Sunday, April 15, 2012

मायावतीचा पराजयातही विजय


उत्तर प्रदेशच्या सिहासनावर मुलायमसींग पुत्र अखिलेश सिंग विराजमान होने हा भारतीय लोकशाहीचा विजय आहे. भारतीय लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ असते. “कोणाला सत्तेवर बसवायचे वा कुणाला सत्तेवरून उतरवायचे  याचा निर्णय जनताच घेत असते” हे साधे व सरळ असे तत्व असले तरी तो डॉ. बाबासाहेबानी घटनेच्या माध्यमातून घालून दिलेल्या नियामक चौकटीचा परिपाक आहे. शेवटी लोकशाहीत जो जिंकतों तोच सिकंदर असतो या न्यायाने मुलायम पुत्र अखिलेशसिंग हे उत्तरप्रदेशातील सिकंदरच आहेत. लोकशाहीत राज्याची व केंद्राची सत्ता हातात घेण्यासाठी व विरोधकाना गूंगारा देण्यासाठी राजकीय तिकड़म चाली चालाव्या लागत असतात. भारताच्या राजकीय क्षेत्रात चाणक्यनीतीला अणण्यासाधारण महत्व आहे. भारतीय राजनीतिज्ञ या चाण्यक्यनितिनेच आपले राजकीय पत्ते खेळत असतात.
देशात महत्वाचे राज्य असलेले उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकात अनेकानी आपला पन लावला होता. त्यापैकी काही गारद झाले तर काहीजनाना सत्तेच्या सुरेचा आस्वाद घेण्याची संधी प्राप्त झाली.  प्रसारमाध्यमानी गाजावजा केलेला व कांग्रेसला हिमालयाच्या उंचीवर पोहचहु पाहना-या राहुला बाबाला उत्तर प्रदेशाच्या  जनतेने पूर्णत: गारद केले तर पहेलवानगिरी करना-या मुलायम पुत्र अखिलेश सींग याना  सत्तेचे सोपान प्राप्त झाले.
उत्तर प्रदेशच्या राजकारनातील तीसरा तुरुकचा पत्ता म्हणजे मायावती ह्या होत. सामाजिक व धार्मिक  द्रष्ट्या गावकुसासबाहेरील कोनाही व्यक्तिनी कोणत्याही प्रकारची सत्ता हातात घेणे हे वर्ण, जात व सनातन धर्माचा अहंकार बाळगना-या बेडकांचा तो अपमान असायाचा परंतु मागील साड़ेतीन दशकापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वाना कृतिची जोड़ देत मा. कांशीराम यानी इतिहास रचला. फुले आंबेडकरी तत्वज्ञानावर बहुजन समाज पक्षाची स्थापना करीत देशात तीस-या नबरचा पक्ष बनविला. आर्याव्रत समजल्या जाना-या उत्तरप्रदेशात मायावती याना आपल्या हयातीमध्येच तिनदा मुख्यमंत्री बनविले. तर 2007 साली फुले-आंबेडकरी विचारधारेवरच राज्याची स्वबलावर सत्ता हस्तगत केली.
सत्ता हातात घेण्यापासुनाच्या क्षणापासून मायावतीला सत्तेवरून घालविण्याचे पद्दतशीर प्रयत्न झाले परंतु 207 जागाचा बहुमताचा आकडा प्राप्त्त झाल्यामुळे व भारतीय सैवधानिक लोकशाहीचा ढ़ाचा मजबूत असल्यामुळे मायावतीला सत्तेवरून हटवीणे कोणालाही शक्य नव्हते. परंतु गावकुसाबाहेरच्यांचा अपमान करने ही ज्या संस्कृतिची देंन आहे त्यानी पहिल्या दिवसापासुन मायावतीला दलित म्हणून हिनवीणे, दलिताचे राज्य, दलितांचा मुख्यमंत्री, एक अस्पृश्य समाजाचा व्यक्ती सवर्ण समाजावर हुकमत गाजविनार, सवर्णाना दलितांच्या समोर वाकावे लागणार अशा प्रकारची नकारात्मक प्रसिध्दी व चर्चा सत्तेच्या पहिल्या दिवसापासून करण्यात आला होता. मायावती विरोधी जनमत तयार करण्याचा तो पहिला दिवस होता.
