Tuesday, August 7, 2012

आंबेडकरी चळवळीतील नेतृत्वाचे सिहावलोकन

आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात आज अनेक प्रश्न उपास्थित होताना दिसतात. खरेच आंबेडकरी चळवळ ही पेचात व भीषण संकटात सापडली आहे का?. ती नेता विहीन आहे का?. ती संधीसाधू वृत्तीच्या हातात गेली आहे का ?. आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यास लायक जनमान्य/लोकमान्य  असे नेते  उपलब्ध नाहीत हा दावा खरा आहे का?. की ही चळवळच विश्वासू व खंबीर अशा मार्गदर्शका अभावी स्वार्थापोटी काहींनी जिवंत ठेवली आहे का?. आंबेडकरी चळवळ ही सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी वापरून  घेण्याचे खेळणे झाले आहे का?. 
आंबेडकरी चळवळीच्या संदर्भात आज अनेक प्रश्न उपास्थित होताना दिसतात. खरेच आंबेडकरी चळवळ ही पेचात व भीषण संकटात सापडली आहे का?. ती नेता विहीन आहे का?. ती संधीसाधू वृत्तीच्या हातात गेली आहे का ?. आंबेडकरी चळवळ पुढे नेण्यास लायक जनमान्य/लोकमान्य  असे नेते  उपलब्ध नाहीत हा दावा खरा आहे का?. की ही चळवळच विश्वासू व खंबीर अशा मार्गदर्शका अभावी स्वार्थापोटी काहींनी जिवंत ठेवली आहे का?. आंबेडकरी चळवळ ही सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी वापरून  घेण्याचे खेळणे झाले आहे का?. सत्ताधारी व विरोधक हे आंबेडकरी चळवळीला आपल्या खिशातला रुमाल समजतात का?. असे अनेक प्रश्न आज आ वासून उभे आहेत. आज आंबेडकरी समाजातील अनेक लोक हे राजकीय, धार्मिक व सामाजिक क्षेत्रात वावरणा-या लोकांचे विक्षिप्त वागणे, त्यांच्यातील स्वार्थीपना व नेतृत्वाचा खुजेपणा बघून आपल्या घरात बंदिस्त झाले आहेत हे खरे नाही काय?.आंबेडकरी चळवळ ही दिशाहीन, मुद्देहीन व भरकटलेली आहे. या आरोपात तथ्य नाही काय?. आंबेडकरी चळवळीतील प्रत्येक नेता  की जो स्वत:ही निवडून येऊ शकत नाही एवढेच नव्हे तर साधा एक आपल्या स्वबळावर एखादा नगरसेवकही निवडून आणू शकत नाही असे नेते स्वत:ला प्रती आंबेडकर समजतात हा आरोप खरा नाही काय?.
आंबेडकरी चळवळीत विद्वान व बुद्धिमान तसेच सर्वगुण संपन्न  नेत्यांची कमतरता आहे असे नाही का वाटत?. आजच्या आंबेडकरी चळवळीत रामदास आठवले सारखा नेता हा समाजाचा व आंबेडकरी चळवळीचा नेता म्हणून मिरवितो हे समाजाच्या -हासाचे कारण नाही का?. केवळ रामदास आठवलेच नाही तर  इतर नेतेही नेतेपदाच्या लायकीचे नाहीत या आरोपात तथ्य नाही का वाटत?.
कोणती आंबेडकरवादी चळवळ जोमाने चालू आहे ?.पावसाळ्यात शेणखतावर उगवणा-या असंख्य भूछत्र्यासारख्या आंबेडकरी संघटनाचा उगम होतो हे सत्य नाही काय?.मनुष्यपरत्वे संघटना निघताहेत हे जागरूकतेचे लक्षण नसून  आंबेडकरी चळवळच नष्ट करण्याचे महत्कार्य होय.
हा लेख अपूर्ण असून तो पूर्ण होईपर्यंत आपले मत नोंदवू नये ......श्री बापू राऊत    

No comments:

Post a Comment