Wednesday, December 30, 2015

इतिहासाचा काय गर्व? नवा इतिहास तर रचा !

समाजातील प्रत्येक वर्ग वा देश आपापल्या इतिहासाचा गर्व करीत असतो. कोणाचा इतिहास हा कु प्रथानी भरलेला असतो, तरीही तो त्या विक्षिप्त इतिहासाला गौरवान्वित मानीत असतो. कोणाचा इतिहास हा कपट नीतीने भरलेला असतो. अशा इतिहासाला काही लोक आदर्श इतिहासाचे लेबल लावीत असतात. समाजातील एक वर्ग अशा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचे स्वप्न बघत असतो. गत इतिहासात काही पुरुष निर्माण झालेत, की ज्यांच्या विचारामुळे सामाजिक व्यवस्था व मानवी जीवन नरकयातनाचे केंद्र बनलेली होते. असे विनाश पुरुष सुध्दा आज त्यांचे आदर्श बनलेले आहेत. आजच्या वर्तमान काळात जे लोक अशा इतिहासाला व विनाश पुरुषांना आपला आदर्श व गर्व मानून

दै.महानायक मधील लेख


Monday, December 28, 2015

शनिशिंगणापूर महिलांच्या अपमानाचे केन्द्र

भारत हा महिला विकासाच्या संदर्भात आघाडीवर दिसत असला तरी महिलांच्या धर्म व पूजा स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये मात्र मागासच दिसतो. वेदकालीन कालखंड ते आजतागायत दिसणारे दृश्य बघितले तर, धार्मिक बाबतीमध्ये तो  महिलांच्या अपमानाचे केंद्र बनलेला आहे. कोणी एकाने म्हटले आहे, भारत हा मुर्ख लोकांचा देश आहे. धर्माच्या आतंकात तो एवढा बुडाला आहे की, त्यात तो स्वत:च्या बुद्धीलाच हरवून बसतोय. धर्म व देव ह्या गोष्टी आल्या की त्यांचे  विज्ञान व तर्क गळून पडत असतात. धर्मव्यवस्थेचा तो पार गुलाम झालाय.

कोणीही, मग ती महिला असो वा एखाद्या खालच्या जातीचा असो, त्यांनी शनी शिंगणापूरचा शनी असो वा तो ब्रम्हचारी हनुमान असो वा दुसरा कोणताही देव असो, यांच्या मुर्त्यांना स्पर्श केल्याने कोणाचेही काही बिघडत नाही हे शनीशिंगणापूरच्या घटनेने पुरते सिद्ध झाले आहे. स्पर्श केल्याने संकटाचे पहाड कोसळते, या ना त्या प्रकारचे प्रसंग ओढवतात हे सारे थोतांड असल्याचे साऱ्यांना कळून चुकले आहे. देवाची भीती हा पोटभरण्याचा धंदा झाला आहे.  

Thursday, December 24, 2015

इतिहास से गर्व क्या? नया इतिहास भी तो निर्माण करो!

समाज का हर वर्ग या देश अपने अपने इतिहास पर गर्व करते है किसी का इतिहास कुप्रथाओसे भरा होता है, फिर भी वे अपने मैले इतिहास को गौरवान्वित मानते है किसीका इतिहास छल कपट से भरा होता है, ऐसे इतिहास को भी कुछ लोक अपना आदर्श घोषित कर वर्तमान मे उसका प्रयोग करना चाहते है गत इतिहास में ऐसे पुरुष पैदा हुवे है, जिनकी विचारधारासे सामाजिक व्यस्वस्था तस की नस हो गयी थी ऐसे विनाशपुरुष भी आज किसीके गौरव है वर्तमान स्थिति में जो लोग तथा समूह ऐसे इतिहास को और कपट नितिकारोको अपना आदर्श घोषित कर उनके विचारों पर अंमल करना चाहते है, वे लोग लोकतंत्र को नकारते है, समानता से उन्हें डर लगता है, की जिससे वे अपना वजूद खो न बैठे अहंकारिता की कायरता उनके दिल दिमाग में बैठी होती है इस विचारधारा के लोग कभी भी बहुसंख्यांक नहीं होते अल्पसंख्यांक होते हुवे भी वे

Sunday, December 13, 2015

...... हा तर मुलभूत हक्क विरोधी निर्णय

हरियाणा सरकारकडून राज्याच्या पंचायत निवडनुकामध्ये उभे राहण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यात आली. या नियमानुसार पंचायती निवडणुकांमध्ये उभे राहण्यासाठी किमान दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण असण्याची अनिवार्यता, तसेच वीज बिल व बक हप्ते न भरणारे व थकबाकी असणारे लोक निवडणुकांना उभे राहू शकणार नाहीत. ज्यांच्यावर गंभीर अपराधिक आरोप आहेत असे व ज्यांच्या घरी कार्यान्वित शौचालय नसेल अशा लोकांनाही निवडणूक लढविण्यापासून हरियाणा सरकारने वंचित केले  आहे.
सरकारच्या या निर्णयाविरुध्द दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने हरियाणा सरकारच्या नियमांना वैध ठरविले आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निकाल वरकरणी चांगला वाटत असला तरी तो धक्कादायक आहे. हा निर्णय जनतेच्या निवडणूक लढविण्याच्या मुलभूत हक्कावर गदा

Saturday, December 5, 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जातीनिर्मुलन व आजची वास्तव स्थिती

भारतात जातीव्यवस्थेची भीषणता मांडणारे व जातीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगणारे बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्ती होत. जातीची मीमांसा करताना ते कोणासही भीत नसत. म्हणूनच जाती व वर्णव्यवस्थेची जननी असणाऱ्या मनुस्मृतीला जाळून टाकण्याचे धाडस त्यांनी केले. कोणत्याही देशात न आढळणारी जातीसंस्था हा भारतातील एक “महारोग” असे ते म्हणतात. हिंदू लोक बुद्धिहीन व अमानुष आहेत म्हणून जातीभेद पाळतात असे नव्हे, तर ते अधिक धर्मपरायण असल्यामुळे जातीभेद पाळतात. त्यासाठी त्यांच्या मनात जातीय वृत्ती रुजविणारा धर्म हाच जबाबदार आहे. बाबासाहेब म्हणतात, जातीव्यवस्थेचे खरे शत्रू जातीभेद पाळणारे लोक नसून त्यांना जातीभेद पाळावयास शिकविणारी शास्त्रे आहेत. शास्त्रवचने पवित्र व अपरिवर्तनीय असून ती सदैव पाळली पाहिजे. ही मानसिक श्रद्धा लोकांच्या मनात ठासून भरली आहे. म्हणून प्रथम शास्त्रप्रामाण्यावरील श्रद्धा नष्ट करने हाच खरा उपाय आहे असे ते म्हणतात. वेद व शास्त्रे ह्याचे