मुलायम सिंगाचे गुंडाराज खत्म करण्याच्या मायावतीच्या कार्याची कोणीही स्तुती केल्याचे माझ्या तरी स्मरणात नाही. तथाकथित सवर्ण बुद्धिवाद्यानी व जातीयवाद्यानी मायावतीच्या प्रत्येक राजकीय निर्णयाला न्यायालयात आव्हान देत मायावतीच्या राजकीय निर्णयप्रक्रियेत अडथळे निर्माण केले. उत्तर प्रदेशाचा विकास दर भारताच्या विकास दरापेक्षा अधिक होता. लखनऊ व नोएडाला आधुनिक स्वरूप दिले, सीमेंट कांक्रीट रस्ते बनविण्यात आले तरी त्याकड़े दुर्लक्ष करण्यात आले. ए वन स्पर्धा यशस्वी केली तरी मायावतीचे कौतुक कोणीही केले.
जगाच्या इतिहासात ज्या ज्या महापुरुषानी त्या त्या काळात निर्माण केलेल्या वास्तु, प्रतिके, मोठ्या इमारती, व्यवस्था परिवर्तनासाठी केलेल्या कार्यामुळे ते अजरामर झाले. ताजमहाल मुळे शहाजहान, युद्दाला टाळून तसेच बौध्द धम्माचा प्रसार, त्यानी बांधलेली विहारे, स्तंभ यामुळे राजा अशोक अजरामर आहेत. त्याचप्रमाणे मायावती ह्या सुध्दा भविष्यकाळातील इतिहासात अजरामर होतील. या देशाच्या इतिहासाने अनेकांच्या नोंदी आपल्या दफ्तरी नोंदल्या आहेत. आग्रा येथील ताजमहाल कोणी बांधले असे म्हटले तर सहजीकच शाहजाहन याचे नाव येते. जगात व भारतात बौध्द धर्माचा प्रसार करून मोठ्या प्रमाणात विहारे कोणी बांधली तर साहजीकच सम्राट अशोकाचे नाव ओठावर येते. मायावती ह्यासुध्दा इतिहास घडवून गेल्या आहेत. त्यानी उत्तर प्रदेशातील जिल्ह्याना बहुजन समाजातील महापुरुषांची नावे दिली. आंबेडकरनगर, ज्योतिबा फुलेनगर, सिद्धार्थ नगर ,गौतम बुध्द नगर, संतकबीर नगर, संत रविदास नगर, महामाया नगर ही त्या जिल्हयांची नावे होत. लखनऊ शहरात डॉ. भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन स्थळ निर्मिती, डॉ. भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन संग्रहालय, डॉ. भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन गैलरी, एलिफंट गैलरी, डॉ. भीमराव आंबेडकर गोमती बुध्द विहार, समता मूलक चौक, मान्यवर कांशीरामजी स्मारक स्थळ, मान्यवर कांशीरामजी इको गार्डन, बौध्द विहार शांति उपवन, राष्ट्रीय दलित प्रेरणास्थळ अशा अनेक स्थळाची निर्मिती केली. वरील सर्व स्थळाची निर्मिती कोणी केली असा प्रश्न संघ लोकसेवा आयोग व उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने विचारल्यास त्याचे उत्तर मायावती असणार. ही इतिहासाची निर्मिती नव्हे काय?.  
उत्तरप्रदेशाच्या मुख्यमंत्री पदावर बसूनही त्या आंबेडकरी विचारधारेवर कायम राहिल्या. मायावतीनी इतर राजकीय नेत्याप्रमाणे कधीच बहुजन समाजाला देविदेवताच्या कच्छपी लावले नाही. मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्या कधीच कोणत्याही मंदीरात गेल्या नाहीत. बुध्दाच्या मूर्तीला नमन करुनच त्या दिवसाची  सुरुवात करीत. मायावतीनी दलित जातिमध्ये शासक बनण्याची भावना निर्माण केली. मायावतीनी