पक्ष
|
२००७ व २०१२ मध्ये मुख्य पक्षाना
मतांची मिळालेली एकूण टककेवारी
|
|
२००७
|
२०१२
|
|
बसपा
|
३०.४३%
|
२६%
|
सपा
|
२५.४३%
|
३०%
|
कांग्रेस
|
८.६१%
|
१४%
|
भाजपा
|
१६.९७%
|
१५%
|
निवडणुकीच्या निकालाने जसे भाजपा व कांग्रेस ला
झटका दिला त्यापेक्षाही तो मायावातीला अधिक विचार करायला लावणारा आहे. मायावतीने
या निकालाचे मंथन करायला पाहिजे. आपल्या पराभवासाठी कांग्रेस, भाजपा व मुसलमानाना जबाबदार धरणे
हे चुकीचे असून जनतेने दिलेला कौल खुल्या मनाने स्वीकारवयास पाहिजे होता.
अपयशाच्या कारणाचा शोध घेऊन जनतेचे प्रश्न समजून घेऊन पुढील काळात जनतेचा विश्वास
परत संपादन करू असी प्रतिक्रीया बहेनजीनी दिली असती तर ते अधिक सयुंक्तिक ठरले
असते.
नेहमी चर्चेत असणारे विषय, जसे की उत्तर प्रदेशातून देशाच्या
अन्य भागांत विशेषत: रोजगारासाठी मुंबईत होणारे स्थलांतर रोखणे, बुंदेलखंड व पूर्वांचल ह्या अतिमागास
प्रदेशात विकासाच्या संधी उपलब्ध्द करुन न देने याबरोबरच विरोधी पक्षानी मायावतीनी
उभारलेले पार्क, उद्यान व पुतळ॓ यावर जनतेचे लक्ष केन्द्रित
करुन हा जनतेच्या पैशाची मायावतीनी केलेली धूळधानी आहे हे जनतेला पटवून देण्यात
विरोधी पक्ष यशस्वी झाले. प्रसार माध्यमानी राहुल गांधीचा केलेला अवास्तव प्रसार व
त्याने मायावतीवर केलेल्या टिकेला प्रसार माध्यमानी मांडलेले तांडव याबरोबरच समाजवादी पक्षाच्या अखिलेश सिंग यानी तरुणाना
लापटाप वाटण्याचे दिलेले आश्वासन व त्यामुले नव्या तरुण मतदारानी लॉपटाप च्या
हव्यासापोटी समाजवादीला केलेले मतदान हे
मुख्यता: मायावतीच्या पराभवास ठरलेली कारणे आहेत.
निवडनुकांच्या निकालावरून उत्तर प्रदेशातील जनतेने राहुल
गांधीला (कांग्रेस) व भाजपाला
झिड़कारले आहे. रायबरेली व अमेठी या गांधी घरण्याच्या क्षेत्रात राहुल गांधी, सोनिया गांधी व प्रियंका गांधी यानी ठाण मांडून प्रचार केला तरी
रायबरेलित कांग्रेस पक्षाला एकही जागा निवडून आणता आली नाही तर अमेठी मध्ये एकूण
पाच जागपैकी केवल दोन जागावर विजय मिळवता आला यावरून जनतेने कांग्रेसला नाकारले हे
सिध्द होते तर अयोध्येत भाजपाचा झालेला दारुण पराभव हा त्यांच्या विचारधारेला मिळालेली
चपराक आहे.
बहुजन हिताय बहुजन सुखाय या ना-याऐवजी सर्वजन सुखाय
सर्वजन हिताय हा मंत्र देना-या मायावतींचे सोशल इंजिनिअरिंग सपसेल फसलेले दिसत असून
ब्राम्हणासोबतच मुसलमानानीही बहुजन समाज पक्षाची साथ सोडली हा या निकालाचा महत्वाचा
परिपाक आहे. सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली ब्राम्हण व
मुस्लिम दलालानी सत्तेची सगळी सूत्रे हातात घेतली
होती. मायावतीच्या भेटीसाठी या दलालांच्या मध्यस्थीशिवाय पक्षाच्या हितचिंतक व
कार्यकर्त्यानाही मायावातीना भेटता येत नव्हते. ही बाब दलित अस्मिता जपणाऱ्या
मतदारांना अजिबात रुचलेली नव्हती. अनेक कार्यकत्यांच्या मनात हे शल्य सलत होते.
तरीही मायावतींना दलित मतदारांनी नाकारले नाही उलट भरभरून मते दिली हे बहुजन समाज पक्षाला
मिळालेल्या मताच्या वरील टक्केवारीवरुण स्पष्ट होते.
दलित मतदार आपल्याकडे वळावा यासाठी राहुल गांधीने
जंगजंग पछाडले. दलितांच्या सोबत जेवणे, त्यांच्याघरी झोपने व त्यांच्यावर आश्वासानाची खैरात वाटने अशा प्रकारची
नौटंकी राहुलच्या माध्यमातून कॉंग्रेसने केली. दलितामध्येही दलित व अतिदलित अशी विभागनी
करुन फुट पाड़ण्याचा प्रयत्न कांग्रेस कडून करण्यात आला. परंतु दलित मतदार हा
कोनाच्याही भुलथापाना बळी पडला नसून तो आपला स्वाभिमान व अस्मीतेला अधिक जपतों
हेही या निकालाने दाखवून दिले आहे. दलित मतदाराना पैशाने व आश्वासनाने विकत घेता येत नाही. हे एका जागरूक व परिपक्व समाजाचे
लक्षण आहे. या अर्थाने उत्तर प्रदेशातील दलित समाज हा इतर राज्यातिल दलितांच्या तुलनेत
राजकीय दृष्ट्या अधिक जागरूक व स्वाभिमानी आहे.
असे असले तरी बहुजन समाज पक्षाचा केडर हा मायावती
भोवती असलेल्या दलालामुले नाराज झाला असून त्याचा फटका मायावतीला बसला हे या
निकालावरून स्पष्ट दिसते. मायावतीवरच्या या नाराजीमुळे पक्षाच्या केडरनी बहुजन
समाजातील ओबीसी व मुसलमान समाजामध्ये जाऊन त्याना फुले-आंबेडकरवाद व फसवा
हिंदुत्ववाद सांगण्यासाठी घराबाहेर पडला नाही तथापी मुसलमानाचे विचार परिवर्तन व
त्यांची नाळ समाजवादी पक्षापासून तोड़ण्यासाठी कसलेही प्रयत्न केले नाही. हा या निवडणुकीत मायावतीला बसलेला
सर्वात मोठा फटका होय. दलित समाजातील फुले-आंबेड़करवादी बुद्दिवंताची व संघटनांची
त्या साधी विचारपूस करून त्याना मान सन्मान दिला जात नाही ही मायावती मधील सर्वात
मोठी त्रुटी आहे. त्यामुळे मायावतीनी सावध होने आवश्यक आहे. अन्यथा या केडरबेस कार्यकर्त्यांचा, बुदीवंताचा व दलित जनतेचा फटका भविष्यात बसेल असे मानायला बराच वाव आहे.
लेखक :बापू राऊत
No comments:
Post a Comment