Tuesday, December 1, 2015

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले जातीमुल्यांकन

बाबासाहेब आंबेडकरांचा “अनिहीलेशन फ कास्ट” हा ग्रंथ असंख्य भारतीयांना अपरीचयाचा आहे. एखाद्या पुस्तकावर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो व नाव दिसले की ते पुस्तकच अस्पृश्य होत असते. त्या पुस्तकांना चाळने तर सोडाच, त्यावर नजर पडली तरी ते न पाहिल्यासारखे केल्या जाते. हा भारतीय जातीयवादाचा अस्सल नमुना आहे. ह्या जातीय मानसिकतेमुळे डाक्टर आंबेडकरांचे अनेक गाजलेली व तर्काने तुडूंब भरलेली पुस्तके सामान्य हिंदुच्याच नव्हे तर उच्चवर्णीय हिंदुच्या ग्रंथालयातील बुकसेल्फ मध्येही मिळणार नाहीत. बाबासाहेबांचे अनिहीलेशन फ कास्ट, कास्ट इन इंडिया व अनटचेबल हे समाजशास्त्रावरील प्रभावी ग्रंथ भारतातील विद्यापीठात अभ्यासक्रमात अजूनही लावले नाही. हे पाहता देशातील विद्यापीठे देखील जातीय मनोवृत्तीपासून अलिप्त नाहीत असे म्हणावे लागते. आंबेडकरांचे विचार न वाचताच त्यांच्याविषयी द्वेषमुलक भावना ठेवणारी पिढीच या देशात निर्माण करण्यात आली आहे. काही संघटना द्वेषाचा हावारसा आजही चालवीत आहेत. तसे नसते तर आंबेडकरांच्या विचारांनी हा देश कधीचाच आर्थिक व सामाजिक दृष्ट्या जापान व नेदरलंड या देशाच्या रांगेत जावून बसला असता.

Friday, November 6, 2015

असहिष्णुतेचे विषाणू

इतिहासकार इरफान हबीब यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ या भाजपाच्या मातृसंघटनेची तुलना इसीस/तालिबानी अशा आंतकवादी संघटनेसी केली असल्याची बातमी अनेक वर्तमानपत्रात झळकली. त्यावर भाजप व संघीय नेत्यांचे तोल सुटलेले वक्तव्य व आगपाखड झालेले त्यांचे चेहरेही जनतेसमोर आले. यामुळे निर्माण झालेल्या मूळ प्रश्नाला बगल देता येणार नाही. इसीस/तालिबानी व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांच्या कार्यपध्दतीची तुलना सुध्दा निरपेक्ष पध्दतीने होणे आवश्यक आहे. इसीस/तालिबानी व राष्ट्रीय स्वंयसेवक संघ यांच्यात बरेच साम्य बघायला मिळते. ते दोघेही कट्टर धर्मवादी असून आपली विचारसरणी दुसऱ्यावर थोपविन्याच्या बाजूचे आहेत. इसीस/तालिबानी स्त्रियांवर बंधने आणू इच्छितात तर स्त्रियांवर बंधने घालणारा मनुस्मृती हा संघासाठी प्रिय ग्रंथ आहे. इसीस/तालिबानी आपल्या विचाराविरोधी कृत्यासाठी खुणसूत्र घडवून

Friday, October 23, 2015

वंचितावरील (दलित) अत्याचारात लक्षणीय वाढ

याअगोदर वंचित (दलित) समाजावर जातीय अत्याचार होत नव्हते असे नाही. कांग्रेस सत्तेमध्ये असलेल्या महाराष्ट्रात अमानुष असे खैरलांजी हत्याकांड झाले. सातारा जिल्ह्यातील मुळगाव (२०१२) येथे रेखा चव्हाण या महिलेस विवस्त्र करून लाकडी दांडक्याने मारहाण करीत गावातील रस्त्यांवर फिरविण्यात आले होते. अहमदनगर जिल्ह्यातील सोनई, खर्डा आणि पाथर्डी याठिकाणी वंचित समाजावरील अत्याचाराच्या कौर्याने तर परिसीमा गाठली. सतरा वर्षीय नितीन आगे यास उच्चवर्णीय मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली व त्याचे शरीर झाडाला अडकविण्यात आले होते. सोनई गावात तीन तरुणांची क्रूरपणे हत्या करण्यात आली होती तर सातारा जिल्ह्यात शेतात विहीर खोदली म्हणून मधुकर घाटगे यांची निर्घुण हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. वसई येथे महापुरुषाबद्दल अपशब्द उच्चारल्याचा जाब विचारल्याने एक पत्रकारासह दोन भावावर तरुणांच्या जमावाने प्राणघातक हल्ला

Friday, October 9, 2015

असा भारत हवाय कुणाला?

