Monday, July 27, 2020
अरुणाचल प्रदेशातील बदलती लोकसंख्या वाढ आणि धर्मांतरे
Saturday, July 18, 2020
तुर्कस्थानमे इस्लामी मूलतत्ववाद का उच्छाद: चर्च, मस्जिद और म्युझियम से मस्जिद तक
अब दुनिया में एक नए विषय पर चर्चा हो रही है। इसपर दुनिया
भर से आलोचना भी हो रही है। वह विषय है हागिया सोफिया। हागिया सोफिया एक कॅथेड्रल (चर्च) का नाम
है। यह तुर्की के पूर्वी शहर कॉन्स्टेंटिनोपल शहर के मध्य में 532 में बनाया गया
था। यह गिरजाघर (चर्च) दुनिया के सबसे पुराने और भव्य गिरिजाघरों में से एक था।
हागिया सोफिया का अर्थ है "पवित्र विवेक"। इस गिरजाघर की यात्रा रोमांचक
है। पहला, उसका निर्माण गिरजाघर स्वरूप में था, बाद में उसे मस्जिद में रूपांतरीत किया गया। फिर, उसी
मस्जिद को म्यूझियम में बदल दिया गया था। अब एर्दोगन की तुर्की सरकार ने उसे फिर
मस्जिद में परिवर्तित करने की घोषणा की है। तुर्कस्थान का यह वाकया भारत के
अयोध्या विवाद के समकक्ष दिखाई देता है। मंदिर के लिए आंदोलन द्वारा बाबरी मस्जिद
का विध्वंस बादमे अदालत का फैसला। इस दृष्टि से, तुर्कीके हाज़िया सोफिया का
मामला और अयोध्या विवाद के बीच अधिक समानताएं दिखती हैं।
Friday, July 17, 2020
तुर्कस्थानातील इस्लामी मूलतत्ववाद: चर्च, मस्जिद व म्युझियम ते मस्जिद
जगात सध्या एक नवीन
विषय चर्चिला जात आहे. त्यावर जगातून विरोधी प्रतिक्रिया सुध्दा उमटत आहेत. तो विषय म्हणजे हागिया सोफिया. हागिया
सोफिया हे नाव आहे एका कॅथेड्रल्सचे (चर्चचे ), जी
चर्च इ.स. ५३२ मध्ये तुर्कस्थानच्या पूर्वीच्या कॉन्स्टँटिनोपल या
शहराच्या मध्यभागी बांधल्या गेली होती. हे कॅथेड्रल्स (चर्च) जगातील सर्वात जुन्या
आणि भव्य कॅथेड्रल्स पैकी एक होती. हागिया सोफियाचा अर्थ होतो "पवित्र विवेक". या कॅथेड्रलचा प्रवास म्हणजे
प्रथम तिचे कॅथेड्रल चर्च म्हणून झालेले बांधकाम, नंतरच्या काळात तिचे मस्जिद मध्ये
परिवर्तन. त्याच मस्जिदीचे एका वास्तु
संग्रहालयात रूपांतरण तर आता परत एर्दोगनच्या तुर्की सरकारकडून मस्जिद मध्ये परिवर्तीत करण्याची
झालेली घोषणा. भारतात मंदिरासाठी जनक्षोभ भडकावून केलेले
आंदोलन. त्यातून बाबरी मस्जिदीचा झालेला विध्वंस व न्यायालयाचा निकाल ह्या बाजू बघितल्या की तुर्कस्थानामध्ये
होत असलेले हाजिया सोफिया प्रकरण व अयोध्या विवाद यात अधिक साम्यता बघायला मिळते.
Saturday, June 27, 2020
शाहू राजेंच्या "वेदोक्तास" टिळकांचा विरोध
देशात व विशेषत: महाराष्ट्रात
शिवाजी राजेनंतर राजेशाहीतील सर्वात चर्चित व्यक्ती कोणी
राहिली असेल तर ती कोल्हापूर संस्थानाचे “राजश्री शाहू” होत. शिवाजी राजे व शाहू राजे यांचे कार्य व विचार पध्दतीमध्ये काही मुलभूत फरक दिसतात. ब्राह्मणी संस्कृती व तिची विचारधारा, ब्राह्मणी
संस्कृतीचे भय व न्यूनगंड तसेच अस्पृश्यता व जातीभेद याचे निराकरण या कसोट्यांवर
या दोन राजांची कर्तव्यकठोरता तपासली तर या दोन व्यक्तिमत्वातील फरक स्पष्ट जाणवतो.
