Sunday, January 25, 2026

Maharashtra Municipal Corporation Elections: A challenge for the opposition.


Elections to various municipal corporations in Maharashtra have been completed, and the Bharatiya Janata Party has emerged as the principal victor. Out of a total of 2,869 corporators across all municipal corporations, the party-wise distribution is as follows: BJP 1,459 seats, Shiv Sena (Shinde faction) 399, Congress 324, NCP (Ajit Pawar faction) 167, Shiv Sena (Thackeray faction) 155, AIMIM 114, Sharad Pawar faction 36, MNS 13, BSP 06, Independents 19, and smaller parties 215.

According to these results, the opposition’s strength is concentrated mainly in Latur, Vasai–Virar, Chandrapur, Malegaon, Parbhani, and Bhiwandi–Nizampur municipal corporations, where they may elect their Mayor. However, this cannot be considered easy. Observing the functioning of the ruling parties in Maharashtra, it is evident that even in corporations where they lack a majority, they will attempt to install their own mayor. Through the use of “saam, daam, dand, bhed,” newly elected opposition corporators may be influenced—something that has now become a familiar pattern in the country. The anti-defection law has become ineffective, resembling a toothless United Nations. Courts too appear largely unmoved in such matters.

महाराष्ट्र नगरपालिका चुनाव: विरोधियोंके के लिए एक चुनौती

 


महाराष्ट्र की विभिन्न महानगर पालिकाओं के चुनाव संपन्न हो चुके हैं। इनमें मुख्य रूप से भारतीय जनता पार्टी ने बढ़त हासिल की है। कुल 2869 नगरसेवकों वाली महापालिकाओं में दलवार स्थिति इस प्रकार है— भाजपा 1459 सीटें, शिवसेना शिंदे गुट 399, कांग्रेस 324, राष्ट्रवादी अजित गुट 167, शिवसेना ठाकरे गुट 155, एमआईएम 114, शरद पवार गुट 36, मनसे 13, बसपा 06, निर्दलीय 19 और छोटे दल 215 आए हुए परिणामों के अनुसार विपक्ष की ताकत मुख्यतः लातूर, वसई–विरार, चंद्रपुर, मालेगांव, परभणी और भिवंडी–निजामपुर महानगर पालिकाओं में है, जहाँ वे सत्ता में आ सकते हैं, लेकिन यह आसान नहीं कहा जा सकता। महाराष्ट्र के सत्ताधारी दलों के नेता और कार्यकर्ताओं की कार्यशैली देखते हुए, बहुमत न होने पर भी वे अपनी रणनीति से अपना महापौर बनाने की कोशिश करेंगे। ‘साम, दाम, दंड, भेद’ की नीति से विपक्ष के नवनिर्वाचित नगरसेवकों को अपने पक्ष में करने की प्रवृत्ति अब देश में सामान्य हो चुकी है। दल-बदल विरोधी कानून निष्प्रभावी हो चुका है और उसकी स्थिति बिना दाँत वाले संयुक्त राष्ट्र जैसी हो गई है। न्यायालय भी ऐसे मामलों में तटस्थ दिखाई देता है।

Friday, January 23, 2026

महानगरपालिकेचे निवडणूक निकाल: विरोधी पक्षासाठी एक इशारा

 


