Thursday, December 7, 2017

ओबीसी सेवासंघाच्या ८ व्या राज्य अधिवेशनाच्या निमित्ताने

ओबीसी सेवा संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी १० डिसेंबर २०१७ रोज रविवारला आयोजित करण्यात आले आहे. पापड हे एक ऐतिहासिक ठिकाण आहे. भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचे ते जन्मगाव. पंजाबराव देशमुख यांचे जेवढे योगदान देशासाठी आहे तेवढेच भरीव काम त्यांनी बहुजन समाजाच्या कल्याणासाठी केलेले आहे. ओबीसी सेवासंघ ही संघटना ओबीसी वर्गातील बुद्धिवादी अधिकारी, कर्मचारी व उद्योजक वर्गाची राष्ट्रव्यापी संघटना आहे. या संघटने मार्फत आतापर्यंत मुंबई, नाशिक, भुसावळ, नागपूर, भंडारा, गोंदिया व कोल्हापूर या महाराष्ट्रातील प्रमुख शहरात सात राज्य अधिवेशने झालेली आहेत.

Thursday, November 16, 2017

जातीनिहाय जनगणना: ओबीसीच्या मुक्तीचा जाहीरनामा

भारतीय समाज एकसंघ आणि समानतेच्या अधिष्ठानावर उभा राहावयाचा असेल तर समाजातील सर्व नागरिकांचा दर्जाही समान असला पाहिजे. तथापि भारतातील काही समाज घटक काही ऐतिहासिक कारणामुळे, इतर समाज घटकापासून जवळ जवळ सर्वच क्षेत्रात मागासलेले राहिले. ते जोपर्यंत इतर  समाजाच्या बरोबरीस येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने समतेचे तत्वज्ञान प्रत्यक्षात येवू शकणार नाही. या शुध्द तार्किक विचाराने भारतीय संविधानकर्त्यांनी मागासलेल्या समाजघटकांना इतर समाज घटकाबरोबर बरोबरीने येण्यासाठी त्यांना काही खास सवलती देण्यात आल्या. दुसऱ्या शब्दात यालाच आरक्षण असे म्हटले जाते. भारतीय संविधानात मागासवर्ग या शब्दाची निश्चित असी व्याख्या दिलेली नाही. तथापि

Wednesday, October 25, 2017

विश्वविद्यालय चुनावों मे एबीवीपी की हार

“अखिल भारतीय विद्यार्थी परिषद” (एबीवीपी) यह संघ की एक शाखा है संघ की यह विद्यार्थी शाखा विश्वविद्यालयोंके चुनावो में भाग लेकर अपने चुने हए प्रतिनिधिद्वारा विद्यापीठ प्रशासनपर अपना दबाव बढाता है भाजपा के भावी नेता इस विद्यार्थी परिषद से निकलते है संघ की यह छात्र शाखा विद्यार्थी और विश्वविद्यालयोमे संघ की विचाराधारा कों प्रसारित करती है मुख्यत: बहुजन समाज के विद्यार्थी इनके अजेंडे पर होते है बहुजन छात्रपर सीधे तौर पर संघ विचारधारा नहीं थोपते बल्की सुरुवाती दौर में  बहुजन विद्यार्थीयोकी समस्याओ पर अपना ध्यान केंद्रित कर उन्हें “अखिल भारतीय विद्यार्थी परिषद” का सभासद बना लेते है जिस वर्ग या जातीसमूह से विद्यार्थी आते है, उस वर्ग या जातिविशेष की समस्याओ पर संघ और परिषद के काम करने के तरीके कों अवगत कराया जाता है. मुख्यत: हिंदू मुस्लिम भेद पर प्रकाश डालकर मुसलमान देश के लिए कितने खतरनाक है, इसका सिध्दांत (थेरी)  समझाया जाता है

Saturday, October 14, 2017

नांदेड महापालिकेच्या निकालासंदर्भाच्या निमित्ताने ........

