Monday, March 26, 2012

स्वत:ला लुटू देणारा देव आपल्या भक्तांचे सरक्षण कसे करणार?



चोरानी देव लूटला अशा प्रकारची बातमी दिनांक 25 /03/2012 च्या वर्तमानपत्रातील पहिल्या पानावर झलकली.  रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरच्या प्रसिद्ध सुवर्णगणेश मंदिरात शनिवारी पहाटे दरोडेखोरांनी हैदोस घालून २४ कॅरेट सोन्याची १ किलो ३00 ग्रॅम वजनाची मूर्ती आणि सुमारे ३00 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले.
ही घटना गणेशभक्तांच्या श्रद्धेवरच दरोडा असल्याची भावना वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्या.
रात्री दरोडेखोरांनी मंदिरात प्रवेश केला. या वेळी मंदिरातील सुरक्षारक्षक महादेव घडशी (५५) आणि अनंत भगत (५0) या दोघांना त्यांनी बेदम मारहाण केली. त्यात एकाचा मृत्यू ही झाला. दारोडेखोरानी  २४ कॅरेट सोन्याची १ किलो ३00 ग्रॅम वजनाची मूर्ती आणि सुमारे ३00 ग्रॅम सोन्याचे दागिने घेऊन पोबाराही केला. ही बातमी मिलाल्याबरोबर परिसरातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी मंदिर परिसरात जमू लागल्या. आमच्या श्रद्धास्थानावरच दरोडा पडल्याने लोक संतप्त होते म्हणे. ही पहिलीच घटना नव्हे या अगोदरही  विजयदुर्गच्या  श्री रामेश्‍वर मंदिरातील २0 किलो चांदीचा मुखवटा दरोडेखोरांनी चोरला. तो अजून मिळालेला नाही.  कोकणातील दानपेट्या चोरांचे नेहमीचे टार्गेट. गेल्या वर्षी रायगड जिल्ह्यात रसायनी, कर्जत, पोलादपूर, म्हसळा येथे प्रत्येकी एक तर गोरेगाव येथे तीन व रोहा येथे दोन अशा नऊ मंदिरांत जबरी चोर्‍या झाल्या. याच वर्षी रेवदंडा आणि रोहा येथेही मंदिरे फोडली.
या बातमीचे मला मात्र काहीही अप्रूप वाटले नाही. माझ्या मते मंदिरातील मूर्तया ह्या दगड़ाच्या, मातीच्या ,चांदीच्या वा सोण्याच्या का असोनात त्या निर्जीव असतात. त्यात कसलाही सजीवपना नसतो. त्या मूर्तित सजीवपना असता तर त्या मूर्तिच्या रूपातिल देवाने चोराना जेरबंद केले असते। त्याना पिटालून सोडले असते. पन असे काहीही घड़ूँन आले नाही. याचा अर्थ मदिरातील मूर्तयामध्ये कसलेही देवपन नसते. समाजातील चतुर लोकांचे पैसा कमविण्याचे ते एक साधन आहे. परंतु याला बली पडतो तो साधा भोला गरीब माणूस. 

आतापर्यंत कोणत्याही संस्थेने , बुध्दिवंताने जो देव स्वत:चे रक्षण करू शकत नाही असा देव दुस-याचे सरक्षण कसा करेल? असा कोणीही प्रश्न विचारलेला दिसत नाही. माझ्या मते जगात सर्वात भीत्र्या मानसांची औलाद भारतातच असावी. म्हणून या देशात कोनीही कोणालाही लुटत असतो. अशा लुटलेल्या मालापैकी थोडासा माल वा लूट मंदिराच्या दानपेटित टाकली की पुढ़ची लूट करायला तो मोकला होत असतो. म्हणून या देशात राजकीय नेते , शासकीय कर्मचारी , जमीनदार व उद्योगपती देशाला लुटायला पुढे सरसावाले आहेत. यांच्या लूटीचा पैसा आपल्याकडे वलविण्यासाठी चतुर लोक देशात नवनवी मंदिरे  बांधत आहेत. लाखो फुकटखाऊ साधुसंत निर्माण होत आहेत. सभ्य लुटारुंच्या टोल्यांचे अमाप पीक या देशात पिकते आहे. 

                                                                   लेखक : बापू राऊत 

No comments:

Post a Comment