महाराष्ट्रातील विविध महानगर पालिकांच्या निवडणुका पार पडल्या. यात मुख्यत्वाने भारतीय जनता पक्षाने बाजी मारलेली आहे.  महापालिकेत एकूण २८६९ नगरसेवक संख्या असलेल्या पक्षनिहाय नगरसेवकांची पक्षनिहाय स्थिती पुढील प्रमाणे आहे. भाजप १४५९ जागा, शिवसेना शिंदे गट ३९९, कॉंग्रेस ३२४, राष्ट्रवादी अजित गट १६७, शिवसेना ठाकरे गट १५५, एम आय एम ११४, शरद पवार गट ३६, मनसे १३,बसपा ०६, अपक्ष १९ व छोटे पक्ष २१५. आलेल्या  निकालानुसार   विरोधकांचे संख्याबळ मुख्यत्वे लातूर, वसई-विरार, चंद्रपूर, मालेगाव, परभणी भिवंडी-निजामपूर या महानगरपालीकामध्ये असून  तेथे ते सत्ताधारी बनू शकतात परंतु हे सोपे व अधिक सहज आहे असे म्हणता येत नाही. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष, नेते व कार्यकर्ते यांची स्थिती बघितली तर बहुमत नसलेल्या महानगरपालिकेमध्ये सुध्दा स्वत:चा महापौर बनविण्याची त्यांची रणनीती असेल. साम, दाम, दंड, भेद ह्या नीती वापरून विरोधी पक्षाचे नवनियुक्त नगरसेवक त्यांच्या गळाला लागतील, देशाच्या हे आता अंगवळणी पडले आहे. पक्षांतर बंदी कायदा हा निष्प्रभ झालेला असून त्याची अवस्था बिन दाताच्या युएन (UN) सारखी झाली आहे. आपली न्यायालये अशा प्रकरणावर स्थितप्रज्ञ असल्याचे दिसून येते.  

Friday, November 21, 2025

डॉ. आंबेडकरांचा भारतीयांना इशारा..“ संविधानाला दुर्लक्षित केल्यास, लोकशाही धोक्यात”

 


भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेतील आपल्या अंतिम भाषणात एक गंभीर इशारा दिला होता. ते म्हणालेसंविधान कितीही उत्तम असले तरी, जर ते चालवणारे लोक चुकीचे असतील तर ते संविधान काही कामाचे नाही. त्यांनी पुढे ठामपणे सांगितले की जर आपण संविधानाच्या मर्यादा आणि मूल्यांकडे दुर्लक्ष केले, तर लोकशाही निश्चितच धोक्यात येईल. आज जेव्हा आपण लोकशाही मूल्यांना आणि संविधानिक  संस्थांना एका वेगळ्याच आव्हानांना सामोरे जाताना पाहतो, तेव्हा आंबेडकरांचा हा इशारा आजच्या स्थितीस फारच प्रासंगिक वाटतो.

Friday, August 29, 2025

वारकर्‍यांच्या विठ्ठलाचे हिंदुत्वीकरण !


पंढरपूरचा विठ्ठल हा वारकरी संप्रदायाचा केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातो. आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी करणार्‍याला वारकरी म्हणतात. हि वारी सर्वसमावेशक समतेच्या प्रवासाची असते. या वारीत कुणबी, मराठा, महार ब्राम्हण, माळी व धनगर सर्व जाती व धर्माचे लोक एकत्र चालतात. हा लोकसमतेचा जिवंत प्रयोग असतो. संत नामदेव, ज्ञानेश्वरतुकाराम, चोखामेळा, सावता माळी,  जनाबाई आणि  मुक्ताई यांच्यासारख्या अनेक संतांनी उभारलेली वारी परंपरा लोकसामान्यांची परंपरा बनली असून वारकरी संप्रदाय महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचा भाग झालेला आहे. हा वारकरी संप्रदाय प्रेम, समता, भक्ती आणि सर्वसमावेशकतेचा संदेश देणारा आहे, तर  पंढरपूरचा विठोबा  आपल्या भक्तांचा निर्विवाद असा लाडका देव व सखा असून त्याचे अधिष्ठान जाती व धर्मव्यवस्थेच्या पलीकडील समतेचे आहे. 

Monday, July 28, 2025

पंढरपूरचा विठ्ठल आहे तरी कोण ?

 

आषाढी महिन्यामध्ये महाराष्ट्रात वारकरी समुदाय नाचत गाजत पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असतो. दरवर्षी जेव्हा विठ्ठलाच्या वारीचा काळ येतो तेव्हा नेमका विठ्ठल आहे तरी कोण? यावर प्रश्न निर्माण होवून बौद्धिक चर्वण सुरू होते. आता तर सोशल मिडीयाचा जमाना आहे, त्यामुळे वर्तमानपत्रे व वृत्तवाहिन्यांवर अवलंबून न राहता सोशल मिडीयावर विस्तारित चर्चा होवू लागली आहे.    

