Friday, August 17, 2012

सामाजिक विषमतेमुळे देशात भयानक परिस्थिती

देशाला स्वातंत्र्य मिळाले, मात्र देश स्वातंत्र्य होण्यापूर्वी जी सामाजिक विषमता होती त्यापासून अदय़ापही आपली सुटका झालेली नाही. स्वातंत्र्यानंतरही मूलभूत सुविधा सर्व घटकांपर्यंत समान पद्धतीने पोहोचलेल्या नाहीत. समाजात निर्माण झालेल्या या विषमतेमुळेच देशात भयानक परिस्थिती निर्माण झाल्याचे मॅगेसेसे पुरस्कार विजेते जेष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी सांगितले.
सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये आयोजित कॉन्क्लेव्हमध्ये पी. साईनाथ यांनी आपले विचार मांडले. देशात गरीब आणि श्रीमंत यांच्यात खूप मोठी दरी आहे. श्रीमंतांना र्मसिडीज खरेदीसाठी सात टक्के व्याजाने तर शेतकर्‍याला ट्रॅक्टरसाठी १४ टक्के व्याजाने कर्ज दिले जाते, हा भेदभाव अत्यंत चुकीचा असल्याचे ते म्हणाले. अन्न ही मूलभूत गरज आहे. पण भारतासारख्या कृषिप्रधान देशात ही प्राथमिक गरजही भागवली जात नाही. महाराष्ट्रातच मोठय़ा प्रमाणावर शेतकरी आत्महत्या होतात. श्रमिक वर्गाला दोन वेळचे पोटभर अन्न मिळत नाही. देशात पिकवलेल्या धान्याची निर्यात मोठय़ा प्रमाणात होत असल्याने अन्नाची कमतरता निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
■ शहरी भागातील एका माणसाला २,१00, तर गावातील श्रमिक वर्गाला २,४00 कॅलरीजची गरज असते. प्रत्यक्षात मात्र गावातील माणसाला १,८00 पर्यंतच कॅलरीज अन्नातून मिळतात.
■ घटनेत असलेल्या बाबींना जर शिक्षणाप्रमाणेच मूलभूत अधिकारांचा दर्जा मिळाल्यास ही परिस्थिती बदलणे शक्य आहे.
■ अन्न, शिक्षण आणि आरोग्य विषयक क्षेत्र सार्वजनिकच असावे; परंतु जरी खाजगीकरण झाले तरी त्याचा लाभ सर्वांना होईल, याचीही काळजी घ्यायला हवी. कृषी क्षेत्रातही आता खाजगीकरणाचा विचार येऊ लागल्याने गरिबांनी जगायचे तरी कसे?

No comments:

Post a Comment