ब्राह्मणवर्ग राबवित असलेल्या धर्मसहिंतेवर आघात करणे शिवाजी राजेंना जमले नाही. शाहू राजेंनी मात्र
यात कसलीही कसर बाकी ठेवली नाही. शिवाजी राजेंनी मुघलाकडून झालेल्या अपमानाचा समाचार
घेण्यात बाणेदारपणा दाखविला परंतु स्वकीयाकडून झालेला अपमान त्यांनी धर्मसहिंतेच्या नावाखाली पचवून टाकला. Wednesday, June 10, 2020
सुधारकांच्या कथनी व करणीतील दांभिकता
हिंदू समाज धर्मग्रस्त
तर होताच पण त्याहीपेक्षा धर्माचरणाने भयंकर विकृत रूप धारण केले होते. स्वधर्मीयाबद्दलची
सहिष्णुता सुद्धा लोप पावली होती. मानवतेला काळिमा फासणार्या गोष्टी होत होत्या. अन्याय
व अत्याचाराच्या पर्वात समाजाचा काही भाग जगत होता. अशा समाजांचे अधिकार गोठविण्यात
आले होते. अनिष्ट रूढीना धर्म व शास्त्राची मान्यता लाभली होती. त्याहीपेक्षा राजकारण
करणारे पूर्वगौरववादी व कर्मठ असल्यामुळे अत्यंत अमानवीय अशा वाईट प्रथाही त्यांच्यासाठी
गौरवाच्या झाल्या होत्या. सतीची चाल, विधवावरील जुलूम, बालविवाह, मुलींची विक्री, केशवपन, मूर्तिपूजेचे स्तोम, स्त्रीशिक्षणावर बंदी, ब्राह्मणेत्तर बहुजन समाजाच्या शिक्षणावर बंधने, अस्पृश्य वर्गाचे
गावकूसाबाहेरचे दरिद्री जीवन आणि अंधश्रध्दांच्या महापुराने मानवी जीवनाला विळखा घातला
होता. ह्या अमानवीय प्रथा व पध्दतीचा विरोध करण्यासाठी सुधारकांचा गट पुढे आला होता.
या सुधारकांनी धर्मशास्त्रातील कलमांची उकल करून त्यातील अंतर्भाव लोकास सांगण्यास
सुरू केले. त्यांनी इंग्रज सरकारकडे सुधारणासाठी नवे कायदे करण्याची मागणी केली. परंतु
या सुधारकांना विरोध करण्यासाठी काही दुर्धारक समोर आले होते. या दुर्धारकांचे नायक
होते विष्णुशास्त्री चिपळूणकर व बाळ गंगाधर टिळक.
Tuesday, May 26, 2020
टिळक व गांधी : राजकीय सत्ता संघर्षातील विरोधाभासी केंद्र
टिळक व गांधी या दोहोंमध्ये एक मूलभूत फरक होता. अस्पृश्योद्वार झाल्याशिवाय भारत
स्वातंत्र्य होणार नाही ही गांधीची ढोंगी विचारसरणी तर ब्राह्मणांनी कौन्सिलात गेल्याशिवाय
देशोद्वार होणार नाही ही टिळकांची जातीश्रेष्ठतेची भूमिका. देशाच्या राजकारणांची व
ब्रिटीशविरोधातील आंदोलनाची सर्व सूत्रे ही आपल्या हातामध्ये असावी याची सुप्त धडपड
दोघांच्याही अंतरंगात होती. रानडे व गोखले यांचेकडून राजकीय सूत्रे आपल्या हातात घेवू
पाहण्याची टिळकांची नीती तर राष्ट्रीय राजकारणातून टिळकांना घालविण्याची गांधीची व्युव्हरचना, दोघांची ही पध्दत वेगळी असली तरी उद्देश मात्र एकच होता आणि
तो म्हणजे ‘एकमेकांना राजकारणातून घालविण्याचा’.
