Saturday, May 12, 2012

उच्चवर्णीयांची जातीयवादी मानसिकता अद्यापही कायम


भारत हा जातीयवादी मानसिकतेचा जगातील अव्वल क्रमांकाचा देश आहे. जातीयवादी मानसिकता जितकी मध्यमवर्गीय व गरीब सवर्णात भिनली आहे किंबहुना त्याहुनही अधिक ती उच्चवर्णीय वर्गात भरलेली आहे. एकीकडे ही उच्चजातीय मानसिकता रंगभेद व्यवस्थेविरुध्द लढणा-या नेल्सन मंडेलाचे स्वागत करीत वर्णभेदी प्रिटोरिया राजवटीवर टिकास्त्र सोडत होती तर दुसरीकड़े भारतातील हीच जातीयवादी जमात प्रिटोरिया राजवट बनूण दलितावर अन्याय अत्याचार करीत होती. या जातिवादी मानसिकता भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकराचा तिरस्कार त्यांच्या उपस्थित तर करीत होतीच परंतु त्यांच्या मरणोपरांतही टीका करण्यास थकताना दिसत नाही. बराक ओबामाचे कौतुक करनारी हीच उच्चवर्णीय जमात डॉ. बाबासाहेबाना आपला एक नंबरचा शत्रु समझते तर एक कर्तबगार स्त्री म्हणून ठसा उमटविना-या मायावतीला आधुनिक शूर्पणखा समझते.
      भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह व्यंग्यचित्र "नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल ट्रेनिंग अँड रिसर्च'च्या (एनसीईआरटी) पाठ्यपुस्तकात समाविष्ट करून आपली जातीयवादी मानसिकता परत जाहीर केली आहे. सन 1949 साली शंकर या व्यंगचित्रकाराने काढ़ेलेले कार्टून सन 2012 सालच्या पाठ्यक्रमात समाविष्ट करण्याची काय गरज होती?. हा केवल योगायोग आहे असे नव्हे तर ते जानुनबूजून केलेले कृत्य आहे.
एनसीईआरटी ही संस्था अभ्यासक्रम ठरविण्याचे काम बघत असते. एनसीईआरटी ला सल्ला देण्याचे काम एक समिति करीत असते. या समितीचे अध्यक्ष हरी वासुदेवन असून मुख्य सल्लागार म्हणून पुण्याचे प्रा. सुहास पळशीकर आणि दिल्लीचे योगेंद्र यादव हे कार्यरत होते. प्रा. सुहास पळशीकर आणि दिल्लीचे योगेंद्र यादव हे दोघेही स्वत:ला समाजशास्त्री म्हणवून घेतात. यातील योगेन्द्र यादव तर बामसेफच्या व्यासपीठावर येवून फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संदर्भात भाषने देत असतात तर दूसरे सल्लागार सुहास पळसीकर हे तर अनेक वुत्तपत्रात सामाजिक समानतेच्या संदर्भात लेखन करुन तळागळातील लोकांच्या भावनेसी आपण समर्पित आहोत असे दाखवित असत. परंतु  या दोन्ही तथाकथित समाजवाद्यांचा खरा चेहरा लोकासमोर उघड झाला. 
आंबेडकरवादी विचारसरनीच्या नेत्या व बसपा सुप्रीमो  मायावती यांच्या मागणी वरुण कपिल सिब्बल यानी व्यंग्यचित्र वगळण्याचे आदेश दिले असले तरी ही जातीयवादी मानसिकता कधी बदलनार हा मूळ प्रश्न आहे?. सरकार, प्रशासकीय अधिकारी व देशाच्या मोठमोठ्या संस्थातील पदाधिकारी हे जातीयवादी (उच्चवर्णीय) असून ते अनेक प्रकारे अनुसूचित जाती/जमातीच्या कर्मचा-यावर अन्याय करीत असतात. हिंदुवादी व्यवस्थेला आव्हान देना-या व्यक्ती व संस्थाना ते आपले लक्ष्य करीत असतात. हीच जातिवादी प्रवृत्ती आपल्या हक्कासाठी लढणा-या कार्यकर्त्यावर नक्षलवादी असन्याचा ठपका ठेउन त्यांचे जीवन उद्ध्वस्त करीत आहे.
