भारत हा परंपरा व धर्माच्या वेडाचारानी पछाडलेला
देश आहे. या देशात आजही अमानवीय, रानटी व नीच प्रथांचे समर्थन केले जाते. विज्ञानाने
आणलेल्या क्रांतीचा वापर या देशातील कुप्रथाना वाढविण्यासाठी व तिचे जतन करण्यासाठी
महज केला जात आहे. गणपतीचे दुध पिणे व ही बातमी जगभर पसरविणे हे त्याचे एक उत्तम
उदाहरण होय. या देशावर ब्रिटिशांचे राज्य प्रस्थापित झाले
Saturday, January 25, 2014
Thursday, January 23, 2014
क्या नरेंद्र मोदी ओबीसी नेता है?
आजकल नरेंद्र मोदीजी खुद को ओबीसी का लीडर
तथा ओबीसी वर्ग से आने की बात कर रहा है और ओबीसी से व्होट माँगने की याचना कर रहा
है. लेकिन सवाल यह है की, नरेंद्र मोदी ने ओबीसी के लिए कुछ किया है? तथ्य इस प्रकार है
१. ओबीसी को रिझर्वेशन दिलाने के लिए नरेंद्र मोदी की भूमिका झिरो (शून्य) थी. उन्होंने कभीभी मंडल कमीशन के लिए आवाज नहीं उठाई?
२. नरेंद्र मोदी मंडल कमीशन के प्रबल विरोधी रहे है. नरेंद्र मोदी हमेशा आर एस एस के भूमिका के साथ रहे है, जब की आर एस
१. ओबीसी को रिझर्वेशन दिलाने के लिए नरेंद्र मोदी की भूमिका झिरो (शून्य) थी. उन्होंने कभीभी मंडल कमीशन के लिए आवाज नहीं उठाई?
२. नरेंद्र मोदी मंडल कमीशन के प्रबल विरोधी रहे है. नरेंद्र मोदी हमेशा आर एस एस के भूमिका के साथ रहे है, जब की आर एस
Wednesday, January 15, 2014
विवेकानंदांच्या विचारांचा मूलस्रोत बौद्ध तत्त्वज्ञानात
लेखक: संदीप जावळे (लोकप्रभा दि १७ जानेवारी २०१४ ला प्रकाशित )
येत्या १२ जानेवारीला स्वामी
विवेकानंदांची १५० वी जयंती आहे. भारतीय संस्कृतीची अस्मिता आणि तिचे स्वत्त्व
पाश्चात्त्य जगाला पटवून देण्यात त्यांचा मोठा हातभार असला तरी त्यांच्या
विचारांमागचा, प्रेरणांचा
मूळ स्र्ोत बौद्ध धर्मात सापडतो अशी मांडणी या लेखात केली गेली आहे.स्वामी
विवेकानंद हे भारतमातेचे थोर सुपुत्र होते. दुर्दैवाने त्यांना
३९ वर्षांचे अल्प आयुष्य लाभले,
Saturday, January 4, 2014
आद्यशिक्षीका सावित्रीबाई फुले यांचे अलौकिक गुण
सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या आद्यशिक्षीका
होत. ज्या काळात स्त्रियांना चूल व मुल यापर्यंतच मर्यादित ठेवण्यात आले होते.
मनुस्मृतीने स्त्रियांवर बंधने टाकली होती व समाजव्यवस्थेने ही बंधने बिनदिक्कत
स्वीकारले होते, त्याकाळात सावित्रीबाई फुले ह्या महात्मा ज्योतिबाच्या खांद्याला
खांदा लावून समाजक्रांतीच्या चळवळीत अग्रेसर होत्या. आपले कार्य तडीस नेण्यासाठी
त्यांनी सनातनी ब्राम्हणी समाजाकडून अपमान व अंगावर शेणखताचा मारा सहन केला. मुलीना
शिकवायला जाताना त्यांच्या साडीवर शेण व चिखल फेकून खराब करण्यात येत असे परंतु
आपल्या कार्यापासून त्या तसूभरही मागे सरल्या नाहीत. आजच्या स्त्रियांना जे
स्वातंत्र्याचे जीवन जगायला मिळत आहे त्याचे श्रेय केवळ सावित्रीबाई फुलेना जाते.