भारतीय घटनेने लोकशाही जीवन प्रणालीची सर्व समावेशक व्याख्या केली आहे. न्याय, स्वातंत्र्य,समता आणि बंधुभाव ही मूल्ये लोकशाही जीवन प्रणालीचा गाभा आहे. सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य व संधीची समानता याचे सोबतच व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्रीय एकता निर्माण करणाऱ्या बंधुतेवर तिने भर दिला आहे. असे असले तरी वरील मुल्यांचा वेगवेगळा व सुट्या पध्दतीने विचार करता येत नाही. प्रत्येक मूल्य एकमेकाशी अतूटपणे जोडले गेले आहे. ह्याच एकत्रित जीवन प्रणालीला “लोकशाही जीवन” असे म्हटले जाते. प्रत्येक भारतीयाने ही “लोकशाही जीवनप्रणाली” जपने अपेक्षित आहे. ह्या “लोकशाही जीवन” पध्दतीला तडे गेल्यास तिचे फार अनिष्ठ परिणाम होवू शकतात. याची अनेक उदाहरणे आज बघायला मिळतात. अफगाणिस्थान मध्ये तालिबानने, सिरीया व  इराक या देशात इसीसने तर आफ्रिकेमधील काही देशात बोको हराम सारख्या संघटनांनी ‘एकात्म लोकशाही जीवनप्रणाली’ ला आवाहन देत ती उधळून लावीत आहेत. मानवतेला मोठ्या हिंसक, विक्राळ व क्रूर पध्दतीने चीरडण्याचे त्यांचे मनसुबे आहेत. धर्मांधतेवर आधारित संघटना कोणत्या थरावर जातात याचे हे ज्वलंत व मूर्तिमंत उदाहरण आहे.

Friday, September 25, 2015

आरक्षणाची नाकेबंदी

भारतीय समाज व्यवस्थेचा इतिहास बघितल्यास विविध प्रकारच्या लादलेल्या कृत्रिम परंपरामुळे समाजात असमानता, विषमता, गुलामी प्रवृत्ती व अस्पृश्यता उदयास आली. ह्या व्यवस्थेमध्ये देशातील फार मोठा वर्ग बळी पडला होता. त्यांचे मौलिक हक्क पूर्णत: हिरावल्या गेले होते. सामाजिक सन्मान, शिक्षणाचा गंध व आर्थिक समृध्दी ही त्यांच्या पासून कोसो दूर होती. होती ती फक्त गुलामी. ब्रिटीश भारतात हे सारे बदलण्याची सुरुवात झाली नसली तरी पाश्चात्य देशातील समतेच्या विचारानी भारताच्या सीमा भेदल्या होत्या. नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक असमानता दूर केल्याशिवाय भारतात समताधिष्ठित समाजव्यवस्था निर्माण होणार नव्हती. त्यासाठी भारतीय घटनेने हा हजारो वर्षाचा कलंक दूर करण्यासाठी मागासलेल्या समाजघटकांना प्रगतीच्या संधी उपलब्ध्द व्हाव्या म्हणून राज्य घटनेने अनु.जाती व जमातींसाठी अनुच्छेद १४ ते १८, २९(२) आणि ४६ व्या कलमाद्वारे विशेष

Thursday, September 17, 2015

आदिवासीसाठी धोक्याची घंटा: एक दृष्टीक्षेप

आदिवासी समुदायाचा इतिहास हा त्यांच्या स्वतंत्र धर्म, संस्कृती, समृध्दी व भाषेचा इतिहास आहे. त्यांच्या  स्वतंत्र लोकशाही पध्दतीमध्ये समानता, बंधुता आणि स्वातंत्र्य याचे आचरण आहे. सहचार, सहविश्वास व सहमदत हा त्यांच्या जीवनाचा भाग. आपला स्वतंत्र धर्म व संस्कृती कोणावरही न लादता दुसऱ्याच्या धर्माचा भार आपल्या अंगावर वाहून वा लादून घेणे हा आता त्यांच्या नैसर्गिक स्वभावातील कृत्रिम शैली झालेली आहे. निसर्गावर त्यांची अतीव श्रद्धा असून दऱ्याखोरया, डोंगरे, जल, जंगल व प्राणीमात्रासी त्यांचा सबंध ही त्यांची जीवनशैली. आदिवासी समाज हा जसा जंगलात रमला तसा तो गावकुसाच्या आतमध्ये एका टोकाला वसला.

Tuesday, August 25, 2015

चळवळीत नवचैतन्य निर्माण करणाऱ्या तरुण नेत्याची गरज


आता देशात असंतोषातून आंदोलने पेटू लागलेली आहेत. गुजरात मध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी चाललेल्या आंदोलनामध्ये एक हितेश पटेल हा तरुण पटेल समुदायाचे नेतृत्व करताना दिसतोय. त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास १० लाखाचा समुदाय आंदोलनात सहभागी होतो. हितेश पटेल या तरुणाच्या संघटन कौशल्याला दाद द्यावी लागेल. दुसरा अल्पेश ठाकूर हा तरुण ओबीसी जातीचे नेतृत्व करून पटेल समुदायाला मागणीला आव्हान देतो. एकूणच गुजरातचे २२ ते २५ वयोगटातील तरुण त्या त्या समुहाचे नेतृत्व करताना दिसतात.
महाराष्ट्राचे तरुण याबाबतीमध्ये मागेच दिसतात. मागच्या सहा दशकापासून आंबेडकरी राजकीय व सामाजिक चळवळ ही गंजलेल्या, विकावू, स्वार्थी व दलालांच्या हातामध्ये आहे. याकडे आंबेडकरी तरुण केवळ ओशाळल्यागत नजरेने पहात आहे. परंतु गटातटाच्या या मस्तवाल बैलांना कोणीही प्रश्न विचारन्याची हिंमत करीत नाही. आताच्या या राजकीय व सामाजिक क्षेत्रातील बैलांना समाजाचे कोणतेही प्रश्न दिसत नाहीत. बेरोजगारी, शिक्षणाचा प्रश्न, दलितांवरील सामाजिक बहिष्काराचा प्रश्न, नोकऱ्यांचा प्रश्न, खाजगी संस्थामध्ये आरक्षणाचा प्रश्न, आरक्षनाच्या अंमलबजावणीचा प्रश्न, महिलावरील अत्याचाराचा प्रश्न व राजकीय सत्तेमध्ये स्वत:च्या ताकदीवर उभा राहण्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत. पण समाज भरडत असलेल्या विविध प्रश्नावर ह्या बैलांनी तोंडाला कुलूप लागल्यागत केले आहे. ह्या अज्ञानी, प्रश्नाची समज व त्याची खोली माहीत नसलेले व बोलण्याचा ढब नसलेल्या नेत्यांचा भार आता का सहन करायचा? सिंग नसलेल्या ह्या बैलांना चळवळीच्या मार्गातून बाहेर फेकण्याची वेळ आली आहे. वेगवेगळया पागाच्या (गटांच्या) या बैलांची वेसन धरून त्यांना गोठ्यात जेरबंद केले पाहिजे.
नवचैतन्य निर्माण करणारे तरुण आता समाजाचे नेते झाले पाहिजेत. त्यासाठी तरुणांनी सामाजिक, राजकीय व आर्थिक अशा विविध विषयाचे ज्ञानकौशल्य प्राप्त करून समाज मनाला सरळ हात घालेल असे संभाषण कौशल्य साधले पाहिजेत. संघटन शक्ती व जनतेचे मुद्दे घेवून जो तरुण समाजात जाईल त्याला आपोआपच नेतृत्व मिळेल. गंज लागलेल्या बैलांना बाजूला सारून तरुणांनी समाजाचे नेतृत्व केले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांना तरुणाकडून भरपूर आशा होत्या.

