Tuesday, January 31, 2023
‘धर्मांतरण’ मानव विकास का एक मार्ग
Friday, January 27, 2023
‘धर्मांतर’ हा मानव विकास साधण्याचा मार्ग
मानवी विकास साधण्याचे अनेक दुवे असतात. आर्थिक सुबत्ता
प्राप्त होणे, सामाजिक व
सांस्कृतिक क्षेत्रात समता प्रस्थापित होणे, सर्वांना सारखे
शिक्षण मिळणे, धर्माच्या माध्यमातून मानसिक शांती स्थापित
होणे व एकमेकासोबत परोपकाराने वागणे ह्या मानवी विकास साधण्याच्या पायऱ्या आहेत.
धर्म ह्या बाबी पुरवीत असतो. परंतु एखादा धर्मच जेव्हा आपल्याच धर्मातील बहुसंख्य
लोकांच्या विरोधात जात असेल तेव्हा त्या धर्मास कंटाळून पिडीत जनता दुसऱ्या धर्मात
प्रवेश करीत असते.
भारतात अनेक धर्म व विचारधारा सहवास करतात. त्यामुळे भारत
एक धर्मनिरपेक्ष
व लोकशाहीवादी देश म्हणून जगात आदराच्या स्थानी आहे. भारतात मुख्यत: वैदिक (हिंदू),
बौध्द, जैन, इस्लाम व
ख्रिश्चन हे धर्म आहेत. भारताच्या संविधानाने (कलम २५) प्रत्येक नागरिकाला धर्म
स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे सर्व धर्माचा तौलनिक अभ्यास केल्याने
एखाद्याला आपल्या धर्मापेक्षा दुसरा धर्म व त्याची तत्वे योग्य वाटल्यास तो धर्म स्वीकारू शकतो. आणि त्या
प्रमाणे आपले जीवन जगू शकतो. भारतात अनेक धर्मांतरे झाली आहेत. परंतु आता अशा
धर्मांतरावर काही राज्यांनी बंदी आणली आहे. तरीही काही ठिकाणी धर्मांतरे होत आहेत.
मुख्य प्रश्न असा निर्माण होत आहे कि, अशी धर्मांतरे का
होताहेत? त्यामागची कारणे काय आहेत?. हे
शोधण्यासाठी पाठीमागच्या इतिहासात जावे लागते.
Friday, January 20, 2023
भारतीय महिला सुधारणावादी चळवळ व तिची मनोभूमिका
Sunday, January 1, 2023
हिंदुओं का बौद्ध धर्म में परिवर्तन और उसके कारण