Friday, April 13, 2012

राजकरणात घराणेशाही हा लोकशाही वरील कलंक


भारताची आजची राजकीय अवस्था बघितली तर भारतीय राजकारणात वाढत असलेली राजकीय घराणेशाही हा भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. या प्रकारामुळे भारतात लोकशाहीची जड़े प्रगत व अधिक मजबूत झालीत असे म्हणता येत नाही. भारतात वाढत असलेली राजकीय घराणेशाही भारतासाठी तसी नवी नाही. भारताचा गतइतिहास घरानेशाहीचाच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामोगलशाही, निजामशाही-आदिलशाही, मराठे पेशवेशाई पासून स्वातंत्र्यानतरच्या काळात नेहरू व अब्दुल्ला घरान्यातून सुरू झालेल्या राजकीय घरानेशाहीचे लोन आता दिल्लीतुन गल्लीपर्यंत पोहोचले आहे. भारतीय राजकरणात उतरलेली प्रत्येक व्यक्ती आपल्या घरातील लोकाना पुढे करीत आहेत. खासदार व आमदारांचे मुले मुली हे त्यांचे राजकीय वारसदार ठरत असून परंपरेने राजकीय विरासत ही घरातूनच निर्माण होत असल्याचे दिसत आहे. प्रत्येक राजकीय पक्ष कार्यकर्त्याच्या ऐवजी नेत्यांच्या मुलामुलीना, नातवाना व सुनाना ग्रामपंचायतीच्या सदस्यापासून विधानसभा व लोकसभेच्या आमदार व खासदारापर्यंत  तिकीट वान्याचे काम करीत आहे. भारतीय लोकशाहीने आता वंशवादी प्रथेचे स्वरूप धारण केल्याचे स्पष्ट दिसत आहे.  भारतीय राजकारण व पक्ष हे काही लोकांची मालमत्ता झालेली झालेली असून ते त्यांचे एकप्रकारे बिझीनेस केंद्र झालेले आहे. भारतीय लोकशाहीला दादागिरीचे स्वरूप आलेले आहे. जवाहरलाल नेहरू पासून सुरू झालेली घराणेशाही आता राहुल गांधीपर्यंत चालत आली आहे. त्याचाच कीत्ता आता अनेकजन गिरवित आहेत. चरणसिंग ते अजीतसिंग, मुलायमसिंग यादव ते अखिलेशसिंग, करुनानिधि ते स्टालिन, शरद पवार ते सुप्रिया सुळे व अजित पवार, बाळ ठाकरे पासून राज उध्दव- आदित्य ठाकरे, शंकराराव चव्हाण ते अशोक चव्हाण, देवीलाल ते चौटाला, भजनलाल ते बिश्नोई, हेमवंतीनंदन बहुगुणा ते रीता व विजय बहुगुणा, बीजू पटनाइक ते नवीन पटनाईक असी राजकारणी लोकांच्या घरानेशाहीची मोठी लांबलचक यादी आहे.
याला भारतीय समाज व तिची मानसिकता पूर्णपने जबाबदार आहे. भारतीय मानसिकता याच घरानेशाहित आपले भविष्य पाहते. ही घराणेशाही देशाचे आर्थिक शोषण करते तरीही आम्ही डोळयावर पट्टी बांधलेल्या अंध न्यायदेवतेसारखे वागत आहोत. निवडणुकाच्या मैदानात एक ईमानदार, देशासाठी काहीतरी करू इच्छिनारा परंतु पैशाने शून्य असलेला व्यक्ति उभा राहिल्यास  आम्ही त्याची अमानत जप्त करून टाकतों याउलट एखाद्या घरानेशाईतील एखादा मूर्ख, नपुसक व गुंडा मानुस निवडणुकीत उभा राहिला तरी आम्ही त्याला लाखो मतानी जिंकुन देतो.हा आमच्या नैतिक मूल्यांचा होत असलेला हास नव्हे काय?. आज पैशानी मते विकत घेता येतात. म्हणून राजकारण करणारे लोक वाममार्गाने अधिकाधिक पैसा जमविण्याचा प्रयत्न करीत असतात. हाच पैसा मग ते निवडणुकीमध्ये उधळून निवडून येत असतात.  
नेहरू-गांधी परिवार हा या परंपरेचा वाहक झालेला आहे. 
या परंपरेला खंडित करण्याची ताकद आज लोप पावत आहे. हे कटु सत्य नाही काय?

                                                  लेखक: बापू राऊत

                                                  

No comments:

Post a Comment