कु-हाडीने वार करने होय. भारतात आजही जातिच्या व धर्माच्या नावावर एका समुहावर अन्याय व अत्याचार केला जातो. नक्षलवाद्याना ठार मारले जात आहे. या देशात नक्षलवादी का निर्माण होतात ?. त्यांच्या समस्या काय आहेत ?. हे जाणून घेण्यासाठी भारत सरकार कधीच ठोस पावले उचलताना दिसत नाही. काही (शेकडो) वर्षापूर्वी भारतातुन तामिल लोक कामे करण्यासाठी श्रीलंकेत गेली. अशा लोकानी त्या राज्यात जावून स्वतंत्र तामिल राज्याची मागणी केली ही मागणी श्रीलंका सरकारकडून फेटालण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून तामिलानी लिट्टे ही संघटना स्थापन करून सशस्त्र क्रांतीच्या/दहशतवादाच्या माध्यमातून श्रीलंकेचे दोन टुकड़े करून स्वतंत्र तामिल देश निर्माण करण्याचा मार्ग पत्करला. त्यासाठी लिट्टेनि लाखों सिहली लोकाना ठार केले. उद्या भारतात कोणी स्वतंत्र देशाची मागणी केली तर?. काश्मीरी मुस्लिम तर ही मागणी भारत स्वतंत्र झाल्यापासून करीतच आहेत. भारताच्या आठमुड्या भूमिकेमुले देशात अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. भारताने आपली कोनाच्याही दबावामुले आपली परराष्ट्र नीती बदलू नये अन्यथा भविष्यात भारतात अनेक प्रश्ने/संकटे निर्माण होऊ शकतात.
बापू राऊत
No comments:
Post a Comment