Wednesday, April 8, 2020
महात्मा ज्योतिबा फुले : एक थोर समाजक्रांतिकारक
लोकहितवादी, महादेव रानडे, गोपाळ गणेश आगरकर, बाळशास्त्री जांभेकर
हे महात्मा फुल्यांच्या समकालीन सुधारक होते. परंतु हे सुधारक हे बहुजन समाजाविषयी
केवळ शब्दामधून उसासे व सहानुभूती दाखवत. हे सुधारक आपल्या सुधारकी विचाराच्या विरोधी कृतीही करीत असत. पण ज्योतिबा
फुले अशा सुधारक फळीतील नव्हते. 'बोले तैसा चाले' हा त्यांचा बाणा होता. ब्राम्हणेत्तराना जागे करण्याबरोबरच
ब्राम्हण महिलावर होणार्या अन्यायाच्या निर्मूलनाला सुद्धा त्यांनी आपले कर्तव्य समजले.
Thursday, April 2, 2020
प्लेग, टिळक, चाफेकर बंधू आणि आजचा कोरोंना
आज संपूर्ण जगाला कोरोंना विषाणूनी वेढलेले आहे. शक्तीशाली व विकासात अग्रेसर
समजले जाणारे अमेरिका, इटली, स्वीडन, स्पेन, फ्रांस, जर्मनी, कॅनडा व ब्रिटन हे देश या कोरोंना विषाणूने पुरे हबकले
आहेत. त्यांच्या आर्थिक व्यवस्थेचे कंबरडे मोडायला लागले आहे. आधुनिक तंत्रज्ञान व
आरोग्य सोईनी सशक्त असलेल्या या देशात लाखो लोक विषाणूनी संक्रमित होवून हजारो जन
मृत्यूमुखी पडत आहेत. हा विषाणू जगासाठी एक धोक्याची घंटाच असून जगाची आर्थिक स्थिती
व समीकरणे बदलविणारा ठरू शकतो.
Wednesday, March 4, 2020
लेण्यांद्री लेण्याचे विद्रुपीकरण
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर हे शहर. प्राचीन काळापासून
प्रसिध्द असलेल्या या शहराला लेण्याचे शहर असे म्हटले जाते. जुन्नर हे ‘हीनयान’ बुध्दीझमचे मोठे केंद्र होते.
सातवाहन काळात जुन्नर हे पुणे शहरापेक्षा मोठे केंद्र असावे. पूर्व काळात येथील
व्यापार हा नाणेघाट ते कल्याण अशा मार्गाने चालत असे. या शहराच्या आजूबाजूला असलेल्या पर्वतरांजीत लेण्यांच्या
मालिकाच मालिका आहेत. डोंगरातील खडकांना काटून लेण्या कोरलेल्या आहेत. अशाच अनेक
लेण्यांपैकी येथील लेण्यांद्री हि एक प्रसिध्द लेणी. लेण्यांद्री लेण्यावर
जाण्यासाठी ३०७ पायऱ्या चढून जावे लागते. ह्या लेण्याची सुरक्षा व देखभाल भारतीय
पुरातत्व विभाग करते. परंतु तेथील परिस्थिती बघितल्यास या भारतीय पुरातत्व विभागा
विषयी मनात निराशा निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. कारण हजारो वर्षाच्या या सांस्कृतीक
धरोहारीला भारतीय पुरातत्व विभागाने पूर्णपणे दुर्लक्षित ठेवले असून एकूण २६
लेण्यापैकी केवळ ७ नंबरची लेणी सोडली इतर लेण्या बघण्यासाठी चांगली सोय केलेली
दिसत नाही.
Monday, February 17, 2020
शिवरायांचा आठवावा प्रताप
आज देश कधी नव्हे एवढा धोक्याच्या वळणावर उभा आहे.
देशाला अनेक समस्यांनी ग्रासले असून एक नागरिक दुसर्या नागरिकाकडे संशयित
भावनेतून बघायला लागला आहे. रोजचे मोर्चे
व आंदोलनानी रस्ते आणि चौक गजबजलेले दिसताहेत. मागण्यांचे फलक हातामध्ये धरून मार्च निघताहेत.
भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात जिला जगातिल सर्वात मोठ्या लोकशाहीचा गौरव
प्राप्त झाला आहे. त्या देशात धर्म,परंपरा व वर्चस्वाच्या नावाने मत्सर भावना वाढाव्यात हे देशास हीन करणार्या कृती आहेत. राजकीय स्वार्थासाठी धूर्त
मंडळी धर्म व जुने इतिहासाचे दाखले व भाकडकथावर विश्वास ठेवून भारतीय नागरिकात द्वेषाचे बिजारोपण करून हिंदू व मुस्लिम
यांच्यात दरी निर्माण करण्याचे कारस्थान रचनार्यानी एकदा तरी शिवरायाच्या
राज्यरचनेचा व जनतेचा सांभाळ करण्याच्या वृत्तीचा अभ्यास करायला पाहिजे.
Sunday, February 16, 2020
राजनीति का नया अखाड़ा: बजरंगबली बनाम जय श्रीराम
राजनीति एक बड़ा
अजीब खेल है। राजनीति में कब क्या होगा, इसका किसे कोई पता नहीं होता। कब करीबी दोस्त विरोधी बन जाएगा और कब कट्टर विरोधी
दोस्त बनेगा इसपर कुछ भरोसा नहीं किया जा सकता। देश में ऐसे कई उदाहरण हैं। राजनीति
में कब करीबी रिश्तेदार दुश्मन बनकर चुनावी मैदान में प्रतिस्पर्धी
बनेगा इसकी भविष्यवाणी करना मुश्किल है। सत्ता की लालसा ने मानवीय नैतिकता को
कमज़ोर कर दिया है। सत्ता, स्वार्थ और धन राजनेताओं के जीवन का हिस्सा बन
गए हैं। उन्होने सिद्धांत, मानवता, भाईचारे और विविधता में एकता को अवसरवाद, घृणा, सामाजिक विभाजन
और हत्या जैसे अवसरों में बदल दिया।
Friday, February 14, 2020
राजकारणातील नवे प्यादे : बजरंगबली विरुध्द जय श्रीराम
राजकारण हा मोठा विचित्र खेळ आहे असे म्हणतात, ते काही खोटे नाही. राजकारणात
कधी काय होईल याचा काही नेम नसतो. जवळचे मित्र कधी विरोधक बनतील तर कट्टर विरोधक
कधी मित्र याचा काही भरोसा नसतो. असे अनेक उदाहरणे महाराष्ट्रात व देशातही बघायला
मिळतात. मित्राचे असू द्या पण जवळचे नातेवाईकही कधी विरोधात जातील आणि निवडणूक
मैदानाच्या आखाड्यात एकमेकाचे प्रतिस्पर्धी बनतील याचे भविष्य सांगणेही कठीण झाले आहे.
सत्तेची लालसा हि माणसाच्या नैतिकतेला निष्प्रभ
करून टाकीत असते. सत्ता, स्वार्थ व संपत्ती हि राजकारण्यांच्या जीवनाचा भाग बनली आहे.
त्यामुळे तत्व, मानवता, बंधुभाव आणि विविधतेतील एकतेला सुरुंग लागून त्याची जागा संधीसाधुत्व,
द्वेष, सामाजिक फुट व हत्या या प्रकारांनी घेतली आहे.
Sunday, January 12, 2020
भारतीय नागरिकत्वाचे अधिकार आणि जनआंदोलन
भारतातील प्रत्येक
व्यक्तीला अधिकाराच्या दृष्टीने नागरिकत्व हा अतिशय महत्वाचा विषय आहे. संविधानात
भारतीय नागरिकात्वाच्या प्रश्नाचा विचार संविधान अंमलात आले त्यावेळचे नागरिक आणि
त्यानंतरचे नागरिक असा केला आहे. संविधानातील अनुच्छेद १४ व १५ हे भारतीय
नागरिकांच्या मूलभूत अधिकारासी सबंधित असून कायद्यापुढे सर्व नागरिक समान असून
त्यांना धर्म, वंश, जात, लिंग
व जन्मस्थान यावरून कोणत्याही प्रकारचा
भेदभाव करता येत नाही. असे असतानाही देशात जनआंदोलने होत आहेत. नुकताच भारतात
सुधारित नागरिकत्व कायदा अंमलात आला (सीएए) या कायद्यानुसार पाकिस्तान, बांग्लादेश व अफगाणिस्तान येथून आलेल्या परदेशी पण मुस्लिम नसलेल्या
व्यक्तीस भारतीय नागरिकता देण्यात येईल व त्यासाठी लागणारी कागदपत्रे भारत सरकार
स्वत:च बनवून देईल. येथे भारतीय
संविधानातील मूलभूत अधिकाराच्या संदर्भातील अनुच्छेद १५ चे उल्लंघन होत असल्याचे
स्पष्ट होते. भारत हे धर्माधित राष्ट्र नसून कोणत्याही नागरिकाकडे धर्माच्या
चष्म्यातून बघता येत नाही. संविधानातील तरतुदी बघितल्या तर संविधानाने दिलेले अधिकार
आणि विशेषाधिकार याचा वापर भारतीय नागरिकांनाच करता येतो. भारतीय संविधानाच्या
अनुक्रमणिका दोन मध्ये भारतीय नागरिकत्वाच्या संदर्भात चर्चा आलेली असून त्याची
काय वैशिष्टे हे बघितले पाहिजे.
Saturday, December 28, 2019
वढू बद्रुक ते भीमा कोरेगाव
वढू बद्रुक हे पुणे जिल्ह्यातील एक गाव. भीमा आणि इंद्रायणी
नद्यांच्या संगमावर वसलेले हे गाव साधेसुधे नसून त्याला इतिहासाची मोठी झालर आहे. शूरविर
राजे संभाजी व स्वामिनिष्ठ असलेला गणपत गोपाळ गायकवाड या दोन ऐतिहासिक व्यक्तिरेखांची
समाधीस्थळ असलेल हे गाव. एक राजा तर दूसरा आपल्या राजनिष्ठेवर प्रगाढ विश्वास ठेवणार्या
प्रजेचा घटक. असे हे गाव २०१७ साली अचानक प्रकाशझोतात आले, ते १ जानेवारी २०१७ रोजी भीमा कोरेगावला
झालेल्या हिंसक दंगलीमुळे. त्या आधीच गावातील वातावरण गावाबाहेरच्या लोकांनी येवून
सतत धुमसत ठेवलं होत. केवळ त्याचा विस्फोट व्हायच बाकी होत.
Sunday, December 8, 2019
Monday, November 18, 2019
शिवसेना-राष्ट्रवादी-कांग्रेस युती किती सम, किती विषम ?
शिवसैनिकाला महाराष्ट्राचा “मुख्यमंत्री” बनविणारच असे वचन शिवसेना संस्थापक बाळासाहेब
ठाकरे यांना दिल्याचे उध्दव ठाकरे सांगत आहेत. त्यामुळे त्यांनी सत्ता स्थापनेत
५०-५० टक्केचा हिस्सा मागत भाजपाकडे अडीज वर्षाच्या मुख्यमंत्री पदाची मागणी केली
आणि महायुतीच्या बिघाडीला सुरुवात झाली.
दरम्यान भाजपाला पूर्णचंद्राची सवय झाल्यामुळे आणि सत्तास्पर्धेमध्ये समान
विचारधारेचा कोणीही प्रतिस्पर्धी नको असल्यामुळे भाजपाने शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या
मागणीला केराची टोपली दाखविलेली दिसते. त्यामुळे शिवसेनेला मुख्यमंत्री पदासाठी
कांग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे सहकार्य मिळाले तरच त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत
पोहोचता येते. परंतु सत्तास्थापनेत आड येणारी बाब म्हणजे विरोधाभासी विचारधारा आणि
त्याचा परंपरागत मतदारावर होणारा परिणाम होय. त्यामुळे सरकार बनले तरी ते टिकेल आणि
चालेल काय? याची सांशकता सगळेच व्यक्त करू
लागलेले दिसतात.
Sunday, October 27, 2019
विधानसभा निवडणूक निकालाचा अन्वयार्थ
महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकांचा ज्वर संपून त्याचे निकाल २५ ऑक्टोबर
२०१९ ला जाहीर झालेत. हे निकाल अंदाजाला
पराभूत करून अचंभीत करणारे निघाले. कारण
ज्याप्रकारे मतदान संपल्याबरोबरच सार्या न्यूज चॅनेल्सनी आपापले एक्झिट पोल
दाखविले त्यावरून दोन्ही राज्यात भाजपाला अभूतपूर्व यश मिळण्याचे दावे करण्यात आले
होते. हे दावे कोणत्या बळावर केले हे स्पष्ट नसले तरी भाजपाला लोकसभेच्या विजयावर आधारित
हे एक्झिट पोल होते हे स्पष्ट जाणवते. त्यामुळे या न्यूज चॅनेल्सनी आत्मपरिक्षण
करायला शिकत संतुलित राहायला पाहिजे हे सांगणा-या या निवडणूक निकालाने भारतीय
मतदारांना कोणत्याही राजकीय पक्षांनी गृहीत धरू नये असेही स्पष्ट बजावल्याचे दिसते.
Wednesday, October 2, 2019
बेडसे लेणी: निसर्गाच्या कुशीतील प्रेक्षणीय स्थान
पवना नदीच्या जवळ व पठारी मैदानातील ३०० फुट उंचीच्या डोंगरमाथ्यावर लेण्याचा समूह
असून त्यांना बेडसे लेणी असे संबोधले जाते. बेडसे लेण्यांमध्ये चैत्यगृह, एक मोनास्ट्री, दोन स्वतंत्र गुहा असून काही अपूर्ण गुहा आहेत. या अपूर्ण गुहा
म्हणजे दगडाच्या कडकपणामुळे आकार येत नसल्याकारणाने सोडून दिलेला अर्धवट भाग. गुहेच्या
समोर काही कुंड असून त्यापैकी एका कुंडाच्या समोर “पाणी पिण्यासाठी” असे
ब्राम्हीलिपीत लिहलेले आढळते. लेण्याच्या वरच्या बाजूस
पत्र्यासारखे दिसणारे दगडी छत असून स्थापत्य कलेचा तो अप्रतिम नमूना आहे. ह्या बेडसे लेणी, पुणे जिल्ह्यातील मावळ
तालुक्यात असून भाजे लेणी पासून ९ कि.मी. अंतरावर आहेत. लोकांना कार्ला आणि भाजे
लेण्यांविषयी बरीच माहिती आहे. वास्तविकता मावळ प्रदेशातील ह्या लेण्यांचा त्रिकोण
(कार्ला-भाजे-बेडसे) बेडसे लेण्याशिवाय पूर्ण होवू शकत नाही. बेडसे लेण्या जवळच पवना
धरणाला लागून लोहगड,
Monday, September 16, 2019
ऐसा धर्म, जहा भगवान नहीं
भगवान तथा इश्वर कहा है?
कैसा है? किसीने देखा नही। पर उसके अनुभूति पर विश्वास रखा। अनुभूति पर विश्वास रखो
कहनेवाला कोण होता है? मन के डर को अनुभूति कहना कितना सच है? झूठ बोलना आसान है,
लेकिन सच बोलने के लिए हिंमत चाहिए होती है। दुनिया का हर एक धर्म ईश्वर से जुडा है।
लेकिन दुनिया में कुछ ऐसा भी धर्म और लोग है, जो ईश्वर के अस्तित्व को नहीं मानते।
वही इश्वर आज किसी की निजी संपत्ती बन बैठा
है। उसे करोडो लोगोंके आस्था का केंद्र बना दिया है। इस आस्था के केंद्र “सौदेबाजी और लुट” के अड्डे बन
गए। लेकिन लोग पुण्य और पाप के भय से चुप्पी साधे हुए है।
Sunday, August 25, 2019
दहीहंडी: मरणोत्सवाची की उत्सवाची
देशात दरवर्षी कृष्णजन्मोत्सव
येतो, तो येतो एक नव्या जागृत मानवतेची, प्रेमाची व
बंधुत्वाची उमेद घेवून. कट्टर धर्मांधतेला, असहिष्णूतेला व
अमानवीय मूल्यांना नष्ट करणारा हा उत्सव केवळ उत्तर भारतापुरता मर्यादीत न राहता
विदेशात या उत्साहाचे लोन पसरले आहे. या श्रीकृष्ण जन्मोत्सवदिनी देशात विविध सांस्कृतिक
कार्यक्रमांची रेलचेल असते. हा उत्सव कृष्ण मंदिरात व परंपरा प्रेमींच्या घरात साजरा होतो.
एवढेच नव्हे तर रस्त्यावरून वाजतगाजत शोभायात्रा काढण्यात येवून मोठ्या तल्लिनतेने नागरिक यात
सहभागी होत उत्साही होवून नाचत असतात. हीच तर आहे
धर्मस्वातंत्र्याची व आपला उत्सव जबाबदारीने पार पाडण्याची पध्दत.
सद्सदविवेकबुध्दीच्या स्वातंत्र्याचा आणि दुसर्याच्या धर्मतत्वाना मान देत आपला धर्म
मुक्तपणे प्रतिज्ञापित करण्याचा तो एक अधिकार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)















