Tuesday, April 10, 2012

म्हणे नरेंद्र दाभोलकरांची चौकशी करा !

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या काही मतासी माझी तात्विक असहमती असली तरी ते मराठी समाजात अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भात करीत असलेले त्यांचे कार्य हे अस्पृहनीय आहे. मी नास्तिक असल्यामुळे देव ही संकल्पना नाकारतो तर डॉ. दाभोळकर हे देव संकल्पनेला छातीसी कवटाळतात. कदाचित त्यांची ती सामाजिक व धार्मिक भित्रेपनाची मजबूरी असू शकते. परंतु त्यांच्यातील या त्रुटीमुळे त्यांच्या  कार्याला विरोध करणे म्हणजे माझ्यात असलेल्या सामाजिक सुधारनेच्या व समाजातुन बुवाबाजी, धर्मभोळेपना व अंधश्रद्धा नष्ट झाली पाहिजे या मूळ तत्वालाच विरोध करणे होय.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी संस्थेचा वार्षिक हिशेब धर्मदाय आयुक्तांना सादर करण्यात तसेच अन्य आर्थिक व्यवहारात अपारदर्शकता ठेवून राज्य सरकारची फसवणूक केली आहे असा आरोप करीत दाभोलकर व अंनिसची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी  अशी मागणी वारकरी संप्रदायहिंदू जनजागृती समिती, आसाराम बापू संप्रदाय, सनातन संस्था, नरेंद्र महाराज तसेच इतर हिंदुत्ववादी संघटनांनी केली असून  १२ एप्रिलला आझाद मैदानात उपोषण करण्याचा इशारा सर्व संप्रदायांनी दिला होता. 
डॉ. नरेंद्र दाभोलकर हे वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प सा-या राज्यात राबवित आहेत. विद्यालये, महाविद्यालये व पथनाट्याच्या माध्यमातून समाजातील अंधश्रध्दा घालविण्यासाठी ते कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे समाजातील भोळया भाबडयाना लुबाड़नारे भोंदू साधु व धर्मसंघटना यांची दूकानदारी बंद होत आहे.(हा माझा दावा नाही कारण या देशात झपाट्याने  देवभोळेपना  व धर्मश्रध्दा वाढत आहे). महाराष्टाच्या विधानसभेत अंधश्रध्दा निर्मूलनाचे विधेयक मंजूरिसाठी ब-याच वर्षापासून ताटकपडले आहे. हे विधेयक पास होऊ नये म्हणून भाजपा व शिवसेना व कांग्रेस-राष्ट्रवादीमधील  एक गट कार्यरत आहे. हा कायदा अस्तित्वात आला तर अतिरेकवाद असलेल्या काही हिन्दू चालिरितीना फटका बसेल व आपल्या उत्पन्नच्या साधनावर मर्यादा येतीह्या भीतीमुळे वारकरी संप्रदायहिंदू जनजागृती समिती, आसाराम बापू संप्रदाय, सनातन संस्था,नरेंद्र महाराज तसेच इतर हिंदुत्ववादी संघटनां या विधेयकाला विरोध करीत आहेत. आता तर त्यानी  अंधश्रद्धा निर्मूलन समितीवरच कायदयाने बंदी यावी यासाठी विविध मार्गाचा अवलंब करीत असून सरकारवार दबाव वाढावा म्हणून उपोषने व धरणे आन्दोलने करण्याचा मार्ग  पत्कारला आहे. ह्या चोरांच्या उलट्या बोंबा आहेत. सरकार अशा संस्थाच्या दबावापुढे झुकले तर त्याचे भयंकर परिणाम पुरोगामी चळळी होतील. पुरोगाम्यांचा आवाज दाबला जाईल. त्यांच्या साहित्यावर व भाषणावर बंधने घालण्यात येतील. गरीबांचे धार्मिक व आर्थिक शोषण होईल.   हे सारे रोखायाचे असेल तर
पुरोगामी लोकानी याचा निषेध करीत नरेंद्र दाभोळकराना पाठिंबा जाहीर केला पाहिजे एवढेच नव्हे तर अंधश्रध्दा विरोधी कायदा पास करण्यासाठी सरकारवर दड़पन आणले पाहिजे.

                                              ले. बापू राऊत



4 comments:

  1. sir aapan andhshradha thambavinyasthi kay karu shakato?

    ReplyDelete
    Replies
    1. इथे येणाऱ्या सर्वांसाठी हि video ऐका मन लाऊन २ वेळा ऐका http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=46GfZUFGHtE

      Delete
  2. इथे येणाऱ्या सर्वांसाठी हि video देतोय ऐका मन लाऊन २ वेळा ऐका http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=46GfZUFGHtE

    ReplyDelete
  3. बापू राऊत हि video तुझ्यासाठी आहे ऐक मन लाऊन आणि सोड त्या नरेंद्र दाभोळकर चा नाद http://www.youtube.com/watch?feature=player_detailpage&v=46GfZUFGHtE

    ReplyDelete