बापू राऊत  

Saturday, August 22, 2015

शिवाजी महाराज, शिवसेना व पुरंदरे

श्री ब. मो. पुरंदरेना “महाराष्ट्र भूषण” हा पुरस्कार जाहीर झाल्यापासूनच पुरंदरे हे चर्चेत आहेत. पुरंदरेना महाराष्ट्र भूषण देण्यात कोणते निकष वापरले गेले? हा प्रश्न अनेकजन उपस्थित करीत आहेत. वास्तविकत: महाराष्ट्रात पुरंदरेपेक्षा घराघरात जनजागृतीचे व खरा शिवाजी महाराज पोहोचविण्यात इतिहासकार मा.म.देशमुख यांचे कार्य मोठे आहे. आजपर्यंत महाराष्ट्रात मराठ्यांचे राज्य असूनही मा.म.देशमुख यांच्या नावाचा महाराष्ट्र भूषण साठी कधीही विचार करण्यात आला नाही. परंतु फडणवीसाचे सरकार सत्तेवर येताच पुरंदरेना महाराष्ट्र भूषण घोषित करून तो कडेकोट बंदोबस्तात प्रदान करण्यात आला. हा “महाराष्ट्र भूषण” या शब्दाचा खरा तर अपमान आहे. आजच्या घडामोडीत या पूरस्काराला “जातीवादाचे पारितोषिक” ह्या शब्दाशिवाय दुसरा पर्यायी शब्द होवू शकत नाही.

Thursday, July 23, 2015

सामाजिक, आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षण – २०११: एक दृष्टीक्षेप

सामाजिक, आर्थिक व जातनिहाय सर्वेक्षण - २०११ चे आकडे भारत सरकारने नुकतेच प्रकाशित केले. शीर्षकात “जातनिहाय सर्वेक्षण” असे नाव असले तरी सरकारने कोणत्याही जातीचे नाव न घेताच जातीविहीन आकडे प्रकाशित केले आहेत. यातून जातीची लपवाछपवी चालू असल्याचे दिसते. जनगणनेच्या प्रसिध्द झालेल्या आकडेवारीवर अनेक अर्थातज्ञानी आक्षेप घेतलेले आहेत. संपूर्ण जनगणना झाली असतानाही शहरी आकडेवारीला बगल देत केवळ ग्रामीण भारताची आकडेवारी जाहीर करण्यात आली.  सर्वेक्षणाच्या आकडेवारीवरून देशात गरिबांची संख्या वाढलेली असतानाच अनुसूचित जाती व जमातीचे आर्थिक चित्र भयावह असेच आहे. देशातील तीन कुटुंबापैकी एक कुटुंब हे भूमिहीन आहे. देशात अनुसूचित जाती व जमातीच्या भूमिहीनांचे प्रमाण अधिक वाढलेले

Friday, June 26, 2015

शाहू महाराज व बहुजनवादी चळवळ

आज देशात बहुजनवादी राजकारण व समाजकारणाची धार अधिक तीव्र झालेली दिसते. आपल्या हक्कासाठी बहुसंख्य असलेल्या मध्यम व मागास जातींनी एकत्र येवून अल्पसंख्य परंतु पुढारलेल्या व शोषक धर्मसत्ताक जातीविरुध्द केलेली चळवळ म्हणजे “बहुजनवादी चळवळ” असी प्रचलित व्याख्या आहे. या बहुजनवादी चळवळीची नाळ ही २५०० वर्षापूर्वीच्या तथागत गौतम बुद्धाच्या काळापर्यंत जाते. गौतम बुद्धांच्या “बहुजन हिताय बहुजन सुखाय” या शब्द रचनेची फोड केल्यास पुढारलेल्या व धर्मसत्ता हाती असणाऱ्या अल्पसंख्यांक जाती  ह्या अशिक्षित शेतकरी, अलुतेदार, बलुतेदार, व्यापारी ह्या बहुसंख्यांक जातीचे आर्थिक, सामाजिक व धार्मिक शोषण करून स्वत: मजेत जीवन जगत असत. या अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासाठी तथागत बुद्धाने  “बहुजन हिताय बहुजन सुखाय” ची हाक बहुजनांना दिली होती.

Sunday, June 14, 2015

उजवीकडे झुकलेल्या नेते व विचारवंताचा चळवळीवरील प्रादुर्भाव

पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात आंबेडकरी चळवळीतील श्री रावसाहेब कसबे यांनी पुरोगामी चळवळीच्या ऱ्हासाचे कारण दलितांचा ब्राम्हणद्वेष असल्याचे सांगितले. रावसाहेब कसबे यांच्या या वाक्याला प्रसिध्दी माध्यमांनी लागोलाग प्रसिध्दी दिली. झी टीव्ही वर रावसाहेब कसबे, शेषराव मोरे व हरी नरके या तथाकथित विचारवंतांना चर्चा करण्यासाठी बोलाविन्यात आले. टीव्ही स्वर उद्घोषक जसे नेहमी नेहमी हिंदुस्थान हिंदुस्थान म्हणून बळरत असतात. तसेच काहीसे उदय निरगुडकर नावाचे झी चे उद्घोषक समरसता समरसता नावाचा सतत होषा करीत होते. समता या शब्दावर समरसतेचे आक्रमण होते असे निरगुडकराना ठणकावून सांगण्याची हिंमत रावसाहेब कसबे, शेषराव मोरे व हरी नरके यांना झाली नाही. हे दुर्दैवच आहे. चर्चेमध्ये या तिघाही तथाकथित