Thursday, July 3, 2025

लद्दाख: लेह से पॅगोंग लेक व्हाया नुब्रा वॅली (एक अविस्मरणीय सफर)


लद्दाख भारत का एक अद्भुत और मनमोहक पर्यटन स्थल है, जो अपने ऊंचे पहाड़ों, नीले झीलों और शांत प्राकृतिक सौंदर्य के लिए प्रसिद्ध है। यहां की यात्रा एक अविस्मरणीय अनुभव प्रदान करती है। लेह से पॅगोंग लेक तक की यात्रा, जो नुब्रा वॅली से होकर गुजरती है, एक रोमांचक और यादगार सफर है। इस यात्रा में पर्यटकों को लद्दाख की संस्कृति, प्राकृतिक सुंदरता और रोमांचक मार्गों का आनंद मिलता है।

लद्दाख की राजधानी लेह इस यात्रा का प्रारंभिक बिंदु है। लेह एक ऐतिहासिक और सांस्कृतिक केंद्र है, जहां बौद्ध मठ, पुराने महल और स्थानीय बाजार देखने को मिलते हैं। लेह पैलेस, शांति स्तूप और थिकसे मोनेस्ट्री यहां के प्रमुख आकर्षण हैं। यहां से यात्रा की शुरुआत करने से पहले पर्यटकों को ऊंचाई की समस्या (एएमएस) से बचने के लिए कुछ दिन आराम करने की सलाह दी जाती है।

लद्दाख: लेह ते नुब्रा व्हॅली मार्गे पँगोंग सरोवर (एक अविस्मरणीय प्रवास)

 लद्दाख हे भारतातील एक अद्भुत आणि मोहक पर्यटन स्थळ आहे, जे त्याच्या उंच पर्वत, निळे तलाव आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील प्रवास एक अविस्मरणीय अनुभव देतो. लेह ते पँगोंग सरोवर, जो नुब्रा व्हॅलीमधून मार्गे जातो, तो एक रोमांचक आणि संस्मरणीय प्रवास आहे. या प्रवासात पर्यटकांना लडाखची संस्कृती, नैसर्गिक सौंदर्य आणि रोमांचक मार्गांचा आनंद घेता येतो.

लद्दाखची राजधानी लेह हे या प्रवासाचा प्रारंभ बिंदू असला तरी लेह ला श्रीनगर मार्गेही जाता येते. लेह हे एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे, येथे बौद्ध मठ, जुने राजवाडे आणि स्थानिक बाजारपेठा पाहता येतात. लेह पॅलेस, शांती स्तूप आणि ठिक्से मठ हे येथील प्रमुख आकर्षण आहेत. लेह मधून पुढे प्रवास सुरू करण्यापूर्वी, उंच लद्दाखमध्ये पर्यटकांना ऑक्सीजन लेवलसोबत जुळवून घेण्यापासून एक वा दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो.

Thursday, June 26, 2025

लद्दाख येथील बौध्द धर्म: उगम व प्रसार


लद्दाख हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे. जम्मू काश्मीर पूर्ण राज्य असताना, लद्दाख हा जम्मू काश्मीरचा अविभाज्य भाग होता. लद्दाख हे क्षेत्र धोरणात्मक दृष्टिकोनातून भारताचे एक महत्त्वाचे अंग आहे. कारण लद्दाखच्या सीमा भारताचे अंतर्गत प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान आणि चीनशी जोडल्या गेल्या आहेत. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर १९४८ मध्ये पाकिस्तानने आणि १९६२ मध्ये चीनने लद्दाखवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. परंतु लद्दाखच्या जनतेने भारतीय सैन्याला भक्कम पाठिंबा दिला आणि १९७१ च्या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या बाल्टिस्तान प्रदेशातील तुर्तुक आणि थांग पर्यंतचा प्रदेश परत घेतला. लद्दाखी लोकांची भारताबद्दल असलेली ओढ आणि श्रद्धा अद्वितीय आहे. याचे मुख्य कारण म्हणजे भारत गौतम बुद्धांची भूमी आहे आणि लद्दाखच्या लोकांचा बौद्ध धर्म व बुध्दावर दृढ विश्वास आहे. ब्रिटीश काळात लद्दाखमध्ये ख्रिश्चन धर्मप्रसार करण्यासाठी ब्रिटन, जर्मनी, इटली आणि हंगेरी येथून ख्रिश्चन धर्मप्रसारक आले. त्यांनी प्रथम येथे लद्दाखी आणि तिबेटी भाषा शिकून बौद्ध धर्म समजून घेतला.  त्यांनी लद्दाखी-इंग्रजी आणि लद्दाखी-जर्मन शब्दकोश तयार केले.