नुकताच नांदेड महापालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला. त्यात कांग्रेसने इतरापेक्षा चांगलीच बाजी मारली. निवडणुकांच्या निकाल बघितल्यानंतर मला एका हताश झालेल्या तरुणाचा फोन आला. म्हणाला,  नांदेड हा आंबेडकरवाद्यांचा बऱ्यापैकी बालेकिल्ला आहे. तिथे नेहमी प्रबोधनात्मक कार्यक्रम होत असतात. कोपर्डी प्रकरणानंतर लाखोच्या प्रमाणात बहुजन क्रांती मोर्चे निघाले. त्या मोर्च्याच्या संख्येवरून नांदेड च्या आगामी राजकारणात बदल होईल असे वाटले होते. परंतु महानगरपालिकेचा निकाल लागला आणि माझा भ्रमनिराश झाला. असे का झाले असावे? असा त्यांनी मला प्रश्न केला. प्रश्न महत्वाचा तसाच गंभीर होता. मी त्याला उत्तरादाखल म्हणालो, महापालिकेच्या एकेका वार्डात

Sunday, October 8, 2017

कोण है श्रेष्ठ: रावण या राम ?

हर साल दशहरा आता है. दशहरे में कुछ लोग और संस्थाए रावण का पुतला बनाकर जलाते है. बड़े बड़े शहरों में नेताओ और तथाकथित सफ़ेद / भगवे वस्त्रधारी साधूओ के समक्ष रावण कों जलाने का कार्यक्रम होता है. रावण कों जलाने का काम राम, लक्ष्मण और सीता के पात्रधारी युवक व युवतियो द्वारा किया जाता है. लेकिन एक प्रश्न उठता है, रावण कों क्यों जलाया जाता है? क्या था उसका अपराध? क्या रावण ने इतना घिनौना काम किया था? जिससे लोग तिरस्कार कर उसे जला दे? तथा राम का चारित्र्य इतना मौल्यवान था की भक्ति भाव से उसकी पूजा की जाए? क्या राम सन्मान के इतने पात्र थे, की  उन्हें भगवान का दर्जा मिले? जैसी दानव की व्याख्या की जाती है वैसीही भगवान की व्याख्या हो. उनके गुणों, कार्यों और चारित्र का इमानदारी से विश्लेषण हो और बादमे उन्हें उस दर्जे के लायक समझा जाए. अच्छे और बुरे आदमी की समीक्षा जिस तथ्योंपर होती है, वही तथ्योपर तथाकथित दानव और भगवान की समीक्षा हो.

Wednesday, September 6, 2017

मराठा आंदोलनाचे “पानिपत”

कोपर्डी प्रकरणातून मराठा आंदोलनाचा जन्म झाला. असा साधारण समज परंतु एकूणच स्थिती बघितली तर त्यात काहीही तथ्यांश दिसत नाही. तरीही कोपर्डी हे आंदोलनाचे तात्कालिक कारण आहे. कोणत्याही जाती जमातीची महिला असो. तिच्यावर अन्याय झाल्यास जो अपराधी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे असे कोणताही सुज्ञ माणूस म्हणू शकेल. महिलावरील अत्याचाराला जातीच्या चष्म्यातून बघणे हाच एक मोठा जातीयवाद आहे. भारतीय मानसिकतेमध्ये असा जातीयवाद ठासून भरलेला आहे. “एक मराठा लाख मराठा” या शब्दांशामध्ये जाती अभिमानाचा फार मोठा दर्प दडलेला आहे. तो या मराठा मोर्च्याच्या दृश्याने उघड झाला.

तरीही विचाराचा वारसा चालविनारच.............

पत्रकार तथा लेखक गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली. मन स्तब्ध व अस्वस्थ झाले. भारतात एका नव्या “नरसंहारक” संस्कृतीचा विकास झाला. या नरकासुराना कसे रोखायचे? कोण रोखणार? आता तर बोलण्याचे व लिहिण्याचे स्वातंत्र्यच पूर्णत: हिरावून घेतल्या गेले आहे. आमच्या विरोधात बोलाल वा लिहाल, तर खबरदार. तुमचाही आम्ही लंकेश करू. असा हा सरळ धमकीवजा इशारा आहे.

