ग्रीकमध्ये ई.स.पूर्व ४७० मध्ये साक्रेटीस नावाचा विचारवंत उदयास आला. विवेकी जीवन कस जगाव व सत्याचा शोध कसा घ्यावा यावर त्याने चिंतन सुरु केले. तरुण युवकासोबत संवाद साधत त्यांना ते मानवतावाद व विवेकवादाच्या तर्कपुर्ण गोष्टी सांगत. अथेन्समध्ये धर्मवादी लोकांसोबत चर्चा करून त्यांना वादविवादात हरवीत. तो धर्मवाद्यांना सांगायचा, तुम्ही तुमच्या भौतिक स्वार्थासाठी “देव कल्पना” निर्माण केल्या. तुमच्या देवाचे उत्सव व त्याला दिले जाणारे बळी ह्या अर्थहीन बाबी होत. देवता जर खरोखरच भल्या स्वभावाच्या असतील तर तो कशाला माणसाकडून आपली पूजा अर्चना करवून घेईल किंवा बळीची अपेक्षा करेल. देव जर हा सर्वाचा कर्ताधर्ता असेल तर तो सर्वाला समान न्याय देईल. कारण तुमच्याच मतानुसार त्याने सर्वांनाच निर्माण केले. मग तुमचे भले करण्यासाठी त्यानेच निर्माण केलेल्या प्राण्याचा तो बळी कसा घेईल?. साक्रेटीसच्या अशा शिकवणुकीचा त्यांचेवर प्रभाव पडे. अथेन्सचे तरुण मुले व नागरिक धर्मगुरुना प्रश्न विचारत. धर्मगुरू निरुत्तर होत. त्यामुळे
Wednesday, May 24, 2023
Wednesday, May 17, 2023
कर्नाटक के चुनावी परिणाम और भाजपा की हार
Tuesday, May 16, 2023
कर्नाटक निवडणुक निकालाचा अन्वयार्थ
कर्नाटक सार्वत्रिक
विधानसभा निवडणुक २०२३ चे बहुप्रतीक्षित निकाल लागले. या निकालात भारतीय राष्ट्रीय
कॉंग्रेस १३५ जागा आणि ४२.९ टक्के मतासह विजेता म्हणून उदयास आली आहे. कर्नाटकातील
मागील तीन विधानसभेचे (तक्ता क्र.१ व २) निकाल बघता २०२३ चे निकाल हे कॉंग्रेससाठी
मोठे उल्लेखनीय यश आहे. कारण त्यांना १९८९ च्या निवडणुकीपासून इतका मोठा जनादेश
प्राप्त झाला नव्हता. १९८९ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला १७८ जागासह एकूण ४३.७९ टक्के
मते मिळाली होती. २०१८ च्या निवडणुकीत मिळालेल्या ८०
जागांच्या तुलनेत अधिक ५५ जागा मिळवून कॉंग्रेस विजयी झाली आहे. कर्नाटक
विधानसभेचा निकाल हा भारतीय जनता पक्षासाठी मोठा धक्काच आहे. कारण भाजपा विजयाच्या
खात्रीमध्ये असताना त्यांना मागील २०१८ च्या निवडणुकीमध्ये मिळालेल्या १०४
जागाच्या तुलनेत ३८ जागा गमवाव्या लागल्या. या निवडणुकीत सर्वात
मोठा धक्का बसला तो जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाला.
या पक्षाने मागील २०१८ विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत जवळपास ५० टक्के जागा
गमावल्या. मागील निवडणुकीत ३७ जागा मिळविलेल्या जनता दलाला मात्र २०२३ मध्ये केवळ
१९ जागांवर विजय मिळविता आला.
Saturday, May 6, 2023
आदर्श समाजासाठी बुध्दाच्या विवेकवादाची गरज
भारतात ई.स.पूर्व सहाव्या शतकापर्यंत पुरोहितशाहीची किचकट धार्मिक कर्मकांडे, यज्ञामध्ये
गायींची बळी प्रथा, धर्माज्ञाच्या नावाखाली दानासाठी
शेतकऱ्याची पिळवणूक व त्यांच्या पशुधनाला पळवून नेण्यात येत असे. धर्मसंस्था मजबूत
होवून स्वर्ग, देवता आणि अदृश्य शक्तिचे सारे नियंत्रण व
पापपुण्यातून मुक्तीचे मार्ग केवळ ब्राम्हण पुराहिताद्वारेच व्हावी असा देवाचा
आदेश असल्याचा दावा करण्यात येत होता. वैदिकांनी लिहिलेल्या धर्माशास्त्राना
देवाची निर्मिती ठरवून त्याद्वारे समाजसंचालन करीत शास्त्राधारित
सांस्कृतिकव्यवस्था निर्माण झाली होती. या व्यवस्थेने माणसात भेदाभेद करणारी जात व
वर्णव्यवस्था निर्माण केली. स्त्रियांना घरी व समाजात सन्मानापासून वंचित करण्यात
आले होते. ब्राम्हण पुरोहितांनी स्वत:ला देवाचे दूत घोषित केल्यामुळे गणराज्य
व्यवस्थेतील राजे, सरदार व सामान्य जनतेसाठी ब्राम्हण हेच दिशा देणारे नायक झाले होते.