Saturday, June 21, 2025

लद्दाख में बौध्द धर्म

 


आज के समय लद्दाख भारत का एक केंद्रशासित प्रदेश है। जब जम्मू काश्मीर पूर्ण राज्य के स्वरूप में था, तब लद्दाख जम्मू काश्मीर का अभिन्न अंग था। लद्दाख सामरिक दृष्टी से भारत का महत्वपूर्ण प्रदेश है। क्योकि लद्दाख की सीमाए भारत के अंतर्द्वंदी पाकिस्तान और चीन के साथ जुडी है। भारत के स्वतंत्रता के बाद लद्दाख को हड़पने का प्रयास पाकिस्तान ने १९४८ में, तथा चीन द्वारा १९६२ में किया गया था। लेकिन लद्दाखवासियोने भारतीय सेना का साथ देकर १९७१ के युध्द में पाकिस्तान के बाल्टिस्तान क्षेत्र से तुरतुक और थांग का भूभाग वापिस ले लिया। लद्दाखवासियोंको भारत के प्रति अपनापन एंव जो श्रध्दा रही, वह अद्वितीय है। इसका मुख्य कारण भारत गौतम बुध्द की कर्मभूमि होना एंव लद्दाख के लोगो में बौध्द धर्म के प्रति दृढ़ आस्था रहना है। लद्दाख में इसाई धर्म के प्रसार के लिए ब्रिटिश, जर्मन, इटली एंव हंगेरी से इसाई मिशनरी आये। उन्होंने यहाँ पहले लद्दाखी एंव तिब्बती भाषा सीखकर बौध्द धर्म को जाना। लद्दाखी -अंग्रेजी और जर्मनी शब्दकोष बनाए। 

Thursday, April 17, 2025

युगप्रवर्तक: मान्यवर कांशीराम

कांशीरामजी यांच्या राजकीय सत्ता हातात घेण्याच्या संकल्पनेला काही बुद्धिवादी विचारवंताना सोडले तर बहुंतांशी विचारवंतांनी फारसे उचलून धरले नव्हते. याचे कारण म्हणजे सत्ताधारी पक्ष प्रस्थापित विचारांच्या मिडीयाच्या विरोधात गेलो तर आयुष्यात आपल्याला काहीही (पद प्रतिष्ठा) साध्य करता येणार नाही’ या भीतीने काही तथाकथित आंबेडकरवादी कांशीरामजींच्या संघर्षापासून दूर राहिले. व्यक्तिगत लाभासाठी सत्ताधार्यांना चुचकारणे त्यासाठी समाजाचा बळी देणे हे अशा लोकांचे ध्येय राहिले होते.दलितांच्या सामाजिक न्याय आर्थिक उन्नतीच्या मुद्द्यांना बगल देण्याचे प्रयत्न जाणीव पूर्वक होत आहेत. अशा अवस्थेत बहुजनवादी कधीपर्यंत विघटीत राहणार आहेत? हा आजचा मोठा प्रश्न आहेसंपूर्ण समाजाचा विकास बघायचा कि केवळ एक दोन नेत्यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा विकास हे आता लोकांनीच ठरवायला हवे. एक संघटना एक पक्ष या भूमिकेकडे हा बहुजन समाज कधी बघणार आहे? सांस्कृतिक, सामाजिक राजकीय लढे हे एकाच वेळेस एकमेकाच्या साथीने लढल्यास ध्येय लवकर गाठता येईल हे आजच्या तथाकथित नेत्यांना  का कळत नाही? समाजाच्या विकासासाठी नियोजन, साधनसामग्री, दबाव गट, एकीकृत वोट बँक, अवलोकन करण्याची क्षमता सत्ताधार्यांना वाकविण्याची कुवत निर्माण झाली पाहिजे.

Tuesday, April 15, 2025

संभाजी महाराजाचे खरे शत्रू कोण?