Saturday, August 26, 2017

धर्म के ठेकेदार और महिलाओका शोषण

भारत का आधुनिक कालखंड, जहा किताबों एंव लेखो में लिखीत, नारो मे सिमित, वर्तमानपत्रों में छापित तथा विद्वानों, संन्यासियो एंव राजनेताओ के भाषणों में तरंगति और लहराती नारी की महिमा कितनी सुंदर और सहज दिखती है. कभी कभी लगता है इनके अंदर नारी पूर्णत: समा गई हो. नारी हमारी माता है और बहन है. वह विश्व की जननी है. इसके अलावा दूसरे भी रिश्ते होते है. जिसे हम सन्मानजनक दृष्टी से देखते है. महिला का सन्मान सर्वोपरि होता है. सभ्य नागरी समाज में महिला का स्थान बराबरी और सामान अधिकार का होता है. नारी के चरित्र्य की रक्षा समयोचित की जाती है. यही सभ्य समाज के लाक्षणिक गुण होते है. ऐसे सभ्य समाजपर सृजनता का प्रातिनिधिक होने पर गर्व होना चाहिए. भारतीय सभ्य समाज ने महिलाओको सब अधिकार दिए जिसका वह हकदार है.

Wednesday, August 9, 2017

विठ्ठल रामजी शिंदे यांचे बौध्दानुयायन

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे भारतातील सुधारक चळवळीतील अग्रगण्य नेते होते. स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग हा मवाळ व्हाया जहाल असा होता. सामाजिक सुधारणांच्या संदर्भात बाळ गंगाधर टिळकासी वैचारिक खटके उडाल्यानंतर त्यांच्या विचारसरणीत आमुलाग्र बदल झाला होता. धार्मिक व सामाजिक विषमतेतील विसंगती त्यांना डिवचू लागली होती. धर्म ही त्यांच्या जीवनातील मुलभूत प्रेरणा होती. परंतु त्यांच्या कल्पनेतील धर्म हा पोकळ व भाटूगिरी तत्वाचा नव्हता. त्यानी धर्माची सरळसुध व्याख्या केली होती. धर्म म्हणजे सबलानी दुर्बलांना, वरिष्ठांनी कनिष्ठांना सत्तेमध्ये व ज्ञानामध्ये सहभागी करून घेणे होय. समाजातल्या सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला बलशाली करणे हाच धर्म होय असे ते सांगत असत.

Friday, July 7, 2017

धर्मवेडा सावरकर व त्याची जातवेडी “सहा सोनेरी पाने”

भारतातील कट्टर धर्मवादी, सनातनी व तालिबानी हिंदुत्ववादी यांचा आवडता महापुरुष? म्हणजे वी. दा. सावरकर. तालिबानी हिंदुत्ववाद्यासाठी सावरकर म्हणजे महान देशभक्तस्वातंत्र्यसेनांनी, क्रांतीवीर, कृतिशूर विचारवंतउपयुक्ततावादी समाजसुधारकमहाकवीइतिहासकारसाहित्यिकअमोघ वक्ता इत्यादी.हिंदुत्ववाद्यासाठी सावरकरांचे उभे आयुष्य म्हणजे तत्वज्ञानाचायुगप्रवर्तक घोषणांचाधाडसी हालचालींचाशूर कृत्यांचात्यागाचा आणि हालअपेष्टांचा विस्मयकारक चित्रपटच होय! जो व्यक्ती ब्राम्हण समाजासाठी व जातीचा उच्च दर्जा कायम ठेवण्यासाठी भांडतो त्या व्यक्तीला ब्राम्हण इतिहासकार व साहित्यकारदेवपन प्राप्त करून देशाचा हीरो घोषित करीत असतात. विविध अलंकाराच्या शब्दसुमनांनी त्यांचे जीवन अदभूत व विस्मयकारी बनवून टाकीत असतात. परंतु सावरकरांच्या प्रतीमेवरून या  ओवाळलेल्या शब्दसुमनाच्या फुलांची पुटे काढून टाकली तर दिसतो केवळ ओबडधोबडपणा, कट्टर जातीयवादीपणा, ब्राम्हणी धर्माभिमानीपणा, स्वजातीचा गर्विष्ठपणा व खोटेपणाचा अस्सल प्रमाद. हिंदुत्ववादाच्या बुरख्याआडून भारतावर ब्राम्हणांचेसामाजिक, धार्मिक व राजकीय वर्चस्व स्थापित करने हा त्यांचा मुख्य उद्देश होता. नाटकी गद्य व पद्यानी सामान्य माणसाला धर्मबंधनात गुरफुटून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न सावरकरांनी आपल्या  सहा सोनेरी पानया ग्रंथातून केलेला दिसतो.