Monday, May 11, 2015

“पत” हरविलेली आंबेडकरी राजकीय चळवळ

लोकसभा, विधानसभा व नुकत्याच झालेल्या औरंगाबाद, नवी मुंबई महानगरपालिका तसेच काही नगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल बघा. रिपब्लिकन पक्ष व बहुजन समाज पक्ष या पक्षांच्या राजकीय ताकदीचा अंदाज झालेल्या या निवडणूक निकालावरून दिसतो. रिपब्लिकन नेत्यांना त्यांची जागा मतदारांनी दाखवून दिलेली आहे. बहूजन समाजाचे मताचे राजकारण करून आपली स्वत:ची झोळी भरणारे आठवले, गवई, कवाडे, मायावती व आंबेडकर या सर्वांना बहुजन जनतेने चांगलाच धडा शिकविलेला दिसतो. त्यामुळे एकूणच आंबेडकरवादी राजकीय पक्षाचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. आंबेडकरी जनतेने  वर्षानुवर्षे जे स्वप्न बघितले होते ते एम.आय.एम सारख्या नवीन पक्षाने मुस्लीम समाजामध्ये स्वाभिमान व आत्मभान जागृत करून पहिल्या निवडणुकामध्येच विधानसभा व महानगरपालीकामध्ये प्रवेश करून दाखवून दिले.  

Saturday, April 25, 2015

मंडल आयोग व ओबीसी चळवळ

मंडल आयोग म्हणजे काय? याचे सरळ उत्तर द्यायचे झाल्यास, मंडल आयोग हा धर्मामुळे मृतप्राय झालेल्या ओबीसीचा, त्यांची सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय क्षती बघण्याचा आरसा होय. ओबीसीमध्ये  सामाजिक व राजकीय मागासलेपणाचा प्रतिशोध घेण्याची मानसिकता निर्माण करण्याचे कार्य करण्याबरोबरच जातीव्यवस्था व उच्चवर्णीयांचा सांस्कृतिक दहशतवाद हाच आमच्या मागासलेपणाच्या दुरावस्थेला कारणीभूत असल्याची जाणीव प्रथमताच मंडल आयोगामुळे झाली.

Tuesday, March 24, 2015

सम्राट अशोकाचे धम्मविषयक धोरण

जगाच्या इतिहासात ज्या ज्या सम्राटांनी आपल्या कर्तुत्वाची छाप पाडली त्या सम्राटामध्ये मौर्यवंशीय सम्राट अशोकाचे स्थान अविवादीत आहे. प्राचीन वा अर्वाचीन सम्राटांच्या पंक्तीतील अशोक हा शेवटचा चक्रवर्ती सम्राट होय. सम्राट अशोकाने भारतावर इ.स.पू. २७२ ते इ.स.पू. २३२ च्या दरम्यान राज्य केले. सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्याने पश्चिमेकडे अफगाणिस्तान  इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूर व केरळ पर्यंत आपला राज्य विस्तार केला होता. ५०,००,००० वर्गकिमी एवढा प्रचंड प्रदेश ताब्यात असलेले मौर्य साम्राज्य हे तत्कालीन सर्वांत मोठ्या साम्राज्यांपैकी एक व भारतीय खंडातील सर्वांत मोठे साम्राज्य होते.

Saturday, March 21, 2015

आम आदमी पक्षातील मनोमिलाप किती दिवस चालणार!

आम आदमी पार्टीचे बिज हे अण्णा आंदोलनातून उगवले. जनलोकपाल सारखे कायदे अमलात आणने, भ्रष्टाचाराचा महारोग व कमीशनबाजी नष्ट करण्याची अपेक्षा प्रस्थापित राजकीय पक्ष व नेते यांच्याकडून  करने हे मुर्खपनाचे आहे. ज्याला आपण चिखल समजतो त्या चिखलात उतरूनच हवे ते जनकायदे बनविता येतील. त्यासाठी नव्या राजकीय पक्षाची अनिवार्यता का व कशी आहे? हे अरविंद केजरीवाल, योगेन्द्र यादव व प्रशांत भूषण यानी अण्णा हजारेना पटवून सांगितले होते. परंतु राजकरणात सहभागी  न होता राजकारण्यांची जातकुळी कशी असते? हे अण्णा हजारेंना

