर्भिड, संदर्भासह आणि चांगल्या पध्दतीने मांडणी केली आहे. धन्यवाद.
    डॉ. शमसुद्दिन तांबोळी,अध्यक्ष मुस्लीम सत्यशोधक मंडळ. फोननंबर 9822679391

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद साहेब. टिळकांच्या संदर्भात अनेक बाबतीमध्ये विस्तृत मांडणी मी माझ्या आगामी "बाळ गंगाधर टिळक: एक चिकित्सा" या पुस्तकात केली आहे. हे पुस्तक डिसेंबर २०२० ला प्रकाशित होईल.

      Delete
  2. दोन्ही भाग वाचले.
    बाळगंगाधर टिळक यांचे सामाजिक सुधारणा संदर्भातातील विचार त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या मर्यादा दाखवतात. तसेच समकाळीन सुधारकांना विरोध त्यांच्या लोकमान्यतेवर प्रश्न उपस्थीत करतात.
    डॉ. शमसुद्दिन तांबोळी,अध्यक्ष मुस्लीम सत्यशोधक मंडळ
    9822679391

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद साहेब. टिळक हे स्वराज्यापेक्षा सामाजिक व्यवस्था कायम ठेवण्यासाठी झटत होते. त्यांना लोकमान्य हे कवण त्यांच्याच शिष्यांनी दिले होते. टिळकांच्या संदर्भात अनेक बाबतीमध्ये विस्तृत मांडणी मी माझ्या आगामी "बाळ गंगाधर टिळक: एक चिकित्सा" या पुस्तकात केली आहे. हे पुस्तक डिसेंबर २०२० ला प्रकाशित होईल.

      Delete
  3. प्रथमच टिळकांची दुसरी बाजू वाचण्यात आली. जर टिळकांचे असे व्यक्तिमत्व असते तर इतके वर्ष तुम्ही म्हणत असलेले सत्य प्रकाशझोतात आले का नाही, हा ही एक प्रश्न आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. सर टिळकांची दुसरी बाजू प्रकाशात आली नाही याचे कारण साहित्यिक क्षेत्र हे त्यांच्यावर श्रध्दा असणार्‍या लोकांच्या हातात होती. तरी चौधरी यांचे दोन खंड साहित्य मंडळाने प्रकाशित केले आहेत. त्यात बरीच माहिती आली आहे. तसेच इंग्रजी भाषेतिल पुस्तकात संशोधित साहित्य प्रकाशित झाले आहे.

      Delete
  4. अगदी वास्तव लेख. टिळकांना लायकी नसतांना लोकमान्यांचा दर्जा त्यांच्याच 'जात बांधवांनी' दिला हे खर.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद साहेब. टिळक हे लोकमान्य नव्हतेच. ते शेतकरी, स्त्रिया आणि ब्राम्हणेत्तर यांचे कट्टर विकास विरोधक होते.

      Delete
    2. आपले कार्य थोर आहे सर !!! पण आपण काही मुद्दे मिस केलेत , म्हणजे मुलींचे विवाह वय आणि त्यांची जातीयवादी भूमिका , ताई महाराज यांनी लावलेला बलात्काराचा आरोप, मंडाले तुन आल्यानंतर ब्रिटिशांना सपशेल शरण जाणे रँड चा खून देशप्रेमातून नव्हे तर ब्रिटिश जातीय वाद शिवाशिव पाळत नाही म्हणून झाला

      Delete
  5. तररी पोहे खाणार का.

    ReplyDelete