Thursday, April 19, 2012

अंबाजोगाईच्या मंदिरात चोरी-देव नाही हेच खरे!


तथाकथित मंदिरात राजरोस पने होत असलेल्या चो-या मुळे देव नाही हेच सिध्द होते. अन्यथा देविने चोरांचे हातपाय तोडले नसते काय?. चोराना चोरी न करन्याची सुबूध्दी दिलि नसती काय?.खरे तर देवीच्या दानपेटीत येनारा पैसा हा लबाडीतुन / भ्रष्टाचारातुन कमावलेले असते. त्या लबाडांचे हि देवी काही बिघडऊ शकत नाही तर आमचे ही देवी काय बीघडवीनार? याच भावनेतुन चोरानी केलेली ही चोरी होय. परंतु जे या चोराना समझते ते या  देविच्या या इडीयट भक्ताना का समझत नाही?. हाच मोठा प्रश्न आहे?.  चोरीचे हे प्रकरन पुढे वाचा!

दिवेआगारच्या सोन्याची गणपतीची मूर्ती चोरीचा छडा अजून लागला नसतानाच श्री योगेश्‍वरी देवीच्या मंदिरात बुधवारी पहाटे चोरी झालेल्या चोरीत देवीच्या अंगावरील ३१ तोळे सोन्याचे व तीन किलो चांदीचे दागिने तीन चोरट्यांनी नेले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या अंबाजोगाईकरांनी शहरात कडकडीत बंद पाळून निषेध केला. घटनेनंतर मंदिर परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे.
बुधवारी पहाटे अडीचच्या नंतर मंदिरात प्रवेश करण्यासाठी चोरट्यांनी प्रवेशद्वाराजवळच्या ग्रीलच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडले. गाभार्‍यात प्रवेश करून देवीचा तांदळा (मूर्ती) असलेल्या जाळीचे कुलूप तोडले.
देवीच्या अंगावर असलेले सोन्याचे डोळे, मुख, चंद्रकोर, सरपाळे, बिंदी, कर्णफुले तर चांदीची कमान, मूर्तीवर असलेली मोठी छत्री, दोन्ही बाजूचे झेंडे, केवड्याची पाने व इतर साहित्य असे ३१ तोळे सोने व तीन किलो चांदीचे दागिने घेऊन तीन चोरटे पळून जात असल्याचे मंदिरात झोपलेल्या व्यक्तीला दिसून आले. या चोरांनी तोंडावर रूमाल व अंगात बनियान घातली होती. मंदिरात असलेल्या या व्यक्तीने आरडाओरड केल्यानंतर पहाटे चार वाजता पोलीस मंदिरात पोहोचले.
चोरी झाल्याची माहिती पोलिसांना समजताच चोरांच्या शोधासाठी बुधवारी सकाळी सहा वाजता बीड येथील श्‍वानपथक अंबाजोगाईत दाखल झाले. कुत्र्याने मंदिरापासून दीड कि. मी. अंतरावर चोरीसाठी वापरण्यात आलेली दोन फूट लांबीची लोखंडी टॉमी, चांदीचे दागिने बसवलेली कमान, दागिन्यांना चिकटलेले शेंदुराचे तुकडे असे साहित्य पोलिसांना सापडले. पोलिसांनी हे सर्व साहित्य हस्तगत केले.
प्रकरणी मंदिराचे पुजारी सारंग अरुणराव पुजारी यांच्या फिर्यादीवरून तीन आरोपी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. योगेश्‍वरी देवीच्या मूर्तीवरील दागिने चोरांनी लंपास केल्यानंतर मूर्तीची दुसर्‍या दागिन्यांनी सजावट केली.

No comments:

Post a Comment