Thursday, March 29, 2012

ग्रेस- जात लपऊन जगलेला एक महाकवी

कवी ग्रेस हे मराठी विश्वातील महान कवी. जेव्हा पासून मराठी साहित्याबाबत कळायला लागले तेव्हापासून साहित्यिकांच्या जन्मकुंडली (इतिहास) जमा करायला लागलों होतो. आंबेडकरवादी युवक म्हणून आंबेडकरी समाजातील लेखक, कवी  कथाकार यांची यादी बनवायला लागलो. कवी ग्रेस (माणिक गोडघाटे) यांची कुंडली महार जातीची असल्यामुळे त्यांचे नाव माझ्या यादीत येणे स्वाभाविकच होते. 1990-93 च्या कालावधि मध्ये आनंदवन (आनंद निकेतन कालेज, वरोरा) येथून बीएस्सी झाल्यानंतर नागपूरला पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी जाणे झाले. मी सायन्सचा विद्यार्थी असलों तरी मराठी साहित्याबाबत मला अधिक रूचि होती. त्यातच माझे काही मित्र माँरीस कालेजमध्ये मराठीचे विषयाचे विद्यार्थी होते. त्यामुळे माँरीस कालेजच्या वस्तीगृहात (हॉस्टल) नेहमी जायचो. होस्टेलमध्ये आंबेडकरी साहित्य/राजकारण व चळीवर चर्चा होत असताना आंबेडकरी समाजाच्या साहित्यिकांच्या भूमिकेबाबत चर्चा होत असे. तेव्हा कवी ग्रेस मारिस कालेजमध्ये प्रोफेसर होते. कवी ग्रेस यांचे नाव चर्चेत येत असताना बहुतेकजन कवी ग्रेस यांच्यावर नाराज असत. कवी ग्रेस हे समाजाच्या वेदना आपल्या साहित्यातून मांडत नाहीत, हि त्यांची मुख्य खंत होती. एकंदरित दलित साहित्य व दलित् च हे ग्रेस यांचे विषयच नसत. तर रानावनातील, प्रेमाच्या, फुलांच्या, डोंगरदऱ्यातील कविता अशा आखीव ब्राम्हणी जगतातील विषय  त्यांच्या ओठावर नेहमीच तरळत असायचे. 

त्यामुळे आंबेडकरी विद्यार्थी त्याना भटाळलेला ग्रेस असे म्हणायचे. मात्र त्याचवेळेस सुरेश भट हा ब्राम्हण समाजातील  कवी/गझलकार आंबेडकरी विद्यार्थ्याना आपलासा वाटायचा. समाजाच्या वेदना त्यांच्या साहित्यात शोधायचे. आंबेडकरी विद्यार्थी सुरेश भटाकडे ये-जा करीत. सुरेश भट नेहमीच मी राहत असलेल्या धरमपेठेतील नागपूर विद्यापीठाच्या वस्तिगृहात येत असत. ज्या आसूयेने कवी ग्रेस यानी आंबेडकरी समाजाकड़े व समाजाच्या ज्वलंत विषयाकडे पाठ फिरविली होती त्याच गतिने आंबेडकरी समाजानेही कवी ग्रेस यांनाही एकप्रकारे दुर्लक्षितच केले होते. कोणत्याही फुलेआंबेडकरी विचारपीठावर कवी ग्रेस यांना माझ्या माहीतीनुसार निमंत्रण नसे. परंतु त्यांची उपस्थिती नागपुरच्या रामदासपेठ पासून पुणे-मुंबई पर्यंत ब्राम्हणी व्यासपीठावर असायची.

कवी ग्रेस यांनी कधीच सामाजिक बांधिलकी मानली नाही. तर सामाजिक बांधिलकीला फाटयावर आपटुन स्वत:च्याच मस्तीत जगनारे ग्रेस आयुष्यभर स्वांतसुखाय व आत्ममग्न दुनियेत जीवन जगत राहिले. तो कवितेच्या प्रांतातील मस्तकलंदर प्रतिभावान माणूस होता. कवी ग्रेसच्या कविताना हात लावून उणीवा दाखविनारा कोणीही लाल महाराष्ट्रात तयार झाला नाही वा तसी कोणी हिंमतही केली नाही. त्यांच्या कवितावर अनेकजन भाले. कवी ग्रेस यांना मानणारा खास चाहता वर्ग महाराष्ट्रात आहे.  महाराष्ट्रात एक शब्दप्रयोग नेहमीच वापरला जातो. तो शब्द म्हणजे "सारस्वत". महाराष्ट्रातील सारस्वतानी यांना न्याय दिला नाही. महाराष्ट्रातील सारस्वतानी ग्रेसला फार डोक्यावर घेतले असे अनेक जन बरत असतात. हे तथाकथित सारस्वत आहेत तरी कोण?. मराठी साहित्यातील ब्राम्हणी साहित्यिकाना सारस्वत म्हटल्या जाते. कारण मराठी साहित्य ब्राम्हणांच्याच घराच्या दारातून बाहेर पडते असा गोड समज भोळ्या व गुलामी प्रवृत्तीच्या बहुजन मराठी लोकांचा व साहित्यिकांचा आहे. या सारस्वतानी म्हणे सारस्वत जमातीच्या नसलेल्या मोठमोठ्या प्रतिभावान बहुजन मराठी साहित्यिकांची वाट लावली. तर सारस्वताच्या जमातीतील सुमार दर्जाच्या लोकांना महाकवी बनवून मोठमोठ्या पुरस्काराने सन्मानित करून मराठी लोकांच्या कराच्या पैशातून त्यांचे जीवन सुखी केले आहे.