Saturday, June 24, 2017

अब कहा है? तथाकथित दलित नेता

भीम आर्मी के संघटक चंद्रशेखर आझाद कों गिरफ्तार कर जेल में डाला गया. पता नहीं, आदित्यनाथ योगी की पुलिस चन्द्रशेखर आझाद से कैसा बर्ताव करती होगी? लेकिन एक प्रश्न तो उठता है की, चंद्रशेखर आझाद किसके लिए जेल गया? क्या गुनाह था उसका? क्यों हो रहा उसे जेल? क्या शोषितोंने शोषण के खिलाफ आवाज उठाना गुनाह है?. शब्बिरपुर और सहारनपुर में अत्याचारो का प्रतिकार करना तथा दिल्ली के जंतरमंतर पर उन अत्याचारों कों लाखो जनसमुदाय के सामने सारे दुनिया कों बताना इस देश के मनुवादियोकों हजम नहीं हुवा ऐसा प्रतीत होता है.

Monday, June 5, 2017

संवादासाठी अधीर “काश्मीर”

वर्तमानपत्रात काश्मीर प्रश्नावर लिहताना पत्रकार वृत्तलेखक भड़क मथळ्याचे लेख लिहीत असतात. धगधगते काश्मीर, काश्मीरचा पेटता वणवा व हातून निसटता काश्मीर असे ते शीर्षक असलेले लेख असतात. असे लेख वाचूनच सामान्य माणसांचे माथे भडकायला सुरुवात होत असते. अशा लेखांच्या माध्यमातून काश्मिरी लोकासंदर्भात अन्य भारतीय समाजात विष पेरल्या जाते. याहूनही भयानक असते ते भारतीय वृत्त वाहिन्यांचे महा “आकडतांडव”. या वाहिन्यांचे वृत्त निवेदक काश्मीर संदर्भातील बातम्यांना अधिक रंजक बनवीत असतात. त्याच त्या ब्रेकिंग न्यूज, तेच ते रक्ताळलेले फोटो. न्यूज दाखविताना ज्या जोशात व आवेशात वृत्त निवेदक (ॲक़ंर) बातम्या सांगत असतो, ते ऐकून इतर भारतीयांचे रक्त न खवळले तर नवलच. वाहिन्यांचा हा प्रकार देशासाठी व काश्मीर साठी मात्र धोक्याचा आहे. वास्तविकता जमिनी हकीगत ही फार वेगळीच असते.

Sunday, May 28, 2017

....... यह चमारोकी नपुसकता नहीं तो, और क्या है?

उत्तर भारत में चमारोंको दूसरे सवर्ण हिंदूओ द्वारा मारा और काटा जा रहा है. चमार खुद कों हिंदू धर्म का अभिन्न अंग मानते है लेकिन स्वर्ण उन्हें हिंदू नहीं अछूत (दलित) कहते है. मुस्लिम ईसाई के विरुद्ध  दंगोके समयपर उनपर हिंदू या हिंदुत्व का लेबल चिपकाया जाता है. वे हिंदू धर्म की वर्णव्यवस्था (जातिव्यवस्था) कों मानकर चलते है. और निचले दर्जे का काम करनेमे वे खुद कों गर्व महसूस करते है. वे ब्राम्हणों द्वारा घरमे पूजा पाठ करवाते है. और उन्हें मुहमांगी दक्षिणा देते है. वे खुद जमीनपर बैठकर ब्राम्हणों तथा उची जाती के लोगोको कुर्सी पर बिठाते है. लेकिन वे कुर्सी खाली होकर भी जमीन पर बैठ जाते है. इस समानता को वे

