Sunday, April 29, 2012

या कोल्हाट्याच्या मुलीला देवाची मुरळी होण्यापासून कोणी रोखू शकेल काय?


सोना ही  मायी कोल्हाट्याची पोर, अंधश्रध्देची बळी ठरत आहे. तिचे देवाच्या मूर्तिसोबत लग्न लावून देण्यात येणार असून त्यानंतर मुरळी होऊन ती नाचेल. तिचे सामाजिक/शारीरिक शोषण ही करण्यात येईल. महाराष्ट्राचे सामाजिक कल्याण विभाग व अंध्द्श्रध्दा समितीचे कार्यकर्ते तिला  मुरळी  बनन्यापासून रोखतील का? 
पेपरमधील बातमी 
मला खाल्लेलं पचत न्हवतं, लयी पोट दुखायच, चक्कर बी यायची. खूप दवा डाक्टर केला. पर तुझ्यात कायी फाल्ट नायी असं डाक्टर म्हणला. मग सर्वांना वाटलं देवाचच हाय. मग जर बर वाटल तर देवाला सोडू असं घरच्यानी देवाला साकड घातलं. तस बी आमच्या घरात वाघ्या मुरळी सोडण्याची पध्दत हाय. माझा काका वाघ्या हाय. पर देवाकड एक वर्षभराची मुदत मागीतली. वर्षभरात मला बर वाटलय. आता कायबी त्रास व्हत नाय. म्हनून या हंगामाचं फडाचं काम संपवून माझं देवाशी लगीन लागणार हाय.
शाळेची लय आवड हाय.. खूप शिकायचं व्हतं.. आई गेली, बाप दारुड्या, पाठीशी तीन लहानगी भावंडं.. आत्या पाहते पर ती तमाशात नाचून थकली.. म्हणून मले बी पायात चाळ बांधाव लागलं.. आवडत न्हाय पर परिस्थिती पुढं कोणाचं चालतंय.. आता म्हणत्यात देवाची इच्छा हाय, मले मुरळी बी व्हाया लागणार हाय..
नारायणगाव परिसरातील एका तमाशाच्या फडातील सोना नावाची १७-१८ वर्षांची युवती. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईतील हे आगळंच लग्न मे महिन्यात होणार आहे पण ते देवाबरोबर. सर्वसामान्यांप्रमाणे जगण्याची आकांक्षा ठेवणारी ही मुलगी. हसरी, खेळकर आणि बडबडी. चारचौघींप्रमाणे शिकून संसार थाटण्याचे स्वप्न तिनेही पाहिले होते. मात्र, परिस्थितीने ते स्वप्नही हिरावले. घरच्या संसाराचा गाडा चालविण्यासाठी पायात चाळ बांधावे लागले. तेही तिने स्वीकारले. पण, वर्षापूर्वी पोटदुखीचं निमित्त झालं. उपचारांनी गुण येईना. त्यामुळे घरच्यांनी देवाला साकडं घातलं आणि बरं वाटलं तर देवाला सोडू म्हणून सांगितलं. सोना ही कराडमधील मायी कोल्हाटी समाजातील मुलगी. तीन वर्षांपूर्वी आईचे आजारपणात निधन झाले. वडील पेशाने ड्रायव्हर असले तरी कायम घरात पिऊन पडलेले. सोना मिळून चार भावंडे. सगळ्यांत मोठी असल्याने कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर आली.
आईच्या आजारपणात आत्याने बरेच कर्ज घेऊन उपचार केला होता. फळ आले नाही. मात्र, सोनाच्या नशिबी तमाशा आला. आत्या थकल्याने तिला हातभार म्हणून सोना तिच्यासोबत तमाशात नाचू लागली. तीन वर्षांपासून मनातील सर्व इच्छा मारून तिने हे जीणं स्वीकारलं आहे. आज इतक्या वर्षांनी आत्या तिला शिकवायची तयारी दाखवते. आपण आयुष्यभर सोसलेले हाल तिच्या वाट्याला येऊ नयेत अशी आत्याचीही इच्छा असली तरी नशिबापुढे कोणाचे चालते हेही त्यांनी स्वीकारले आहे. सोना म्हणाली, ''मला नाचायला फारसं आवडत न्हाय. आत्या ह्यात पहिल्यापासून हाय. पर तिने कोनालाबी मान खाली घालायला लावली न्हाय. तिनं जपलेलं सारं मलाबी जपाया हवं. पर गावची लोक चांगली न्हाईत. सगळी मेली कदी गावते यावरच टपलेली असतात. म्हनून माझं इथं नाचनं घरच्यांना आवडत नसतानाबी मला त्ये करावं लागतं.'' मला खाल्लेलं पचत न्हवतं, लयी पोट दुखायच, चक्कर बी यायची. खूप दवा डाक्टर केला. पर तुझ्यात कायी फाल्ट नायी असं डाक्टर म्हणला. मग सर्वांना वाटलं देवाचच हाय. मग जर बर वाटल तर देवाला सोडू असं घरच्यानी देवाला साकड घातलं. तस बी आमच्या घरात वाघ्या मुरळी सोडण्याची पध्दत हाय. माझा काका वाघ्या हाय. पर देवाकड एक वर्षभराची मुदत मागीतली. वर्षभरात मला बर वाटलय. आता कायबी त्रास व्हत नाय. म्हनून या हंगामाचं फडाचं काम संपवून माझं देवाशी लगीन लागणार हाय.
- सोना

No comments:

Post a Comment