कवी ग्रेस सारख्या महाकवीलाही या तथाकथित सारस्वतानी सन्मानित केले नाही. हे कवी ग्रेस यांना नेहमी सलत असावे. म्हणून ते म्हणतात "माझी छाती फोडली तरी जाणवे दिसत नाही" म्हणून ब्राम्हण मला लाथा मारतात”. ब्राम्हणांच्या हातून सन्मानित होण्यासाठी कवी ग्रेस उर्फ माणिक गोडघाटे यांनी आंबेडकरी साहित्य चवळीचा डंका सा-या देशभर फिरत असताना, आंबेडकरी साहित्य (दलित साहित्य) साहित्याच्या विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवीत असताना, दलितांच्या झोपडया जत असताना व त्या आगीत दलिताना झोकल्या जात असतानाही  कवी ग्रेस निष्ठुर बनला होता. केवळ सन्मान व पुरस्कारासाठी दलितांच्या व्यथा, त्यांचे दु:ख या महाकविने जगाच्या वेशिवर टांगले नाही. सारस्वताकडून होणाऱ्या  केव फसव्या सन्मानासाठी हा महाकवी असा वागला का?. या सारस्वताकडून अपेक्षित सन्मान मिळाला नाही आणी ज्या समाजाच्या रक्तमासाचा मी होतो त्या समाजानेही मला आपले मानले नाही, गोंजारले नाही, सन्माणित केले नाही याची खंत कवी ग्रेस यांना सरतेशेवटी झाली. म्हणूनच ते एका मुलाखतीत म्हणतात मी महार, पण, ब्राम्हणाळलेला म्हणून महार मला लाथा मारतात. मला जव करीत नाहीत. माझी साधी विचारपूसही होत नाही.

नागपुरात त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार समयी ग्रेस यांचे कवी धर्मानुसार अंत्यसंस्कार व्हावेत असी सूचना करण्यात आली होती. या कवि धर्माची कोणती अंत्यसंस्कार नियमावली आहे?. असा हा कोणता नवा धर्म होता?. आजपर्यंत कोणत्या ब्राम्हणी कवीचे (साहित्यिकांचे) अंत्यसंस्कार कवि धर्मानुसार झाले?. याचा लेखाजोखा नसतानाही कवी ग्रेसच्या बाबतीत तो अट्टाहास करण्यात आला होतास्तब्ध्द व निरामय वातावरणात गोंधळाची परिस्थिती असतानाच अचानक काही बौध्द भिक्षूक पुढे आले. त्यांनी महाकवी ग्रेस यांचे शेवटचे क्षण बुध्दम सरणंम गच्छामी, संघम सरणंम गच्छामी” या बुध्दवाणीने सांगता केले. हा आंबेडकरी समाजातील “कालीदासाच्या शेवटच्या इच्छेचा परिपाक असावा.  

बापू राऊत, मुंबई 

11 comments:

  1. Hi mahiti vilkshan dhakka denari aahe.

    ReplyDelete
  2. Great people are beyond cast.All of us are very tiny before them. Please dont attach labels to any great poet.
    Just for your reference, from Maharshi Vyas ,Valmiki, to Patthe Bapurao and Annabhau Sathe toNarayan Surve....All Great poets areNON Bramhins.their artwork is timeless!

    ReplyDelete
  3. मला हे माहित नव्ह्तं ..................... माहितीपुर्ण लेख आहे हा.......

    ReplyDelete
  4. kavichi jaat kadhanara mahaan lekhak.. Bapu Raut

    ReplyDelete
  5. कवी ग्रेस बद्दल पहिल्यांदा माहिती झाली.

    ReplyDelete
  6. Apan sarswat yacha "soyeeskar "arth lavlela aahe . kontyahi lekhakala marathi maansane duj bhav diella nahi .eki kade marathi rasik ,abhaysak mhanaycha ani tyat he asal lokanchya dokyat pillu sodun dyayach . je khare abhays karatat tyana asali mahiti avanar nahi

    ReplyDelete
  7. ग्रेसांचा सन्मान झाला नाही हे म्हणणे सारासार हास्यास्पद आहे.
    जरा त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी द्या त्याचबरोबर ते कोणी दिले हे पण सांगा

    आपल्या लेखात इतर समाजाचा तिरस्कार व ग्रेसांनी त्यांच्या समाजासाठी काहीच केले नाही याची खंत जाणवते.

    साहित्यिक वा कलाकार यांना विशिष्ट समाजाचे लेबल लावून त्यांची प्रतिमा व प्रतिभा कमी करू नका

    ReplyDelete
  8. खर तर साहित्यिकांना जात धर्म नसते आणि जो जाती धर्मााच्या कक्षा ओलांडून साहित्य निर्माण करथो तोच खरा साहित्यिक
    ग्रे्स मराठी साहित्य विश्वातील ग्रेट साहित्यिक होते

    अशा महान व्यक्तिमत्वास लाख सलाम

    संजय शिवरकर

    ReplyDelete
  9. असेही काही असतात जे पुरस्कारासाठी जात लपवून ठेऊन, टोपण नाव धारण करून लिखाण करतात. शेवटी त्यांचाही भ्रम निराश च होतो. इथली जात व्यवस्था इतकी मजबूत आहे की ते एखाद्याची जात ही सहज शोधून काढतात आणि जर तो खालच्या जाती मधील असेल तर त्याला दुर्लक्षित करतात.

    ReplyDelete
  10. समाज सेवक /साहित्यिक /कलाकार यांची जात नसते व त्यांच्या जातीवर लिहू पण नाही, मग ती व्यक्ति कोणीही असोत, पण आता हे तुम्हाला कोण सांगेल......

    ReplyDelete