परंतु आजची स्त्री सावित्रीबाईला विसरून अज्ञान व काल्पनिक सरस्वतीचे गुणगान गाते
हा एक दुर्व्यविलास आहे.
Sunday, December 29, 2013
आम आदमी पार्टी व आंबेडकरी आंदोलन
अलीकडच्या काळात
सामान्य जनतेच्या दैनंदिन प्रश्नांना स्पर्श करीत आंदोलन उभे करणा-या चळवळींना जनतेचा
पाठिंबा प्राप्त होतो हे अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल यांच्या जनलोकपाल
आंदोलनातून स्पष्ट झाले आहे. रामलीला मैदान व जंतर मंतर येथे जमलेला गर्दीचा
उच्चांक हेच दर्शवितो. सामान्य जनतेच्या दैनंदिन प्रश्नावर राजकारण करणा-या
पक्षाना जनता स्वीकार करते व त्यांना आपले प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेमध्ये बसवू
शकते हे
Saturday, December 14, 2013
हिंदू - हिंदुस्थान व हिंदुवादाचे मूळस्थान
“हिंदू” या शब्दाच्या उत्पत्ती
बाबत अनेक विद्वानांनी संशोधन करून हिंदू शब्द परकीय असल्याचे सिद्ध केले आहे. गतकाळातील
अनेक भारतीय नेत्यांनी हे मान्यही केले. स्वामी दयानंद सरस्वतींनी
(१८२४-१८८३) वेदाकडे परत चला असे म्हटले होते तर अरविंद घोष हे (१८७२-१९५०)
वेदांना वैदिक धर्माचे मूळ स्थान मानतात. स्वामी विवेकानंद हिंदू या शब्दाला
चुकीचा ठरवीत म्हणतात, the word Hindu is a misnomer; the correct word should be
a Vedantins, a person who follows the Vedas. याउलट तथाकथित ब्राम्हण नेते वी. दा. सावरकर यांनी
Saturday, November 23, 2013
बाबासाहेब आंबेडकरांचे मौलिक विचार
बाबासाहेब आंबेडकर
हे भारताचे महान सुपुत्र होते. भारतीय नेत्यांतील त्यांचे स्थान अव्वल दर्जाचे असून
देशातील आज पर्यंतच्या कोणत्याही नेत्यामध्ये त्यांचीच अधिक चर्चा होते. समाजकारण,
अर्थकारण, राजकारण व धर्मकारण ह्या क्षेत्रात बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशिवाय
पुढे जाताच येत नाही. खरे तर बाबासाहेब कोणत्याही एका जातीपुरते मर्यादित नव्हते.
आणि विशिष्ट जातीचा कोणताही निकष आंबेडकरांना लागू होत नाही. त्यांचे अखिल भारतीय
नेतेपद हे वादातीत आहे. जर देशात संख्येने अल्पसंख्य असलेल्या जातीचे मोहनदास गांधी
व जवाहरलाल नेहरू हे देशाचे नेते म्हणून प्रस्थापित होतात त्याच न्यायाने संख्येने
बहुसंख्य असलेल्या समाजाचे
Sunday, September 29, 2013
मा. कांशीराम व आजची आंबेडकरी चळवळ
इतिहासात कोरलेला चाणक्य
कसा होता?, कुटनितीज्ञ की संधीसाधू?, त्याचा शिष्य म्हणविल्या गेलेला चंद्रगुप्त
मौर्य चाणक्याचा वैदिक धर्म न स्वीकारता वा त्याला राजाश्रय न देता जैन धर्माचा
पोशिंदा बनतो, सम्राट अशोक बौध्द धम्माचा स्वीकार करीत त्याला जागतिक महत्व
प्राप्त करून देतो तर वज्जींच्या एकजुटते मध्ये अविश्वास निर्माण होताच त्यांचे
राज्य लयास जाते. पुष्यमित्र शुंग सत्तेवर येताच वैदिक धर्म भरारी मारतो,
चातुरवर्ण्य व्यवस्था लागू होत बहुजन गुलाम होतो, तो आजतागायत गुलामी अवस्थेतच जगतो
आहे. गतकालीन इतिहास हा मागच्या चुका पुढे न करण्यासाठी
Tuesday, September 24, 2013
नवसाचे गणपती पावले कुणाला?(लेखक:संजय पवार)
((लेखक:संजय पवार, मासिक:कलमनामा)
नव्वदच्या दशकात हिंदुत्वाचा जो उन्माद संघ आणि संघप्रणित सर्व संघटना (यात भाजपही आला) देशभर पसरवला, त्याला महाराष्ट्रात शिवसेनेने खतपाणी घातलं. ‘मराठी’चा मुद्दा बाजूला सारून बाळासाहेबांनी भगवी वस्त्रं चढवली ती अखेरच्या श्वासानंतरही उतरवली नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रासह भारतभर त्यांची ओळख ‘हिंदुहृदयसम्राट’ अशीच राहिली. हिंदुच्या बाजूने जेव्हा संघासकट भाजप आणि त्यांची चिल्लीपिल्ली अडचणीच्या काळात ‘गोलमाल’ बोलत तेव्हा ‘हिंदुहृदयसम्राट’ कुठल्याही थराला जाऊन, कुठल्याही शब्दात परिणामांची पर्वा न करता बोलत आणि त्या बोलण्यावर ठाम राहत. तरीही त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, त्यांना अटक झाली नाही, त्यांच्यावर खटले भरले गेले पण निर्णयाप्रत आले नाही, काही खटले माघारीही घेतले गेले. यामागचं राजकीय इंगित, इतरांचे ‘लकवे’ शोधणार्या तंदुरुस्त लोकांनाच माहीत!
Monday, September 16, 2013
महानायक बिरसा मुंडा
बिरसा मुंडा केवल आदिवासियोके महानायक
नहीं थे, वे तो महानायक थे मानवता के. उन्होंने
आदिवासीयोमें पनपे अंधविश्वासो से मुक्ति दिलाई और उनमे आत्मविश्वास और स्वाभिमान
कि ज्योत जलाई थी. आदिवासी आंदोलन के सूत्रधार बिरसा मुंडा को आदिवासी लोग
भगवान मानते है.
बिरसा मुंडा ने देखा, इस देश के
जमीनदार और साहुकारो ने अदिवासियोपर जुल्म किये. जमीनदार तो अदिवासियोसे उनके खेतों में काम करवा लेते और
उसके बदले में बहुत कम अनाज देते थे जिसमे
Tuesday, September 3, 2013
हेमंत करकरे ते डॉ. दाभोलकर दहशतवाद्यांची ‘नेम’बाजी! (लेखक: संजय पवार { कलामनामा)
हेमंत करकरे महाराष्ट्र एटीएस प्रमुख.
२६/११च्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात ‘शहीद’.
डॉ. नरेंद्र दाभोलकर अज्ञात (हा लेख लिहिपर्यंत) मारेकर्यांकडून पुण्यात सकाळी ७ वाजता गोळ्या घालून खून.
करकरे आणि डॉ. दाभोलकर यांच्यात एक साम्य आहे आणि ते साम्य म्हणजे सनातन्यांकडून जिवंतपणी धमक्या, अवहेलना आणि धर्मद्रोही (हिंदू) राष्ट्रद्रोही आणि यापेक्षा शेलक्या विशेषणांनी निर्भत्सना आरती. आणि त्यांच्या मृत्युपश्चात जाहीर शोक आणि मतलबी उरबडवेपणा करण्यात आला.
Sunday, September 1, 2013
Thursday, August 22, 2013
दाभोळकर साहेब तुमचे हे बलिदान व्यर्थ न जावो !
एखाद्या
चळवळीचा इतिहास बनण्याची परंपरा महाराष्ट्राला नवीन नाही. चळवळीच्या संस्थापकाच्या मृत्युनंतरच त्या चळवळीच्या नेत्याचे महत्व
समाजाला व शासनकर्त्यांना समजत असते. महात्मा ज्योतिबा फुलें, राजश्री शाहू
महाराज, गाडगे महाराज, डाक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील व
वी.रा.शिंदे यासारख्या महापुरुषांच्या मृत्युनंतरच त्यांच्या उतुंग विचाराचे व
कर्तुत्वाचे मोल समाजाला व शासनाला समजले. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक
डाक्टर नरेंद्र
Friday, August 9, 2013
शरद जोशी: कसला योद्धा शेतकरी! हा तर शेतक-यांचा मारेकरी
शरद जोशी हे कावेबाज भटाच्या पिलावळीतील रंग बदलणा-या एका शामेलीयन सरड्याचे रूप. त्याने
शेतकर्यांच्या प्रश्नांचा, त्यांच्या भावनांचा व त्यांनी दाखविलेल्या
विश्वासाचा अक्षरश: बाजार मांडत आपले राजकीय बस्तान मांडण्याचा डाव रचत राज्यसभेची
खासदारकी बळकावली होती. बामणी काव्यातल्या या जळूने आपल्या पोटात जपून ठेवलेले
जातीयवादी फुत्कार अखेर बाहेर काढत लोकसत्ता या ब्राम्हणी वृत्तपत्रात लेख लिहीत
“आंबेडकरांनी
Tuesday, August 6, 2013
उत्तर प्रदेश में अभिव्यक्ति की स्वतंत्रता पर हमला
लेखक एवं चिंतक कंवल भारती को उत्तर प्रदेश सरकार ने फेसबुक पर एस डी एम् दुर्गाशक्ति नागपाल के मामले पर टिपण्णी करने के कारण गिरफ्तार किया। लेकिन कोर्ट ने उन्हें जमानत पर छोड़ दिया। उत्तर परदेश सरकार की यह कारवाई अभिव्यक्ति के मौलिक अधिकारों पर किया गया हमला है. उत्तर प्रदेश सरकार के इस कारवाई की बुध्दिजिवियोने निंदा करनी चाहिए।
फेसबुक पर कंवल भारती ने प्रतिक्रिया देकर जनभावना की बात कही थी। उन्होंने गलत कुछ नहीं लिखा था ।
कंवल भारती ने फेसबुक पर लिखा था, 'आरक्षण और दुर्गाशक्ति नागपाल मुद्दों पर अखिलेश यादव की समाजवादी सरकार पूरी तरह फेल हो गयी है। अखिलेश, शिवपाल यादव, आज़म खां और मुलायम सिंह इन मुद्दों पर अपनी या अपनी सरकार की पीठ कितनी ही ठोक लें, लेकिन जो हकीकत ये देख नहीं पा रहे हैं। अपराधियों के हौसले बुलंद हैं और बेलगाम मंत्री इंसान से हैवान बन गये हैं। ये अपने पतन की पट कथा खुद लिख रहे हैं। सत्ता के मद में अंधे हो गये इन लोगों को समझाने का मतलब है भैस के आगे बीन बजाना।'
Saturday, July 27, 2013
वारकरी संप्रदायात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा चंचुप्रवेश
दरवर्षी पंढरपूरला विठ्ठलाच्या वारीला वारकरी संप्रदायाचे
लोक जात असतात. या वारकरी संप्रदायात बहुजन समाजाच्या लोकांचा अधिक भरणा आहे. गरीब
बहुजन समाज अनवाणी पायाने व जुनाट मळकट कपड्याने वारीच्या पाठीमागे चालत असतो. तो
वारीत बेफामपणे नाचत असतो. त्यांच्या अंगात अध्यात्माचे भूत संचारलेले असते. वारीत
नाचणारा हा वारकरी अडाणी, निष्पाप, भाबडा व अर्धशिक्षित असतो. सनातनवाद्याचा सांस्कृतिक
कावा समजण्याची अक्कलदाढ वारक-यात जाणूनबुजून निर्माण होवू देण्यात आली नाही. बहुजन
वारकरी दारिद्र्याने पिचलेला, गरिबीने
Friday, July 26, 2013
वारीतील सनातनी वाटमारे
पांडुरंगाच्या प्रती असलेल्या अपार उत्साहाची उधळण करत विविध रिंगणं, परिक्रमा आटोपून देशभरातल्या दिंड्या, पालख्या येत्या १९ तारखेला पंढरपुरात विसावतील. महिना-दीड महिन्याचा पायी प्रवास करणारी पावलं परतीच्या प्रवासाला लागतील. यावर्षी पंढरीच्या दिशेने जाणार्या पावलांमध्ये ३० टक्के वाढ होणार असल्याचा एक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, दिवसेंदिवस वाढत जाणार्या या गर्दीत ज्यांचा जयघोष केला जातो त्या संतांना समजून घेणारा टक्का किती असेल याबद्दल शंका आहे.
शंका असल्याची अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक आहे, बोगस वारकरी. आता तुम्ही म्हणाल! बोगस वारकरी हा काय प्रकार आहे. हा प्रकार सध्या मोठ्या प्रमाणावर घडतोय. बहुजन देव, यात्रा, उत्सव यांना प्रथम नाकारायचे, बदनामी करायची तरीही
Wednesday, July 17, 2013
रामासामी पेरियार:दक्षिणेतील महात्मा फुले
देशाच्या
स्वातंत्र्य पूर्व राजकारणावर उत्तर भारतीय ब्राम्हण समाज, हिंदू महासभा, रा.स्व.संघ या गटाचे अधिपत्य होते. ब्राम्हीण व जमीनदारांच्या दाता
पक्षाचे नाव होते भारतीय राष्ट्रीय कांग्रेस हे. एकूणच ब्राम्हणी व भांडवलवादी मानसिकतेच्या
वृत्तीचा वावर या कांग्रेसी संघटनेत होता. अशा वातावरणात दक्षिण भारतात ( विशेषता:
तामिळनाडू व केरळ) रामासामी पेरियार यांनी ब्राम्हणी मनोवृत्तीला आवाहन देण्याचे
कार्य केले. आर्यप्रणित ब्राम्हणी वर्चस्व व ते टिकवून ठेवण्यासाठी धडपडणारे कांग्रेसमधील
कट्टर हिंदुवादी यांना उत्क्रांत होवू न
देण्याचे सारे श्रेय रामासामी पेरियार यांना जाते. द्रविडी समाज हा गणप्रधान समाज
होता परंतु आर्याच्या वर्णाश्रम संस्कृतीने गणसंस्कृतीवर मात केली होती. परंतु
खोलवर रुजलेल्या द्रविडीयन संस्कृतीला ब्राम्हणी वर्चस्व कधीही मान्य झाले नव्हते.
त्यामुळे उत्तरेकडून आलेल्या आर्य संस्कृती विरुध्द द्रविडांनी दंड थोपटले.
Monday, July 15, 2013
कट्टर धर्मवाद्यापुढे सरकारने टेकले घुटने
अंधश्रध्दा निर्मूलनाचा कायदा” या
महाराष्ट्रात आता होणे नाही हे एकंदरीत परिस्थितीवरून दिसते आहे. कांग्रेस – राष्ट्रवादी
सरकार व त्यांची विचारधारा ही भाजपा –शिवसेना या पक्षापेक्षा वेगळी नाही हे यातून
सिध्द होते. या सरकारने कट्टर धर्मवाद्यापुढे सपशेल लोटांगण घातले आहे.