 


चित्रपटगृहात संभाजी राजेवर आधारित छावा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर देशात दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाली. वास्तविकत: छावा सिनेमा शिवाजी सावंत यांच्या छावा कादंबरीवर आधारित आहे. अशा कादंबर्या व नाटकातील बरेच प्रसंग हे काल्पनिक असतात. परंतु साध्या भोळ्या जनतेला असे प्रसंग खरे वाटू लागतात त्यातूनच आपले मत बनवीत असतात. अशावेळेस  स्वार्थी राष्ट्रद्रोही प्रवृत्तीचे नेते त्यात तेल ओतण्याचे काम करतात. यातून आपल्या देशाचे नुकसान होते हे त्यांच्या लक्षातही येत नाही

Wednesday, February 12, 2025

प्यू रिसर्च सर्वे: जगभरात वाढत्या धार्मिक राष्ट्रवादाची दाहकता

 

अलीकडेच प्यू रिसर्च सेंटर्स या संस्थेने जगभरात वाढता धार्मिक राष्ट्रवाद व त्याची देशानुरूप तुलना यावर संशोधनात्मक सर्वे केला. प्यू रिसर्चने हा सर्वे एकूण ३५ देशांमध्ये जानेवारी २०२४  पासून मे २०२४ पर्यंत करण्यात आला. या सर्वेनुसार जगभरात धार्मिक राष्ट्रवादाची होत असलेली वाढ ही एक जागतिक प्रवृत्ती  बनत चालली आहे. हा धार्मिक राष्ट्रवाद त्या त्या देशाची सद्यस्थिती व राजकारणाला प्रभावित करीत असून अशा देशात प्रभावी धर्मवादी नेतृत्वाचा उदय झाला आहे. बहुसंख्यांक धर्मवाद व राजकारण एकमेकाचे सहकारी बनू लागले असून ते धर्मनिरपेक्ष लोकशाहीला मारक ठरत आहे.

Sunday, January 26, 2025

मनुस्मृति का दहन! लेकिन आगे क्या?

 महाराष्ट्र में हर साल नियमित रूप से 25 दिसम्बर को मनुस्मृति नामक किताब को जलाया जाता है. मनुस्मृति का दाह संस्कार अब महाराष्ट्र के बाहर भी किया जा रहा है। डॉ. बाबासाहाब आंबेडकर  ने मनुस्मृति क्यों जलाई गई?. इसे समझने के लिए मनुस्मृति नामक किताब को पढ़ना जरुरी है। पढनेपर किताबमे छिपी हुई बाते पाठक के ध्यान में आ सकती है। उनमें से कुछ पाठक प्रतिक्रियावादी हो सकते हैं। यदी कोई पाठक धार्मिक प्रवृत्ति का हो, तो वह कहेगा की, मनुस्मृति एक धार्मिक ग्रंथ है. तदनुसार कार्य करना चाहिए। तथापि, जाब कोई व्यक्ति इस प्रकार की बात कहेगा, तब उसे सबसे पहले पुस्तक में लिखी सभी बातें अपने परिवार पर  उपकृत करनी चाहिए। तभी ऐसी प्रतिक्रिया को महत्व दिया जा सकता है।  

Sunday, January 12, 2025

मनुस्मृतीचे दहन ! परंतु पुढे काय?


भारतात दरवर्षी २५ डिसेंबर या दिवशी मनुस्मृती या पुस्तकाचे दहन करण्यात येते. महाराष्ट्रात हे दरवर्षी नित्यनेमाने होत असते. मनुस्मृतीचे दहन आता महाराष्ट्राच्या बाहेर सुध्दा करण्यात येते. या पुस्तकाचे दहन का केले जाते ? हे समजण्यासाठी मनुस्मृती हे पुस्तक वाचणे फार आवश्यक आहे. मनुस्मृती वाचल्यानंतर त्यात काय दडलेले आहे, हे वाचकाच्या ध्यानी येवू शकेल. त्यापैकी काही वाचक प्रतिक्रियावादी बनू शकतात. परंतु एखादा वाचक जैसे थे वादी प्रवृत्तीचा असेल तर तो म्हणेल कि, मनुस्मृती हे एक धर्मपुस्तक आहे. त्यानुसार वागलेच पाहिजे. मात्र, अशी प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीने पुस्तकात लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीप्रमाणे वर्तन करून प्रथम आपल्या कुटुंबावर ते बंधनकारक केले पाहिजे. तरच अशा प्रतिक्रियेला महत्व प्राप्त होवू शकेल.  