Sunday, March 15, 2015

राजकीय सत्तेशिवाय जातीविहीन समाजरचना अशक्य: मा.कांशीराम

भारतीय राजकारणात बाबासाहेबानंतर जी पोकळी निर्माण झाली होती ति  मान्यवर कांशीरामजींच्या रुपाने काही प्रमाणात भरून निघायला फार मदत झाली. बहुजन समाजाला सत्ताधारी बनवायचे या एकेमेव ध्येयाने पछाडलेल्या कांशीरामजीना अनेक कूटनीतिक योजना आखाव्या लागल्या.  बाबासाहेबांचे मिशन निस्वार्थीपणे चालविण्यासाठी त्यांनी स्वत:वर काही बंधने लादून घेतली होती. त्यापैकी मी आयुष्यभर ब्रम्हचारी राहीन, आपले इप्सित साध्य होईपर्यंत कोणत्याही मनोरंजनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही व मांझी स्वत:ची कोणतीही संपत्ती राहणार नाही.
बाबासाहेबांचा “तुम्ही या देशाची शासनकर्ती जमात बना”, “राजकीय सत्ता ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे” हा संदेशच पंजाबमधील कांशीरामजीना मार्गदर्शक ठरला. त्यांनी बाबासाहेबांच्या राजकीय सत्ता हातात घेण्याच्या आदेशाला कार्यान्वित न करणा-या शोषित समाजात शासक बनण्याची महत्वाकांक्षा निर्माण केली. त्यांच्या कार्य व त्यागानेच बहुजन समाजात सत्तेत भागीदारी नव्हे तर सत्ताच हातात घेण्याची महत्वाकांक्षा वाढू लागली. त्यासाठी त्यांनी बाबासाहेबांचा  “जातीविनाश” हा कार्यक्रम काही काळापुरता बाजूला ठेवून जातीचेतना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. यामागे कांशीराजींचा तर्क असा होता की, जशजशा जाती चेतना वाढत जातील तशतशा परंपरागत वर्चस्ववादी जाती ह्या राजकीय दृष्ट्या दुर्बल होत जातील व त्यांची जागा ह्या खालच्या जाती घेतील. या त्यांच्या भूमिकेमुळे स्वकीयांच्या विरोधाला त्यांना समोर जावे लागले परंतु ते आपल्या ध्येयापासून यतकिंचीतही डगमगले नाही.
बाबासाहेबांना संपूर्ण जातीसंस्था नष्ट करून समानतेवर आधारित समाजव्यवस्था निर्माण करावयाची होती. जातीसंस्था कशा नष्ट करावयाच्या? यावर आंबेडकरवाद्यात अनेक मतभेद आहेत. बाबासाहेबांचे जातीनिर्मुलन तत्व कांशीरामजीना पूर्णपणे पटले होते परंतु ह्या जातीसंस्था कशा नष्ट करावयाच्या हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता.? कांशिरामजी म्हणतात, जब मैने जाती, जाती व्यवस्था और जातीय आचरण का गहराई से अध्ययन किया तो मेरी सोच मे ही परिवर्तन आ गया. मैने जाती का अध्ययन किताबोसे नही बल्की असली जिंदगी से किया. देश के कोने कोने से लोग बडे शहरोमे आते है. शहरोमे आते समय वे गावसे सबकुछ छोडकर आते है. लेकिन अपने साथ वे केवल खुदकी जात लेकर आते है. यावर कांशिरामजी म्हणतात, या लोकांना जर स्वत:च्या जाती एवढ्या प्रिय असतील तर अशा प्रिय असणा-या जातीना आम्ही कशा नष्ट करू शकतो? ही तर अशक्य कोटीतील बाब आहे. त्यामुळेच तात्कालिक स्वरुपात मी जाती विनाशाच्या संदर्भात विचार करने बंद केले.

जात ही अशी वस्तू नाही की  ति आमच्या सांगण्यामुळे एकदम नष्ट होईल. जातीव्यवस्था निर्माण करण्यामागे मनुवाद्यांचा मोठा स्वार्थ व गहन नीती दडलेली आहे. जोपर्यंत जातीव्यवस्था निर्माण करना-याचे उद्देश व स्वार्थ जिवंत आहेत तोपर्यंत आम्ही जाती विनाश करू शकत नाही. कारण जाती व्यवस्था कायम ठेवण्यासाठी मनुवादी आटोकाट प्रयत्न करतील. मनुवादी लोक जातीचा वापर  स्वार्थासाठी करून घेत असतील तर आम्ही सुध्दा या जातीचा उपयोग आम्ही आमचा विकास व फायद्यासाठी का करू नये? मनुवाद्यापासून  जातीचा फायदा कसा घेतला पाहिजे हे आम्ही शिकून जातीवादाचे डाव मनुवाद्यावरच उलटविले पाहिजे.
कांशीराम म्हणतात, बाबासाहेबांनी जातीच्या आधारावरच अनुसूचित जाती-जनजाती लोकाना  राजनैतिक व सामाजिक अधिकार मिळवून दिले. बाबासाहेबानीच जातीचा वापर करीत १९३१-३२ मध्ये राउंड टेबल कान्फरन्समध्ये बहिष्कृत समाजासाठी वेगळ्या मतदार संघाची मागणी केली होती. त्यांनी अनु.जाती व जनजातीना जाती हत्याराचा वापर करण्याच्या टोकापर्यंत आणून ठेवले होते. एवढेच नव्हे तर शोषित व पिडीत जातीच्या आधारावर अन्य मागासवर्गीयांच्या जातीचा एक प्रवर्ग (ओबीसी) बनवायला सरकारला सांगितले होते. यावर सरकार ऐकत नाही असे दिसताच त्यांनी आपल्या मागणीसाठी मंत्रीपदाचा राजीनामा सुध्दा दिला होता.

कांशीरामजी म्हणतात, भारताची १० करोड लोकसंख्या ही घाणीच्या जागेत झोपडपट्ट्या बांधून राहण्यास मजबूर आहे. एवढेच नव्हे तर रस्ते व रेल्वे स्थानकावर आपापले बि-हाड ठेवून ते जीवन व्यतित करतात. हे १० कोटी लोक आपल्याच देशात शरणार्थी लोकासारखे राहतात. परंतु त्याकडे सरकारचे लक्षच जात नाही कारण हे लोक सरकारच्या जातीचे नाहीत. आज जातीव्यवस्था एवढी मजबूत आहे की हे शासक लोक आपल्या काश्मिरी पंडितासाठी अर्थसंकल्पात पुनर्वसनाची तरतूद करते. पाकिस्तानातून आलेल्या सिंधी लोकांना भारतात त्यांच्या व्यापार व उद्योगासाठी स्वत:हून सवलती देते. आणि हे सगळे जाती मुळेच घडून येते. कांशीराम म्हणतात शासक जातीच्या अशा वागनुकीतूनच मी बरेच काही शिकलो. म्हणूनच ज्या बहुजन समाजाचा जातीच्या आधारावर छळ व अपमान करण्यात आला. त्याच जातीचा आधार घेवून व तिला योग्य प्रकारे वापरून बहुजन समाजाला  अन्याय व शोषणमुक्त करता येईल या माझ्या विचारावर मी ठाम आहे. एक दिवस या देशातील जाती समाप्त होतील. परंतु जोपर्यंत या जाती अस्तित्वात आहेत, तोपर्यंत या जातीचा वापर समाजाच्या हितासाठी करण्यात आला पाहिजे.
जातीच्या वापरासंदर्भात कांशीराम म्हणतात, मैने जाती के शिकार लोगोंको संघटीत करके एक बहुजन समाज बनाया है और मै इस बहुजन समाज के लोगोंको बाबासाहाब आंबेडकर के मिशन को आगे बढाने के लिये प्रेरित किया हू. मेरे मिशन से कांग्रेस, भाजपा और मनुवादी लोग घबराये गये है. इस मिशन को रोकने की कोशिश मनुवादी लोग कर रहे है. ये लोग अपना खेल  खेल  रहे है और मै अपना खेल  खेल रहा हू. मुझे मनुवादियोको उन्हीके जाती हत्यारोसे मारना है. उसमे मैने मास्टरी हासिल कर लि है.