Friday, May 26, 2017

बहेनजी (मायावतीजी) कों खुला खत

बहेनजी, आप का भीम आर्मी के सबंध में बयान सुनकर मै स्तब्ध और खिन्न रह गया. क्लेश हुवा. क्या बहनजी ऐसा भी कह सकती है? मायावती जी भीम आर्मी कों संघ एंव भाजपा का एजंट कह रही है. फिर बसपा प्रमुख के तौर पर आप मोदी का प्रचार करने गुजरात गई थी. वो क्या था?. भीम आर्मी समाज के सरक्षण और प्रबोधन का काम कर रहा है. अन्याय के खिलाफ खड़ा हो रहा है. दिल्ली के जंतर मंतर में भीम आर्मी के समर्थन के लिए जिस तरह का जनसागर इकठ्ठा हो गया था, जिसतरह चंद्रशेखर लोगो कों आवाहन कर रहा था, वो देखकर आपके पैर की

Saturday, April 8, 2017

बहुआयामी “बाबासाहेब”

बाबासाहेब आंबेडकर हे एक केवळ वादळ होते असे नव्हे तर ते एक उष्माघात होते. या “आंबेडकर” नावाच्या उष्माघाताने अनेकांना आपल्या ज्वालामध्ये गुरफुटले. आजही काहीना या ज्वाला फार दाहक वाटतात तर काहीना अंगात सामावून घ्यावा एवढा थंडावा. बाबासाहेबावर जेवढे प्रेम करणारे आहेत तेवढेच त्यांचे कट्टर विरोधकही आहेत. त्यांच्या कट्टर विरोधकांमध्ये संघ परिवाराचा मोठा गोतावळा आहे. परंतु हा संघीय गोतावळा “आंबेडकर की जय” म्हणू लागला आहे. हेगडेवार व गोळवळकर यांना कधी वाटले नसेल की, मनुस्मृतीला जाळणाऱ्या आंबेडकरांना संघ कधी आपला महानायक म्हणून कवटाळेल?. कारण ज्या व्यवस्थेच्या समर्थनार्थ व प्रसारार्थ हेगडेवार व गोळवलकर जंग जंग पछाडत होते, त्याच काळात बाबासाहेब वर्णव्यवस्था उध्वस्थ करण्यास निघाले होते. भारतीय संविधान हाच लोकाधीकाराचा ‘आत्मा’ आहे असे सांगत सुटले होते. भाई म्हणत लाल सलाम ठोकणारे मार्क्सवादी, ज्यांनी कधीकाळी बाबासाहेबांना राजकीय जीवनातून बहिष्कृत करण्यासाठी जंग जंग पछाडले ते कम्युनिस्ट आता प्रथम जयभीम व नंतर लाल सलाम ठोकू लागले. बाबासाहेब आंबेडकरामध्ये ते आपल्या अस्तित्वाचा मार्ग शोधू लागले आहे. कम्युनिस्टांच्या मरणासन्न चळवळीचा आधार

Wednesday, February 22, 2017

बहुजन समाज पक्षाचे बदलते प्रचारतंत्र

निवडणुका कोणत्याही असोत, प्रत्येक पक्षाचे एक वेगळे प्रचारतंत्र असते. आता पारंपारिक प्रचार तंत्राची जागा हायटेक प्रचार तंत्राने घेतली एवढाच काय तो फरक. २०१४ च्या लोकसभा निवडणुकामध्ये नरेंद्र मोदींनी ज्या पध्दतीने जिंकण्याच्या व्युव्हरचना केल्या व यशस्वी झाल्या, तेव्हा पासून इतर पक्षांनीही आपापल्या प्रचाराच्या  पध्दती मध्ये बदल केला. २०१४ च्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदीनी न भूतो न भविष्यती अशी विजयश्री खेचून आणली. मोदी खोटे बोलतात परंतु रेटून बोलतात. मोदींनी मिडीयाच्या माध्यमातून स्वत:ची विकासपुरुषाची प्रतिमा निर्माण केली. साथीला सोशल मिडिया व चाय पे चर्चा असे स्वरूप होते. मोदीच्या गुजरात विकासाचे स्वरूप भारतातील जनतेला आजही कळले नाही. मोदीचा गुजरात आज असंतोषाच्या सीमेवर आहे. एकूण परिस्थिती बघता पुढच्या २०१९ च्या निवडणुकांमध्ये मोदीचा चेहरा पाहणे जनता पसंत करेल की नाही? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेतच.