बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय समाजाला
उद्देशून म्हणाले होते कि,
धर्म हा तुमचा आवडता विषय आहे, त्यामुळे
तुम्ही हिंदू धर्मीय लोकाजवळ धार्मिक व सामाजिक हक्काची मागणी करता. परंतु तुम्हास
ते अधिकार देण्यास तयार नाहीत. याचा अर्थ धर्माने तुम्ही हिंदू नाहीत. ज्या
हिंदू धर्मात तुम्ही आहात त्याच धर्माचे लोक तुमचा द्वेष करतात.
तुम्हाला शत्रू मानतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्यासाठी नवा मार्ग चोखाळला
पाहिजे. निष्कारणपणे हिंदू लोकांचे चरण धरून व विनविण्या करून तुम्ही तुमच्या माणुसकीला कमीपणा आणू नका. जे धर्म तुमच्या सामाजिक
सुधारणा व उन्नतीकडे लक्ष देतात त्या धर्मासबंधी विचार करा. ज्या धर्मात तुम्ही
आहात, त्या धर्मात तुम्हीच काय, पण
इतरांनी देखील राहण्यासारखा तो धर्म नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी
केलेल्या धर्मांतराच्या ६६ वर्षानंतरही हिंदू धर्म, तिची
संस्कृती व धर्ममार्तंड लोकांच्या स्वभावगुणधर्मात आजही बदल झालेला दिसून येत
नाही. रोज कोठे ना कोठे काळीज पिळवटून टाकनाऱ्या घटना घडत आहेत. त्यामुळे
मागासवर्गीय समाजात अस्वस्थेतून हिंदू धर्म सोडून इतर धर्मात जाण्याचे प्रमाण
वाढले असून ज्यांना मानवतेची कास आहे अशा अनेक सुपरिचित व्यक्तींनी बौध्द धर्माची
दीक्षा घेतलेली दिसते.