डाइव्हरसिटी चा सिध्दांत उत्तर प्रदेशात लागू केला. डाइव्हरसिटी चा सिध्दांत लागू करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिले राज्य बनले. बहुजन महापुरुषाच्या नावे आर्थिक विकासाच्या अनेक योजना राबविल्या. दलितांच्या जीवनमानात बदल घडऊन आणला. आबेडकर ग्राम विकास योजने अंतर्गत साड़े अकरा हजार गावाचा कायापलट केला. डॉ. आंबेडकर ग्राम सुधार योजने अंतर्गत अनेक खेड्यांचा विकास करण्यात आला. बुध्द -फुले-शाहू आंबेडकराच्या  नावे विद्यपिठे बनविली.   
मायावतीनी आपल्या जिवंतपनीच स्वत:चे पुतळे उभारले. यावर भरपूर टिकाही झाली. परंतु हे सारे करण्यासाठी हिंमत असावी लागते. भारतात ही हिंमत केवळ मायावतीच करू शकतात. जगात जे लोक काही तरी नवीन करावयास निघतात तेच जगाला नवा संदेश देतात. मायावतीने सर्वजन सुखाय सर्वजन सुखाय चा नारा दिला. या ना-याविरुध्द हल्लाकल्लोळ करण्याची काहीही गरज नाही. प्रश्न असा आहे की, मायावतीकडून हा नारा देताना महापुरुषाना डावलण्यात आले वा त्यानी पाठिराख्या समाजावर अलंकाराचा वर्षाव केला?. हा नारा बहुजन समाजाच्या प्रगतिला मारक ठरला काय?. उलट मायावतीच्या सत्ताकाळात  दलित व अतिदलित यांच्यात ऊर्जा निर्माण झाली. आजच्या बदलत्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक व राजकीय परिस्थिती मध्ये भूतकाळातील तत्वाना चीटून राहने हे अपरिहार्य नसते. त्यात बदलाव आनने आवश्यक असते याच भूमिकेतुन मायावतीच्या सर्वजन सुखाय सर्वजन हिताय या ना-याकडे बाघितले पाहिजे.
चार राज्यात पार पडलेल्या निवडणुकांचे विश्लेषण केल्यास मायावतीचा पराजयातही विजय दिसतो. मायावतीचा पराजय हा प्रसार माध्यमानी मायावतीनी उभारलेले पुतळे, स्मारके व बगीचे यांच्या विरूध्द केलेल्या प्रचाराचे तसेच काही मन्त्र्यानी केलेला भ्रष्टाचार व एंटिइनक्न्बंसी ही मुख्य कारणे होती. मायावाती हयाच दलित एकेमेव नेत्या आहेत. उत्तर प्रदेशातील संपूर्ण दलितानी मायावतीनाच मतदान केल्याचे स्पष्ट झाले आहे. मायावतीनी मूसलमान समाजाला खुश ठेवण्याचे धोरण आखले असते तर कदाचित निकाल वेगळे लागले असते. ब्राम्हणानी आपले मत कोनाच्या झोळीत टाकले हे आजही स्पष्ट नाही कारण ब्राम्हण मताचा कांग्रेस व भाजपा या दोघानाही फायदा झाल्याचे दिसत नाही. आज बसपा हा देशातील तीस-या नबरचा पक्ष असुन पंजाब, हरियाणा, उत्तरांचल, जम्मू काश्मीर, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील विदर्भ व मराठवाडा या भागात बहुजन समाज पक्षाने आपले बस्तान अधिक मजबूत केल्याचे दिसते. असे असले तरी सत्ता स्थापण्यासाठी एवढे पुरेसे नसून बहुजन समाज पक्षाचा नेता या नात्याने  मायावतीनी महाराष्ट्रासकट इतर राज्यातही मोठे फेरबदल करने आवश्यक आहे.

                                                            लेखक- बापू राऊत
                                                                 

No comments:

Post a Comment