जाती निर्मिती हे मनुवादी व्यवस्थेचे षडयंत्र आहे. जर आम्हाला जातीव्यवस्था नष्ट करावयाची असेल तर अगोदर जातीचा फायदा घेणा-या मनुवाद्यांना रोकने आवश्यक आहे. जोपर्यंत जातीचा फायदा घेणारे अस्तित्वात असतील तोपर्यंत जातीव्यवस्था टिकून राहील व जातीच्या आधारावर बहुजन समाजाचे शोषण होत राहील. म्हणून जातीचा वापर बहुजन समाजाच्या फायद्यासाठी करून घेणे शिकले पाहिजे. जेव्हा बहुजन समाज पक्ष उत्तर प्रदेशात वाढायला लागला तेव्हा बहुजन समाज पक्षाविरोधात कांग्रेसने जातीवादी प्रचार केला. बहुजन समाज पार्टी ही चामारांची पार्टी असा कांग्रेसने प्रचार केला. त्याचा परिणाम (फायदा) असा झाला की बहुजन समाज पार्टी चमारामध्ये अधिक लोकप्रिय झाली. बसपाच्या मतांची टक्केवारी २ टक्क्यावरून  सरळ २९ टक्क्यावर आली व बसपा एका राज्यात सत्ताधारी पक्ष म्हणून अस्तित्वात आला. बसपाला हे यश जातीचा योग्य रीत्या वापर करण्यामुळे झाला.
आरक्षणाच्या संदर्भात कांशीराम म्हणतात, मै अपनी जिम्मेदारी समजता हू. मै अपने लोगोंको आरक्षण लेनेके लिये नही बल्की दुसरोको आरक्षण देणे लायक बनाने मे विश्वास रखता हू. बात कहने और समजने के लिये तो आसान है. आरक्षण देणे लायक कौण होता है? केवळ हुक्मरान ही दुसरोको आरक्षण दे सकते हैइसीलिये हमे शासक बनना है. केवळ याही एक उपाय है. बहुजन समाज को शासक बनणे के पहिले मिशनरी समाज समाज बनणा आवश्यक है. याही मिशनरी लोग बाबासाहाब का सपना साकार कर सकते है. आंबेडकरी चळवळीतून आमदार /खासदार/अधिकारी व न्यायाधीश बनणे आवश्यक आहे.. आंबेडकरी मिशन चालविणारे आमदार वा खासदार कान्ग्र्स वा भाजपा देवू शकणार नाही  अये आमदार वा खासदार केवळ बसपा देवू शकते याच साठी मी मुंबई सोडून लखनऊ मध्ये ठान मांडले आहे. कारण महाराष्ट्राचे आंबेडकरी समाजाचे लोक स्वत:च्या पक्षाच्या माध्यमातून आमदार खासदार बनणे व बनविणे पसंत करीत नाही. ते कांग्रेसच्या पाठीमागे जाणे पसंत करतात. थोड्या स्वार्थासाठी ते आपल्या किमती मताला (वोट) विकून टाकतात. ते म्हणतात, बाबासाहाब का संघर्ष जाती की शिकार हुये सभी जाती के लिये था. जाती की शिकार केवळ महार, चमार, माला या परिहा ही नही थे. ऐसी ६००० जातीया है. यही ६००० जातीया बहुजन समाज को शासक बना सकती है. ये सब जातीया आपस मे झगडती है तब अल्पसंख्यक  बनकर रह जाती है. अगर इनमे भाईचारा बनाने की कोशिश की जाये तो ये जातीया संघटीत होगी. ऐसे लोगो की संख्या भारत मे ८५ परसेंट है. सत्ताधारी समाज बनणे के लिये यह सबसे बडी ताकद बन सकती है. आज मैने बसपा के साथ केवळ ६००० जातीया जोडी है. इसही आधारपर बसपा एक राज्य मे सत्ता पर बैठी है और देश मे तिसरे नंबर की राष्ट्रीय पार्टी बन गयी है. जाती की शिकार हुई सभी जातीयो को एकसाथ जोडकर हम राजनैतिक सत्ता कब्जा कर सकते है और देश के शासक बन सकते है.

उत्तर प्रदेशात सत्तेची चाबी मिळाल्याबरोबर गौतम बुद्ध, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या महापुरुषांच्या नावाने विद्यापीठे बनविण्यात आली. या व्यतिरिक्त महापुरुषांच्या नावे १७ जिल्ह्याची स्थापना करण्यात आली. महापुरुषांच्या नावे मोठमोठे पार्क बनविण्यात आले. मनुवाद्यांनी आमचा इतिहास पुसून टाकला होता. तो इतिहास पुनर्जिवीत करण्यात आला. समाजाच्या आर्थिक विकासासाठी योजना आखण्यात आल्या. त्यासाठी उत्तर प्रदेशाच्या  आंबेडकरवाद्याना कसल्याही प्रकारचे आंदोलन वा मागणी करावी लागली नाही. यातून हेच सिद्ध होते की जातीचा वापर करून राजकीय सत्ता आपल्या हातात घेवून आपण आपल्या समाजाचा आत्मसन्मान व विकास करू शकतो. महापुरुषांच्या दिशानिर्देशानुसार सांस्कृतीकरनाची प्रक्रिया सहज पार पाडू शकतो. सम्राट अशोकाच्या भारत निर्माणापासून आम्हाला कोणीही रोखू शकणार नाही.