Friday, November 1, 2024

विधानसभा निवडणुकामध्ये बहुजन-आंबेडकरी राजकारणाची स्थिती काय?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. त्या अनुषंगाने राजकारण करणारा प्रत्येक पक्ष कामी लागला असून तिकीट नाकारलेले नेते पक्षनिष्ठा व विचार सोडून आमदारकीच्या तिकिटासाठी इकडून तिकडे पळापळ करू लागले आहेत. दुसऱ्या मोठ्या पक्षात तिकीट न मिळाल्यास त्यांचा ओढा वंचित बहुजन आघाडी व  बहुजन समाज पक्षाकडे असतो. या पक्षांचे पारंपारिक व्होट व स्वत:च्या प्रभावातील मतदान मिळवून निवडणुक जिंकू असे या आयारामांना वाटत असते. तर आपल्या पक्षाच्या मतांची टक्केवारी वाढेल हे गृहीत धरून हे पक्षही त्यांना तिकीट देत असते. होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बसपा व वंचित आघाडीने अनुक्रमे २८८ व २०८ जागावर उमेदवार दिले असून अन्य बहुजन आंबेडकरी पक्षसुध्दा स्वतंत्ररीत्या व आघाडी करून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यात नवीन असे काही नसून यशाची पर्वा न करता प्रत्येक निवडणुकांमध्ये हे घडत असते. बहुजन आंबेडकरी राजकारणावरील हि खिपलने गळून पडावीत याची सामान्य जनता अनेक वर्षापासून वाट पाहते.  परंतु प्रत्यक्षात हे घडणे नाही याची रेघ व मेख जनतेनी ओळखून घेतली पाहिजे.   

Sunday, September 8, 2024

टिळक निर्मित गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली ?


 भारत हा देव व धर्माचा देश आहे, भारतात ३२ कोटी देव असल्याचा दावा काही दैववादी लोक करीत असतात. त्यासाठी वैदिक साहित्याचे दाखले देण्यात येतात. ज्या काळात या देशाची एकूण लोकसंख्या ३२ कोटी नव्हती, त्या काळात येथे ३२ कोटी देव वावरत होते. तरीही भारत गुलामीच्या व आक्रमणकर्त्यांच्या छायेत वावरत होता. जनतेने आपले रक्त सांडवून आक्रमणकर्त्यांना हरवून त्यांना पळवून लावले. त्यावेळेस देव काय करीत होते ? त्यांचे कार्य काय, केवळ मंदिरात निर्जीव पडून राहण्याचे होते? हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. यातून दुसरा एक प्रश्न निर्माण  होतो, तो म्हणजे देवाची निर्मिती  चतुर लोकांनी आपल्या फायद्यासाठी केली तर नाही ना !  देशात असलेली विषमता, मंदिरात होणाऱ्या चोऱ्या, मंदिरात पुजार्याकडून होत असलेले बलात्कार, त्यांच्याकडून होणारी भक्तांची फसवणूक,  देवांच्या कार्यक्रमात होणारी चेंगराचेंगरी व मृत्यू, मंदिरात पूजा केल्यानानंतर प्रवासात होणारे अपघात. हे सारे बघितले कि, एका निष्कर्षापर्यंत पोहोचण्यास मदत होते, ते म्हणजे देव व मंदिर नावाचा बागुलबुवा हा  षडयंत्रकारी, चतुर, भीती दाखविणारी  टोळी व स्वत:ला सर्वश्रेष्ठ बनविण्याचा कार्यकलाप करणाऱ्या स्वार्थी चरांनी उभा केल्याचे स्पष्ट सिद्ध होते. आजतागायत हे स्वार्थी गौडबंगाल सुरूच असून अनेकजन त्यास बळी जात आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे “ जे लोक बळी पडत आहेत, ते याबाबत तसूभरही  विचार करण्यास तयार नाहीत”. त्यामुळे फसवेगिरी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.