Sunday, September 1, 2013

तथागत बुध्दाचे भिक्षापात्र अफगानिस्थानच्या (काबुल) वास्तुसंग्रहालयात


तथागत बुध्दाचे भिक्षापात्र अफगानिस्थानची राजधानी असलेल्या काबुल शहरातील वास्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहे. राजदचे सांसद श्री रघुवंशसिंग यांनी संसदेमध्ये शून्यकाल मधील प्रश्नोत्तरात तथागत बुध्दाचे भिक्षापात्र अफगानिस्थानच्या (काबुल) वास्तुसंग्रहालयात असून ते भारतात परत आणण्याची मागणी केली आहे.
तथागत बुद्धाने आपल्या निर्वाण काळात सदर भिक्षापात्र वैशालीच्या जनतेकडे सुपूर्द केले होते. सदर भिक्षापात्र राजा कनिष्क कडून भारतातील वैशाली येथून त्याची राजधानी असलेल्या पुरुशपुत्र (आजचे पेशावर) येथे नेण्यात आले होते. रघुवंशसिंग  म्हणाले कि, माजी विदेशमंत्री श्री एस.एम.कृष्णा यांच्याकडून सदर भिक्षापात्र काबुल येथे असल्याचे समजते. सदर भिक्षापात्र लवकरात लवकर भारतात परत मानण्याची मागणी सरकार कडे करीत ते वैशाली या ठिकाणी पूर्ववत ठेवण्यात अशी मागणी केली आहे.

भिक्षापात्र परत आणण्यासाठी आंदोलनाची गरज
भारत सरकार सदर भिक्षापात्र स्वत:हून काबुल येथून परत आणण्याची शक्यता फारच कमी आहे. परंतु फुले-आंबेडकरी चळवळीने विविध राजकीय पक्ष व सरकार कडे  हा मुद्दा सतत मांडला व त्यावर शांतप्रीय आंदोलन केल्यास भारत सरकारला सदर भिक्षापात्र परत आणावेच लागेल. परंतु सदर आंदोलन हे वेवेगळ्या गटामार्फत न होता सर्वानी एकत्र येवून आंदोलन छेडण्यात यावे. बुद्धगया महाविहार मुक्ती आंदोलनासारखी अवस्था करण्यात येवू नये. केवळ एकी मध्येच शक्ती असते हे तत्व आंबेडकरवाद्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. आपले प्रश्न निकाली काढण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.

जय भारत जय संविधान 

No comments:

Post a Comment