भारतातील काही बुद्धिवादी मार्क्सवाद, समाजवाद व साम्यवाद यात त्यांच्या समस्यांचे समाधान शोधताना दिसतात परंतु माझ्या मते मनुवादासमोर सगळे वाद अयशस्वी होतात.  म्हणून जातीचे अस्तित्व लक्षात घेवून आंबेडकरी विचाराला कूटनीतिक वळण देवून नव्या प्रयोगाला सामोरे जाणे ही काळाची गरज आहे.  शेवटी प्रश्न पडतो जातीचा वापर करणारे जाती का नष्ट करतील? परंतु अत्याचाराला बळी पडलेले लोकच जाती व्यवस्था नष्ट करू करतील. परंतु त्यासाठी पिडीत लोकांनी शासक बनणे आवश्यक आहे. प्रस्थापित शासन व्यवस्थेकडून बहुजन समाजाच्या सामाजिक न्याय व आर्थिक उन्नतीच्या मुद्यांना बगल देण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहेत. अशा अवस्थेत आम्ही आंबेडकरवादी कधीपर्यंत विघटीत राहायचे? म्हणून बहुजनांना सत्तास्थानी बघू इच्छिणाऱ्या कांशीरामजींच्या तत्वावर चालनेच इष्ट राहील.

बापू राऊत
९२२४३४३४६४

Monday, March 2, 2015

लालच के चंगुल में फसे है आंबेडकरवादी !


बाबासाहबने साफ़ कहा था की शोषितों तथा उत्पीडितो की राजनैतिक शक्तिको लगातार सामाजिक आंदोलनोका हिस्सा बनना चाहिए. इससे वंचितोंकी सामाजिकी में बदलाव तो आता ही है, उनकी राजनैतिक चेतना का भी विस्तार होता है. लेकिन सामाजिक आंदोलन करना हम आंबेडकरवादी भूल गए और आज राजनितिक गुटो में ऐसे बट गए, जहा हमारा पूरा सम्मान दाव पे लग गया है.
डाक्टर बाबासाहब आंबेडकर के नितियोपर चलनेवाले लोगोंको मुख्यतया आंबेडकरवादी कहा जाता है. आंबेडकरवादी बनने लिए किसी जात विशेष का होना कोई जरुरी नहीं. भारत के अनेक लोग

Monday, February 9, 2015

गांधीजीच्या विचारांची रस्सीखेच

गांधीजीला अनेकांनी वेगवेगळया भिंगाच्या चष्म्यातून  बघितले आहे. महात्मा गांधी यांना कांग्रेस पक्ष, सर्वोदयी व सोईच्या व्यवस्थापुरक मनसबदारानी विश्वपुरुष केले आहे. गांधींच्या महान अशा अहिंसक सत्याग्रहाच्या बळावर देशाला स्वातंत्र्य मिळाले याचा सर्वोदयी, काग्रेस व त्यांच्या विचाराचा ज्या संस्कृतीला फायदा पोहोचत होता अशांनी गांधीजींची अधिकच स्तुती केली. परंतु बदलेली जागतिक परिस्थिती, दुसऱ्या महायुद्धानंतर कमकुवत झालेला ब्रिटन, अॅटली या उदारमतवाद्याचे आलेले सरकार व स्वातंत्र्यविरांमुळे हादरलेले ब्रिटीश या मुद्यांचा देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी मोठे योगदान होते याचाही विचार व्हायला हवा. समाजवाद्याबरोबर आता मोदीही गांधींच्या रंगात रंगू लागले आहेत.

Saturday, February 7, 2015

स्वाभिमानी व साहसी जीतनराज मांझी

महाराष्ट्रातील व इतर राज्यातील दलित जनतेने आजपर्यंत मायावती वगळता अनेक स्वार्थी दलित नेत्यांचे पायचाटू, लालची व समाजाची फसवणूक करणारे राजकारण बघितले आहे. जनतेला स्वार्थासाठी आपले इमान विकणारे दलित नेते बघण्याची सवयच झाली होती. परंतु याला आता छेद गेलाय. बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी आपण कोणाचाही रबरस्टांप नसल्याचे दाखवून दिले. दलितांचे कान पकडून कोठेही बसवून ठेवण्याची सवय लागलेल्या प्रस्थापित वर्णवादी सवर्ण नेत्यासाठी हा मोठा झटका असून यातून आमचे इतर दलित नेते धडा घेतील की नाही? हा मोठा प्रश्नच आहे. रामदास आठवले, रामविलास पासवान व उदित राज हे या लालची व स्वार्थी नेत्यांना आपले नेते
म्हणून जनतेने कधीच नाकारले. मुख्यमंत्री मांझी प्रशासन व सत्ता राबविण्यात कितपत यशस्वी झाले? हा वादाचा विषय असला तरी आज त्याची चर्चा करण्याची गरज नाही. कारण मुख्यमंत्री मांझीना योग्य प्रकारे प्रशासन करू न देण्याची त्यांच्याच मंत्रिमंडळातील सवर्ण नेत्यांनी पण केला होता.
सामाजिक व राजकीयदृष्ट्या सामान्य दलितांची मान उंच व्हावी याच प्रवर्गातील मांझी यांची कृती आहे. त्यांच्या कृत्याने दलितांना एक बळ प्राप्त झाले असून वेळ आल्यास तो आपला इंगाही दाखवू शकतो हे मांझीने दाखवून दिले आहे. मुख्य प्रवाहातील नेत्यांना दलीत हे केवळ वापरून फेकण्यासाठीच असतात हा आजवरचा भ्रम एकदाचा तुटला हे बरेच झाले. राजकारणातील मग ते नितीशकुमार असो वा लालूप्रसाद वा सोनिया गांधी असो वा मोदी. आम्हाला भीक नको, अधिकार हवेत याचा आजचा आवाज म्हणजे जीतनराम मांझी होत. बिहारमध्ये मांझी एकटे नाहीत सारा दलित समाज त्यांच्यापाठीमागे उभा राहील कारण आज ते सामान्य दलितांचा आवाज बनले आहेत. जीतनराम हे बामसेफी विचारातून बनलेले नेते आहेत. त्यांच्याप्रमाणेच वेस्ट बंगाल मधील एक खासदार संसदेत हिंदू वर्णव्यवस्थेवर तुटून पडत असल्याचे दिसते. यावरून भविष्यात दलित चळवळीला स्वाभिमानी नेते मिळू शकतील असा आशावाद निर्माण झालाय.

बापू राऊत

९२२४३४३४६४