आंबेडकरवादी नेत्या मायावती यानी हा केवळ डॉ आंबेडकारांचा अपमान नसून तो देशाचा अपमान आहे असी भूमिका घेत अभ्यासक्रमातील कार्टून वगळून दोषींवर सरकारने स्वतः मुख्य सल्लागारा विरोधात पोलिसांत खटला भरुन कपिल सिब्बल यांच्याही राजीनाम्याची मागणी  केली आहे. या उलट एकदम विरोधी असी प्रकाश आंबेडकर यानी भूमिका घेतलेली दिसते. प्रकाश आंबेडकर म्हणतात बाबासाहेबानी 1949 ला कार्टून छापल्यानंतर कसल्याही प्रकारची प्रतिक्रीया व्यक्त केली नव्हती तर आज या कार्टून संदर्भात विरोधी भूमिका घेण्याचे काही कारण नाही. एनसीईआरटीच्या सदर पाठ्यपुस्तकातून कार्टून काढण्यात येऊ नये असी आंबेडकरी प्रवाहाविरोधी भूमिका प्रकाश आंबेडकर घेत आहेत. चळवळीच्या त्या धकाधकीच्या काळात डॉ. बाबासाहेब एका फालतू मानसाने काढलेल्या कार्टून विरोधात बोलले नसतीलही आणि समोर मोठमोठे अवाढव्य प्रश्न असताना बाबासाहेबानी या विरूध्द प्रतिक्रीया तरी का द्यावी?. बाबासाहेबाना चळवळीसाठी प्रत्येक क्षण महत्वाचा होता. असे असताना प्रकाश आंबेडकराने असी खुळचट भूमिका घ्यावी?.  प्रकाश आंबेडकराचे वरील वक्तव्य हे नेता म्हणून शोभत तर नाहीच उलट आंबेडकरी जनतेत संभ्रम करणारी आहे.
प्रकाश आंबेडकर काहीही भूमिका घेवोत. बाबासाहेब आमच्यासाठी दैवत आहेत. आमच्या दैवतावर कोणी कीचड़ टाकण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा विरोध होईलच. परंतु हा विरोध सनदशीर मार्गाचा असला पाहिजे. तोडफोड करने हा आंबेडकरी मार्ग नव्हे. शांततेच्या मार्गाने विरोध प्रगट झाला पाहिजे.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जगातिल मोजक्या विद्वानात गणना होते. ते एका विशिष्ट समाजाचे नव्हे तर संपूर्ण भारताचे भूषण आहेत हे ह्या जातीयवादयाना कधी कळेल?. आज त्याना जे   मिळेल त्या साधनाद्वारा बाबासाहेबांवरचा राग व्यक्त करीत असतात. इंगजी माध्यमांचे वृत्तपत्रे तर बाबासाहेबांच्या जयंतिदिनी त्यांच्या वरील लेख वा फोटो ही छ्यापण्याचेही टाळत असतात. बाबासाहेबविषयी यांच्या मनात किती भयंकर चिड आहे हे सहजगत्या दिसून येते. हा इंग्रजी बोलनारा उच्चभ्रु वर्ग म्हणजे आजचा नागरी समाज. या नागरी समाजाकड़े देशाची सारी सुत्रे जात  आहेत.  या नागरी समाजाच्या समुहात आम्हाला प्रतिनिधित्व नसेल तेव्हा समाजाच्या भविष्याचे काय होईल हा प्रश्न मनाला नेहमी सतावत असतो. मताच्या राजकारनाच्या पलीकड़े आंबेडकरी समाजाला वा फुले आंबेडकराकड़े कधीच बाघितल्या जात नाही हा स्वत:ला आंबेडकरी म्हणविना-यांचा पराभव नव्हे काय?.
                                 बापू राऊत (9224343464) 

No comments:

Post a Comment