नुकत्याच मणिपुर वगळता उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा उत्तराखंड या चार राज्यांत झालेल्या विधानसभा
निवडणुकांचे निकाल बघता सन 2014 मध्ये होना-या लोकसभेच्या निवडणुका ह्या कांग्रेस
पक्षाला कौल देना-या नाहीत हे लक्षात येते. आरएसएस ची राजकीय शाखा असलेल्या भाजपा
ह्या पक्षालाही या निकालाच्या उपांत्यफेरीत निराशाच हाती लागली आहे. ज्या रामाच्या
नावावर एकदा उत्तर प्रदेश व देशाची सत्ता हातात घेतली होती त्याच प्रभु
रामचंद्राच्या आयोध्येत भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. देशाच्या अधिकतर
राज्यात वजनदार, आक्रमक व लोकप्रिय नेत्यांच्या उगम झालेला
पहावयास मिळतों. बिहार, उत्तरप्रदेश,
ओरिसा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिलनाडु, प.बंगाल, आसाम, झारखंड व महाराष्ट्र या राज्यात अनुक्रमे नीतिशकुमार, लालूप्रसाद, मुलायमसिंग,
मायावती, नवीन पटनायक, देवेगौड़ा, चंद्राबाबू, जगनमोहन रेड्डी,
जयललिता, करुयाणानिधि, ममता बनर्जी, महंतो, शरद पवार व बाल ठाकरे या सारखी नेते आपापल्या राज्यात लोकप्रिय असून व
स्वबळावर सत्ता मिळवू शकतात. एवढेच नव्हे तर प्रसंगी देशाचे नेतृत्वही करण्याच्या
लायकीचे आहेत. सध्या देशात तीन मुख्य राष्ट्रीय पक्ष असून त्यापैकी बहुजन समाज
पक्ष हा मुख्यत: उत्तर प्रदेश पुरता मर्यादित असून तो इतर राज्यात केवळ नाममात्र
असे अस्तित्व राखून आहे.
विधानसभा निवडणुकामध्ये काँग्रेसचे महासचिव राहुल
गांधी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. प्रसार माध्यमे व वर्तमान पत्रातील स्तंभ
लेखकानी तर राहुल गांधीला हीरो बनविले होते. उत्तर प्रदेशाच्या जनतेला राहुलची
मोहिनी लागली असे ते चित्र होते. उत्तर प्रदेशात राहुल सोबत काँग्रेसचे ड़झनभर
मंत्री, पंतप्रधान मनमोहनसिंग, सोनिया
व प्रियंका गांधी जोमाने पक्षाच्या प्रचारासाठी उतरले होते परंतु पक्षाच्या
आमदारांची संख्या केवळ सहाने वाढवण्याखेरीज त्याना काहीही करता आले नाही.
राष्ट्रीय पक्षांच्या अपयशाएवढाच राष्ट्रीय नेत्यांचा जनतेशी न राहिलेल्या
संबंधांवर प्रकाश टाकणारा हा निकाल आहे. कोणताही पक्ष हा आपल्या पक्षाचे अपयश
उघडपणे मान्य करीत नाही. परंतु विधानसभा निकालामुळे या पक्षाना व त्यांच्या नेत्याना
पुरता घाम फूटला आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आपले कसे होईल या भीतीनेच
त्यांची पाचावर आली आहे. उत्तर प्रदेशात
बसपा व मायावतीला संपवून टाकायचेच या जिद्दीने राहुल गांधी व त्यांचा समर्थक
मीडिया ने मागील दोन वर्षापासून उत्तर प्रदेशात आपला एककलमी मोहीम राबविली होती. उत्तर
प्रदेशातील पराभवामुळे मायावती आता उत्तर प्रदेशाच्या प्रादेशिक राजकरनातून बाहेर पडल्या
आहेत. मायावती ह्या आता कांग्रेसला अधिक
त्रासदायक ठरू शकतात. कारण त्या इतर राज्यात फिरून बहुजन समाज पक्षाला अधिक मजबूत
करण्याचे काम करतील. बहुजन समाज पक्ष जसजसा मजबूत होत जाईल तसतसा कांग्रेस पक्ष
कमकूवत होतो हा इतिहास आहे. सोबतच समाजवादी पक्षाकड़े मुसलमान समाजाचे वळने हे
कांग्रेस अधिक दुबळी होण्याचे लक्षण आहे.
कांग्रेसच्या नेत्यांचा उघड होत असलेला भ्रष्टाचार
व भ्रष्टाचाराविरोधात अण्णा हज़ारे ने थोपटलेले दंड पाहता कांग्रेसचा पुढील प्रवास
व काळ खड़तळच आहे असे म्हणावे लागेल. भाजपाचे
हिंदुत्ववादी राजकारण जनतेने नाकारल्यासारखे असले तरी साधुसंताच्या माध्यमातून
सत्ता हातात घेण्याचे भाजपाचे मनसूबेही जनता मान्य करणार नाही. मग देशाचे
राष्ट्रीय राजकारण कसे चालेल? हा एक यक्षप्रश्नच आहे. राष्ट्रीय
पक्षानी प्रादेशिक पक्षाना सोबत गठजोडीचे राजकारण करने हाच एक पर्याय व वास्तव देशासमोर
दिसतो आहे. प्रादेशिक पक्षाना व त्यांच्या नेत्याना मिळत असलेल्या यशामुळे
देशापुढे एक राष्ट्रीय संकट उभे राहिल असा बागुलबुवा काहिजन निर्माण करताना दिसत आहेत.
मीडिया व उद्योगपती यात आघाडीवर असतील. भाजपा वा कांग्रेस यांच्याच हातात देशाची
मध्यवर्ती सत्ता राहण्यासाठी प्रयत्न होतील. परंतु कांग्रेसचा राजकुमार राहुल
गांधी वा भाजपाचा साधुसंताचा गोतावळा यात यशस्वी होतील?. येणारा
काळच या प्रश्नाचे उत्तर देईल.
बापू राऊत
9224343464
No comments:
Post a Comment