कांग्रेस व राष्ट्रवादीने केवळ पुरोगामीपणाचा बुरखा
घातला आहे परंतु अंतस्थ तेही पक्के धार्मिक कट्टरवादी आहेत हे आता धर्मनिरपेक्ष
जनतेने ओळखले पाहिजे. कांग्रेस व राष्ट्रवादी सहीत
भाजप-शिवसेना व राष्ट्रीय स्वंसेवक संघ यांना या देशातील गरीबांना
अंधश्रद्धेच्या गर्तेत वर्षानुवर्षे गाडून ठेवायचे आहे. सामान्य जनतेला अंधश्रद्धेच्या
गर्तेत ठेवल्याशिवाय यांचे वर्चस्व या देशावर
व जनतेवर ठेवता येणार नाही हे ते जाणून आहेत
म्हणून अंधश्रद्धा विरोधी बिलाला त्यांचे हुलकावण्या देणे चालू आहे.
Sunday, July 7, 2013
विश्व शांतीदूतावर भ्याड हल्ला
जगाला शांती, प्रेम व अहिंसा या त्रयत्रीचा संदेश
देना-या तथागत बुद्धाच्या मर्मस्थळावर हल्ला करना-या दूषित वृत्तीचा निषेध
शांतीदूताच्या चाहत्यांनी शांतपणे केला पाहिजे. हा हल्ला मुस्लिम आतंकवादी वा भारतातील जातीयवावाद्यांनी केला
हे अजून स्पष्ट झालेले नाही. तरी यातून दोन बाबी सूचक वाटतात. म्यानमार मध्ये
बुध्दिस्ट व रोहिंग्या मुस्लिम यांच्यात झालेला तनाव व दंगल. अजूनपर्यंत कोणत्याही मुस्लिम संघटनेने या बाम्बस्फोटाची जबाबदारी घेतली नसल्याचे दिसते. म्यानमार मधील घटनेचा भारतातिल बौध्द व विहारांशी सबंध जोडणे
हे सुध्दा अनाकलणीय आहे. तर दुसरी बाब म्हणजे भारतातील भगव्या दहशहतवाद्यांनी घडवून आणलेले स्फोट. संघाने नरेंद्र मोदीना बीजेपीचा निवडणूक प्रमुख व संभाव्य पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून
निश्चित केल्यानंतर देशात जातीयवादी वातावरण निर्माण करण्याचे मनसुबे
जातीयवाद्यांनी आखले
असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती.
त्यानुसार भाजपापासून दूर झालेल्या नितीश कुमारांना अद्दल घडविण्यासाठी बोधगये मध्ये स्फोट घडविण्याचे षडयंत्र आखले
असावेत ही शक्यता नाकारता येत नाही. विनोद मिस्त्री या हिंदू संदिग्ध व्यक्तीस एन. आय. ए ने अटक केल्यामुळे भगव्या आंतकवादाची पुष्टी होत असून देशातील दलित व मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण
करण्याचे कुटिल कारस्थान रचण्यात आल्याचे निष्पन्न होते. देशात 2014 साली होवू घातलेल्या लोकसभा निवडणुकीत देशाची सत्ता आपल्या हातात
घेण्यासाठी आर. एस. एस. चातकासारखी वाट पाहत आहे. आर.
एस. एस. च्या पिलावळीने
आखलेल्या योजनेचा हा
एक भाग असू शकतो. एन. आय. ए. च्या चौकशीअंती सत्य बाहेर येईल. मात्र आंबेडकरवादी तसेच तथागताना मानणा-यांनी बुध्दाचा संदेश समोर
ठेऊनच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे. हिंसेचा त्याग करीत सर्व बौध्दानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी एकत्र येणे फार गरजेचे आहे. एकतेमध्येच शक्ती
असते (Unity is the strength) हे तत्व समजने गरजेचे असून गटातटात विखुरलेल्या आंबेडकरवाद्यांनी व बौध्द संघटनांनी यातून बोध
घ्यावा.
Subscribe to:
Posts (Atom)

